अतिविचाराने आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण होतात.
सोनाली जे.
आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतो?? बघा हुं विचार करा. आपण अशाच गोष्टींचा विचार करतो ज्यात आपण पूर्ण involve झालो असतो, ज्यात आपण पूर्ण attached झालो असतो…अगदी छोटेसे उदाहरण देते कॉलेज मधल्या बेस्ट friends ..दोघी रोज एकत्र बसतात..एकत्र खाणे पिणे..अभ्यास .. नोट्स काढतात..पण अचानक एका मैत्रिणीच्या आयुष्यात अजून एक मैत्रीण येते तेव्हा तिची attachment दोघी मैत्रिणींसोबत सारखीच असते..
परंतु जी पहिली मैत्रीण आहे तिला असे वाटत राहते आता काय नवीन मैत्रीण मिळाली..जुन्या मैत्रिणी करिता कुठून वेळ असणार .किंवा त्या नव्या मैत्रिणी मुळे आपण दूर जातो आहोत ..अंतर वाढते…पूर्वी सारखी ती फक्त मलाच वेळ देवू शकत नाही…अशी विचारांची मालिकाच सुरू होते..
आणि यातूनच अती विचार करायला सुरुवात कधी होते तेच समजत नाही…ही जुनी मैत्री म्हणून त्या मैत्रिणी वर माझाच हक्क जास्त.. possessiveness वाढत जातो. मग काही वेळेस मैत्रीण दुरावत असल्याचा insecure feel येतो…काही वेळेस असेही होते की मी आणि ती एकदम दृढ मैत्रिणी आम्ही कायम एकत्र च असणार ..कोणीच आम्हाला काही करू शकत नाही किंवा आमच्या मैत्रीत येवू शकत नाही…हा कॉन्फिडन्स ढळतो..
मग तो चालण्या बोलण्यात ही ..किंवा पुढे कोणाशी जवळीक साधताना..किंवा नवीन मैत्री करूच नये म्हणून एकाकी रहावेसे वाटते..जास्ती त जास्त introvert होण्याची ही शक्यता असते..मुळात ही काल्पनिक समस्या च की आता माझी मैत्री पूर्वी सारखी राहिली नाही ..किंवा आता दुसऱ्या कोणाबरोबर माझी मैत्री होवूच शकणार नाही..
असेच उदाहरण द्यायचे झाले तर प्रियकर आणि प्रेयसी…पहिल्यांदा नजर भेट..मग ओळखीत रूपांतर..मग मैत्री..आणि मग प्रियकर प्रेयसी…या सगळ्या टप्प्यात विविध घटना घडत असतात…जसे सुरुवातीला जेव्हा नजर भेट असते तेव्हा फक्त एकमेकांविषयी आकर्षण असते..मग विचार येवू लागतो की ओळख व्हावी…ओळख झाली की मैत्री व्हावी…मैत्री मध्ये मोकळेपणा असतो..
एकमेकांना मदत करण्याची इच्छा ही असते…हळूहळू असे वाटू लागते की हा सहवास कायम टिकावा..मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते..एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडले असतात..एकमेकांच्या आवडी निवडी…मदत..आपलेपणा..एकमेकांविषयी ओढ वाढत जाते..
परंतु अचानक प्रियकर एखाद्या मुली बरोबर बोलताना दिसला जवळीक करताना दिसला तर ही प्रेयसी अस्वस्थ होते ..अनेक विचार करू लागते कोण असेल ती मुलगी ?? खूप जवळीक असेल का?? त्यात प्रियकर जर त्या मुली विषयी काही बोलणे टाळत असेल तर मनात विचारांचे अजूनच काहूर माजते…त्यात जर समजलेच की ती त्याची एक्स girl friend तर हिच्या डोक्यात मग काल्पनिक विचारांचे थैमान सुरू झालेच समजा..जसे की त्यांच्या दोघांच्या मध्ये तेव्हा relations होते म्हणजे ते कोणत्या लेव्हल पर्यंत…
मग असे काय झाले असेल की जमले नाही…आणि आता परत भेटली म्हणजे आता आपल्याला सोडून परत तिच्या बरोबर गेला तर….मग आपले काय?? किंवा जर दोघी ही पाहिजेत असे झाले तर…?? किंवा मग त्या दोघांच्यात पॅच अप झाले तर आपण बाजूला पडू…आणि आपण राहू शकत नाही दूर…त्यातून वाद ..भांडणे ..
मग मनातल्या शंका वाढू लागतात आणि trust .. विश्वास कमी होवू लागतो…जसे की एखाद्या वेळेला फोन घेतला नाही…फोन आला नाही…आता जसे सोशल मीडिया सारख्या उपलब्ध आहेत जसे व्हॉटसॲप मेसेज आला नाही आपण पाठविला read kela नाही…ते दोघे एकावेळी ऑनलाईन असतात..म्हणजे त्यांच्या मध्ये काय सुरू असेल..
परत इथे ही insecure feel…possessiveness आला..अती विचार त्यामुळे काल्पनिक समस्या पण ती वास्तवात समस्या निर्माण होते. .भले तो मुलगा अगदी घरच्या कोणाबरोबर बोलत असेल तरी हिला ते खोटेच वाटेल …त्यातून हीची होणारी अस्वस्थता… चिडचिड… anger.. depression ..mood disorders … काही वेळेस personality disorder chi लक्षणे ही दिसू लागतील ..
सततचा स्ट्रेस वाढेल…acceptance कमी होईल.. introvert जसे स्वतच्या विचारात गुरफटून जाईल..बाकी काही दिसणारच नाही…त्यातून एकटेपणा येईल..चांगली नाती ही टिकणार नाहीत..खराब होतील. काही
वेळेस आयुष्यच नको म्हणून sucide आत्महत्या या गोष्टी चे विचार ही येतील.. आणि हे केवळ केवळ एका छोट्या विचारातून काल्पनिक विचारांच्या समस्या यांची शृंखला च तयार होते ..
आपल्या सगळ्यांना शेखचिल्ली तर माहितीच…तो असाच एका छोट्या शा विचारातून अती विचार करून काल्पनिक विचारांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असे.. एकदा हा शेखचिल्ली काचेचे कंदील घेवून बाजारात ते विकण्याकरिता जातो .टोपली घेवून बसतो…बाजार भरायला लागतो…एक व्यक्ती येतो त्याच्याकडून कंदील विकत घेवून पुढे जातो… शेखचिल्ली ला अपेक्षेपेक्षा दोन रुपये जास्तीच मिळतात ..
पुढचे ग्राहक येण्याची वाट बघत बसतो ..आणि विचार सुरू होतात डोक्यात या कंदील मधून मला एवढं profit झाले आता माझे एव्हढे कंदील विकले की एवढा फायदा होईल ..असे होता होता तो खूप पुढचे म्हणजे अती विचार जे प्रत्यक्षात काल्पनिक च करू लागतो..मग माझे हे सगळे कंदील विकले ही मला एवढा फायदा होईल त्यातून अजून नवीन व्यापार सुरू करेन..मग अजून फायदा..मग मस्त घर बांधीन..मग लग्न करीन …दमून भागून घरी गेल्यावर बायको मस्त जेवायला देईल..
मग नवीन घेतलेल्या बेड वर असे पाय पसरून आडवा होईन ..असे कल्पना करत असताना इकडे मात्र बाजारातच हा शेख चिल्ली एकदम पाय पसरून लांब करतो आणि हाय देवा होते काय तर त्याच्या समोरची भरपूर कंदील असलेली टोपली याच्या पाय पसरण्याने लाथाडली गेली आणि त्याचे सगळे कंदील तुटून फुटून गेले..झाले सगळे नुकसानच नुकसान झाले…आणि पुढची सगळी स्वप्न ..आनंद ..पैशाची security सगळ्यांवर पाणी पडले…
थोडक्यात काय ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यांचा विचार किंवा असे असेल तसे असेल किंवा असे होईल तसे होईल असे काल्पनिक अती विचार माणसाचे आयुष्य असंतुलित करते..मानसिक संतुलन ढळते…तेही आपलेच नाही तर आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्यांचेच..
विचार करावा पण तो योग्य दिशेने..तार्किक ..वास्तवाशी निगडित असावा..
काल्पनिक विचार जसे स्वप्न ही बघावित त्यातून आपल्याला आपले व्यक्तिमत्व घडविण्यास ,आपले ध्येय पूर्ती करिता नक्कीच मदत होते..पण अती काल्पनिक समस्या वाढवतील किंवा त्या वास्तवाशी निगडित समस्या वाढतील असे विचार नसावेत…त्याच्या मर्यादा असाव्यात..कुठेही आपल्या इथे केवळ आपल्याच नाही तर इतरांच्या ही शरीराचे किंवा मनाचे संतुलन ढळू दिले नाही पाहिजे…ते बॅलन्स असणे गरजेचे..काल्पनिक विचार असे झाले तर तसे झाले तर यापेक्षा प्रत्येक गोष्ट अतिशय विचारपूर्वक आणि रचनाबध्द केली तर नक्कीच आयुष्य आनंदी आणि सुखी जगता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

