Skip to content

अजून किती दिवस लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगणार आहात??

अजून किती दिवस लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगणार आहात??


सोनाली जे.


मानवी स्वभावच असतो की प्रत्येक वेळेस समोच्याला काय वाटेल , तो काय म्हणेल, ती काय म्हणेल याचा विचार आपण जास्त करत असतो. आणि आपोआपच आपण लोकांच्या म्हणण्यानुसार जगायला सुरुवात करतो . ? का ? कारण आपल्याला नेहमीच असे वाटत असते की समोचा / ची जे म्हणत आहेत त्यांचेच बरोबर आहे. आपले जरी बरोबर असेल तरी उगीच मनात शंका – कुशंका येत राहतात. आपला आपल्याचवर विश्वास नसतो.

अजून किती दिवस लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगणार आहात??

ऐकावे जनाचे करावे मनाचे . हे प्रत्यक्षात येणे गरजेचे. परवा counselling करिता एक बारावी परीक्षा दिलेली मुलगी निकिता, तिचे आई वडील सोबत आले होते.

घराणे एकदम चांगले. वडील उच्च शिक्षित आणि व्यावसायिक . निकीताला आर्किटेक्ट व्हायचे होते. हुशार होती. आई अगदी ट्रॅडिशनल . आई या मता ची की मुलींनी फार शिकू नये. नंतर घरचं सांभाळायचे. आमच्यात मुलींनी नोकरी कधीच केली नाही. मग तिला कशाला पुढे चांगले शिक्षण पाहिजे , उगीच एव्हढा खर्च कशाला पाहिजे शिक्षणावर ? आणि परत जास्त शिकली पुढे देश सोडून गेली नकोच ते. आणि परत ही भीती मुलगी जास्त शिकली तर तिच्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा मिळेल का ? लग्नात अडचणी नकोत.

याउलट वडिलांचे मत होते की निकितांन चांगलं शिकावं. पण त्यांना वाटत होते तिने कॉम्प्युटर्स मध्येच मास्टर्स करावे आणि त्यांच्या व्यवसायात मदत करावी.

निकिताला काय वाटते हे त्यांच्या दोघांच्या दृष्टीने महत्वाचे नव्हते.
आई आणि वडील निकिताने सतत तिने असे करावे , तसे करावे म्हणून त्यांच्या मताचा भडिमार करत होते. शेवटी निकिता घर सोडून तिच्या मैत्रिणीकडे निघून जाते . त्यानंतर आई वडील सगळीकडे शोधाशोध करतात.

निकिता सापडल्यावर तिला विचारतात की असे का केले ? तेव्हा ती म्हणते की मी विचार केला की , मी किती दिवस तुमच्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे जगणार ? मी काय फुटबॉल आहे का ? एकाने पाहिजे तसे इकडून मारावे , दुसऱ्याने पाहिजे तसे तिकडून मारावे ? मला ही काही माझी मते आहेत , माझी आवड आहे , निवड आहे. माझी काही ध्येय आहेत ती पूर्ण करायची आहेत.

तेव्हा निकिताच्या आई वडिलांचे डोळे उघडतात. आणि आई ही तेही तिला तिच्या आवडीनुसार admission घेण्याची permission देतात.

आपल्याही आयुष्यात बरेचवेळा आपल्याला अनुभव नसतात तेव्हा मोठी माणसं म्हणतात हे असे कर ते तसे कर सांगतात , आपण ही त्यांचा मान रखायचा म्हणून ऐकत असतो. कधी मित्र मैत्रिणी आपल्याला म्हणतील तसेच करायचे. तसेच वागायचे. कधी जर चुकून आपण त्यांना आपल्या मतानुसार वागायला सांगितले , किंवा आपण काही सुचविले तर मात्र ते तयार होत नाहीत. मग आपले म्हणणे ही ऐकून घेत नाहीत.

इतरांच्या म्हणण्यानुसार वागून आपण आपले विचार , आपलं व्यक्तिमत्त्व हे दाबून टाकत असतो. आपला कॉन्फिडन्स डळमळीत होत असतो कारण समोरची व्यक्ती एकदा आपल्याला एक सांगते तर दुसऱ्या वेळी दुसरेच त्यामुळे confusion वाढते. आणि मग नक्की कसे वागावे याचा आपला आत्मविश्वास डळमळीत होतो.

काही वेळेस समोरच्या चे म्हणणे ऐकून आपण आपल्या ही गोष्टी त्यात add कराव्या लागतात. तर काही वेळेस खरेच एकांगी विचार होतात त्यामुळे समोरच्याचे म्हणणे ही ऐकावे लागते. विचारविनिमय मार्ग शोधण्याकरिता उपयोगी पडतात. पण सर्वस्वी त्यांच्या म्हणण्यानुसार वागू नये.

काही वेळेस समोरच्याचे म्हणणे ऐकून आपण वागत असतो. जगत असतो. पण बरेचदा अशी ही शक्यता असते की आपण स्वतः ला underestimate करत असतो. बरेचदा आपल्यात capacity , क्षमता असून ही आपण ती गोष्ट करण्याचे daring करत नाही किंवा ती रिस्क उचलत नाही कारण काय तर समोरच्याने आपल्याला मर्यादा , किंवा त्यातील संभाव्य धोके सांगितले असतात.

पण थोडा ‘ हटके ‘ विचार केला तर समजते की , जे मोठे लोक घडले आहेत , टाटा , बिर्ला , अंबानी किंवा न्युटन, आईन्स्टाईन , एडिसन ..अगदी आपले पंतप्रधान मोदीजी हे सगळे थोडे हटके वागले म्हणून पुढे गेले ना ?

उरी सिनेमा हा घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे .
कॅप्टन विक्रम बात्रा कारगिल युद्धात शहीद झाले. पण त्यांनी आयत्या वेळी काही decisions आणि विजयश्री खेचून आणली च ना ??
लोक आपल्याला त्यांची गरज असेल तेव्हा फोन करणार , कॉन्टॅक्ट करणार, इतर वेळी तुम्ही त्यांची प्रायोरिटी नसता. अशावेळी तुम्ही ठरवायचे की तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागून तुमचे महत्व शून्य करून टाकणार का थोडे तुमचे ही वेळ आणि इतर गोष्टींना प्राधान्य देणार हा निर्णय वेळीच घेता आला पाहिजे. नाही तर आपल्या चांगुलपणाचा लोक फायदा तर घेतात च पण आपल्याला गृहीत धरतात.
मग बरेचदा नवरा बायको असेल , मित्र मैत्रिणी असतील , नातेवाईक , ऑफिस मध्ये सहकारी किंवा बॉस ही असेल तुम्हाला ते गृहीत धरून कसेही वागवितात .आणि त्यांच्या म्हणण्याला विरोध केला तर अजून त्रासच देतात त्यात त्यांना काहीच वाटत नाही. पण आपण वेळीच निर्णय घ्यायचा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागण्या ऐवजी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायचे, तर आपला त्रास वाचेल.

परवा एक शॉर्ट फिल्म बघितली . मिस to mrs . यात एक श्रीमंत घरातली सून दाखविली आहे. ती नवऱ्याला विचारते की HR ने फोन केला होता काय reply देवू तेव्हा नवरा म्हणतो तुझ्या ५० ते ६० हजार रुपयांनी असा काय फरक पडणार आहे . माझा चांगला बिझिनेस त्यापेक्षा घरात सगळे आहे आरामात रहा. असे सांगून तिला नोकरी करण्यास विरोध करतो.

एकदा त्या सूनेकडे पार्लर ची एक स्त्री येते ती तिचे काम करत असताना बोलत असताना, corona lockdown मध्ये तिच्या नवऱ्याचा झालेला लॉस आणि तिच्या पार्लर कमामधून त्यांना survive होणे शक्य झाले हे सांगताना आता नवऱ्याचे चांगले आहे हे पण सांगते.

इकडे जवळपास पार्लर करिता जागा घ्यायची असेल तर रेट काय वगैरे विचारत असताना ती मोठ्या घरची सून तिला विचारते हे तू आता कशाला करते जर तुझा नवरा व्यवस्थित कमवितो तर. ? तुझे सासू सासरे , आई वडील काही म्हणत नाहीत का तुला ? तेव्हा ती पार्लर वाली म्हणते बोलणारे बोलतात पण आपण कोणा कोणाकडे लक्ष द्यायचे ? मी करते हे माझ्याकरिता करते.

Lockdown मध्ये याच कमाई ने साथ दिली होती. जेव्हा स्त्री मिस मधून mrs होते तेव्हा स्वतः ला कुठे ना कुठे हरवून टाकतात. स्वतः चे अस्तित्व मिटून जाते. आणि मी माझी ती ओळख , पेहचान कही खोना नहीं चाहती. म्हणजे ? म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत मी खूप सारी स्वप्ने बघितली आहेत. आणि मी त्या सगळ्या स्वप्नांचा महाल जिवंत ठेवू इच्छित आहे.

हे ऐकल्यावर ती मोठ्या घरातली सून आपल्या नवऱ्याचा , घरच्यांचा तिच्या नोकरी करिता असलेला विरोध , त्यांचे म्हणणे न ऐकता , नवऱ्याला तो जॉब स्वीकारत आहे हे सांगते.

थोडक्यात काय ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपण जे निर्णय घेवू ते चूक असो बरोबर त्यातून एक तर अनुभव मिळतो . मग तो कधी चांगला असेल कधी वाईट. तर कधी त्यातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळते . जबाबदारीची जाणीव होते. चुकलो तरी प्रयत्न करणे याकरिता potential वाढते. आपली energy योग्य ठिकाणी लावली जाते. अनेक गोष्टी जबाबदारीने पार पाडल्या जातात. आपण प्रगल्भ होत गेलो तर आपले व्यक्तिमत्व ही प्रभावी होत जाते.

आयुष्य सुंदर आहे . अजून किती दिवस लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगणार आहात?? तुम्हीं कायम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगलात , वागलात आणि एखाद्या वेळी जरी विरोध केला त्यांना , आपल्या मतानुसार वागलात तरी तुम्ही वाईट ठरता.

कधी तरी आपले पंख फडफडून , थोडी उडान भरून उंच भरारी घ्यायला शिका.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!