Skip to content

अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा.

अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा.


मयुरी महेंद्र महाजन,


रोजच्या जगण्यात अडचण नाही, असं कोणीच म्हणत नाही, जीवन कितीही परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी कुठल्यातरी गोष्टीने कुठेतरी, अडचणही राहूनच जाते, आता अडचण म्हटली की कोणाला कुठली अडचण, तर कोणाला कुठली व्यक्तीपरत्वे त्या अडचणी सुद्धा वेगवेगळ्या आहेतचं… पण अडचणीचं नाही, असं मात्र कुणी नाहीचं, पण जेव्हा आपला काळ अडचणीचा असेलं, त्यावेळेस कुणाचा तरी आधार असणे, किंवा त्या आधाराची नको त्या व्यक्तीकडून अपेक्षा करणेही चुकीचे आहे, आलेली अडचण ही आपली असते, आणि आपण ती आपल्याच पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा….

मला नेहमी असं वाटतं की, आपण कुणाचं दुःख कितीही समजून घेतलं ,तरी आपण ते दुःख घेऊ शकत नाही, ते ज्याचं त्यालाचं भोगावं लागते, म्हणूनच अडचणी जर आपल्या असतील तर त्यांना सोडवण्याची जबाबदारीसुद्धा आपलीचं असली पाहिजे, डूबत्याला काठीचा आधार, असे म्हणतात, जर आपल्या अडचणीत आपण नष्ट होणारचं असू, तर आधार घ्यायला हरकत नाहीचं, परंतु आलेल्या प्रत्येक अडचणीत आपण जर आधार शोधतं बसणारं, तर ती अडचण सुटण्यापेक्षा गुंतागुंतीची होत जाईलं, जेव्हा कधी तो आधार मिळाला नाही, तर मात्र फजिती होते.

अडचणी ह्या प्रत्येकाला असतात, फरक फक्त इतकाच असतो, की अडचणींचा बाऊ करून, आधर शोधतो, तरं कुणी स्वतःलाचं असं भक्कम बनवतो,की त्या आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून आपले आयुष्य रंगतदार करतो, आलेल्या किंवा नकळत येणाऱ्या अडचणी माझ्यातील क्षमता जागृत करण्यासाठी आलेले आहेत, त्याने मी अजून मजबूत होणार आहे, हा दृष्टिकोन ठेवला तर आयुष्यातल्या अडचणी फक्त शूल्लक वाटतीलं….

आपल्याला आपल्या अडचणी नेहमीच मोठ्या वाटतात, परंतु प्रत्यक्षात तसे नाही, आपल्या अडचणी तर काहीच नाही, यापेक्षाही कितीतरी अडचणी,ज्या अडचणींचा व्यक्तीला पावला पावलावरती संघर्ष करावा लागतो, शरीराच्या अशा ईजा किंवा अंपगत्व की,ज्या अडचणींशी कितीतरी वर्ष झुंजावं लागतं, प्रत्येक वेळेस आपल्यासाठी कुणीतरी असेलं, अशी अपेक्षा माणसाला कमकुवत बनवत जाते ,आणि आधारासाठी आपण कुणाचा हात शोधणार असू, तर ती आपली सवय बनत जाते ,आणि ज्या वेळेस तो हात मिळाला नाही, त्यावेळेस माणूस आतून खचतो, डगमगतो, आता मी काय करायचं??? असा प्रश्न पडतो….

ज्या पद्धतीने अडचणी येतात, त्याच प्रकारे त्याच्यासोबत कितीतरी संधीसुद्धा येतात, हो संधीचं…. कारण आपल्यात असणाऱ्या कितीतरी क्षमतांचा शोध आपल्याला येणाऱ्या अडचणीतूनचं लागलेला असतो, म्हणूनच आलेल्या अडचणी कडे फक्त अडचण म्हणून नव्हे तर आपल्याला झोपेतून जागे करण्यासाठी आलेली एक संधी म्हणून बघायला हवे, अडचणी कितीही मोठ्या असू द्या,

पण येणार्‍या प्रत्येक अडचणीची वेळही ठरलेली असते ,आपण जर आपल्या भूतकाळात डोकावून बघितलं, तर आपल्याला हे नक्कीच लक्षात येईलं, की ज्या ज्या वेळेस आपल्यासमोर अडचणी उभ्या होत्या, आणि आता कसं होणार हा प्रश्न जेव्हा पडलेला होता, त्यानंतर काही वेळ गेल्यावर ति अडचण सुद्धा सुटलीच की, संकटे अडचणी येतातचं, आणि येतचं राहणार… प्रत्येक वेळेस आपण कोणाला तरी आवाज न देता स्वतः जर अडचणींचा सामना केला, तर आपण इतक्या सहजपणे सोडवू शकतो ,परंतु उगीच दुसऱ्यांवरती डिपेंन्ड राहू नका, स्वतःच्या अडचणीसाठी आपण स्वतः वरती डिपेंन्ड राहायला शिकलं पाहिजे,…

आपल्या आत भरपूर काही दडलेलं असतं, परंतु हे बाहेर येण्यासाठी त्या अडचणी सुद्धा महत्त्वाचे असतातचं, ज्या गोष्टीला आपण आधार समजतोय त्याच गोष्टी जर आपल्याला फसवण्यासाठी उपयोगात येणार असतीलं, तर आपण वेळीच सावध असणे गरजेचे आहे, अन्यथा आधाराच्या लोभापोटी आपण आपल्याकडे असणाऱ्या कितीतरी चांगल्या गोष्टी गमावून बसतो, आधाराला धरलेली काठी तेवढी मजबूत आहे का??? हे तपासा, अन्यथा आधार म्हणून धरलेली काठी जरं किडकी,आणि पोकळ असेल, तर आपल्या अडचणी वाढू शकतात,..

हे नेहमी आपण कोरून ठेवायला हवं, की प्रत्येक अडचणीला उपाय हा असतोचं, ते आपल्यावरती ठरत जाते, की आपण तो उपाय कसा शोधतो, एखाद्या अडचणीत आपल्याला सुचलेली आयडिया आपल्या जीवनाला आकार देऊन जाते,गेल्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्रात ‘माईंचे’ निधन झाले, सिंधुताई सपकाळ यांचे आयुष्य हे कितीतरी अडचणींनी व्यापलेले होते, त्यांनी त्यांच्या अडचणीं साठी आधार शोधला नाही,

आपल्यासारख्या अडचणी असणा-यांना आधार दिला, आयुष्यात जेव्हा त्यांचे कुणीच उरले नाही ,अनाथ म्हणून जगण्याची वेळ आली, तेव्हा त्या अनाथांच्या वेदनेपर्यंत पोहोचल्या, त्यांच्यासाठी जगल्या, लाखो अनाथांच्या त्या आधार होत्या ,परंतु म्हणून काही जीवनाचा प्रवास थांबला नाही…

माईंनी आपल्या पोरांना जे प्रेम दिले, जी शिकवण दिली, स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडत बसू नका, असा मोलाचा संदेश दिला ,आणि स्वतःच्या अडचणीवरती मात करायला शिका, असे सांगून गेल्या, मी जगले तुम्हीही जगा,,, मरणाला कवटाळू नका, ते जेव्हा येईलं, तेव्हा येईलचं, त्यांच्या जीवनाकडे बघितले, त्यांच्या विशाल दृष्टिकोन आणि दूरदृष्टीचा विचार याकडे बघितले, की आयुष्यात कसल्या अडचणी राहतच नाही, हे तर फक्त वरकरणी होणारी शाळा आहे, आपल्या आयुष्याच्या प्रवासात कितीतरी कठीण परीक्षा असतात स्वतः स्वतःचा आधार व्हायला शिकलं पाहिजे…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा.”

  1. Suhas Patwardhan

    प्रत्येकालाच हे शक्य नाही

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!