Skip to content

अजिबात शॉपिंग करणार नाही, असं ठरल्यानंतरही आपण का आकर्षिले जातो?

अजिबात शॉपिंग करणार नाही, असं ठरल्यानंतरही आपण का आकर्षिले जातो?


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


शॉपिंग कोणाला करायला आवडत नाही? जवळपास सगळ्यांनाच शॉपिंग करायला आवडत, काही अपवाद सोडले तर! पण त्याच शॉपिंगच जेव्हा व्यसन लागत, तेव्हा मात्र आपण शॉपिंग करणार नाही, किंवा ती इच्छा कशी टाळता येईल याचा विचार करायला लागतो. पण शॉपिंग सारख्या गोष्टीच व्यसन कसं बरं लागू शकत?

शॉपिंग करताना मेंदू dopamine आणि endorphins हे हार्मोन्स सोडत असतो. endorphins हे ते न्यूरोट्रान्समीटर असतात जे तुम्हाला वेदना आणि तणावाचा सामना करण्यास मदत करतात, आणि dopamine ते न्यूरोट्रान्समीटर असतात ज्याचा आपल्या मूड मध्ये खूप मोठा रोल असतो, आनंद, प्लेजर , या गोष्टी dopamine मुळे होत असतात.

काही लोक शॉपिंग चा स्ट्रेस जावा, किंवा आपलं लक्ष तणावाकडे जाऊ नये म्हणून देखील उपयोग करत असतात. आणि शॉपिंग करताना त्यांचं लक्ष तणावाकडे जात देखील नाही कारण शॉपिंग मुळे त्या नवनवीन वस्तूंच्या खरेदीमध्ये आपला मेंदू endorphins आणि dopamine release करत असतो. याच त्या भावना असतात ज्यामुळे शॉपिंग ची सवय लागते, नव्हे व्यसनच लागते.

काही लोकांना खरेदीची आवड असते, पण काही लोकांना त्याच व्यसन असू शकत. या दोन मध्ये खूप मोठा फरक आहे, शॉपिंगच ज्यांना व्यसन आहे , ते ओळखण्यासाठी आपण काही लक्षणे पाहुयात..

इतर व्यसनाधीन माणसांप्रमाणे शॉपिंगच व्यसन असणारी माणसं देखील त्यांचं व्यसन लपवण्याचा प्रयत्न करू शकतात, तुम्ही जर क्रेडिट कार्डची बिले , शॉपिंग बॅग्स हे लपवत असताल तर तुम्ही शॉपोहोलिक असण्याची शक्यता आहे. काही वेळा जेव्हा खरेदीला गेलो हे मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, अशा वेळी शॉपोहोलिक व्यक्ती खोटं देखील बोलू शकते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती खरेदीला गेल्याचे कबूल करते पण किती खर्च झाला याबद्दल खोटं बोलू शकते. शॉपोहोलिक असणाऱ्यांची काही भावनिक लक्षणे पाहुयात:

स्वतःला परवडण्यापेक्षा जास्त खर्च करणे, राग किंवा नैराश्याची प्रतिक्रिया म्हणून खर्च करणे, खरेदी व्यवहारावरील नियंत्रण गमावणे, मागच्या वेळच्या खरेदीच्या guilt मुळे तो guilt विसरण्यासाठी पुन्हा खरेदी करणे.

बऱ्याच वेळा अशा खरेदीमुळे किंवा सतत जास्त खर्च करण्याच्या सवयीमुळे नातेसंबंध खराब होण्याची शक्यता असते. consumer psychology हेच सांगते की कशापद्धतीने मार्केटिंग स्ट्रॅटेजिज चालतात. त्या मुळातच ग्राहक एक वस्तू घ्यायला गेलेला असताना बाकी गोष्टींकडे कसा आकर्षिला जाऊ शकतो यासाठी नवनवीन युक्त्या काढत असतात. आणि बऱ्याच वेळा आपण त्यात अडकून, ठरवल्यापेक्षा जास्त सामान घेऊन येत असतो.

म्हणजे शॉपोहोलिक नसणाऱ्या माणसांची जर ही गत होत असेल तर शॉपोहोलिक लोकांचं काय होत असेल. शॉपिंगची इच्छा किंवा मोटिवेशन हे त्यांना आतून येत असत. ज्या वस्तूंची त्यांना गरज नसते अशा गोष्टी देखील त्यांना विकत घ्याव्याशा वाटत असतात. बऱ्याच वेळा शॉपिंग करतेवेळी खूप छान वाटत असत, पण शॉपिंग करून झाल्यावर आपण जेव्हा घरी येतो आणि लक्षात येत की आपण किती पैसा, आणि वेळ फुकट घालवलाय, ते ही अशा वस्तूंसाठी ज्यांची आपल्याला गरजच नाही, तेव्हा त्याचा त्रास जाणवतो.

आपण काही गोष्टी करू शकतो ज्याने शॉपिंगच हे व्यसन कंट्रोल करायला किंवा कमी करायला मदत होऊ शकते,

१. वस्तू खरेदी करण्याचा जो मोह होतो तो टाळा.
२. ३० दिवसांचं नो शॉपिंग चॅलेंज करून पहा. मनात पक्का निश्चय करून हे सुरु करा. मग जेवढे दिवस करता येईल तेवढा प्रयत्न करून जास्तीत जास्त दिवसापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. शेवटी प्रयत्न करणं महत्वाचं आहे.

३. गरज नसलेल्या गोष्टी कटाक्षाने घेणं टाळा. प्रत्येक वस्तू खरेदीच्या वेळी खोलवर विचार करून ही गोष्ट आपल्याला आवश्यक आहे का असा विचार करूनच खरेदी करा.
४. तुमच्या खरेदीच्या व्यसनाचे मूळ कारण शोधा. आणि त्यावर शॉपिंग हा खरंच उपाय आहे का? त्याने गोष्टी सॉल्व्ह होतात का याचा विचार करा. आणि शॉपिंग ला पर्याय म्हणून दुसरी एखादी गोष्ट जी तुम्हाला उपयोगीच पडेल अशी सवय लावण्याचा प्रयत्न करा. जस की तुमच्या मूळ कारणापासून तुम्हाला लक्ष विचलित करायचं असल्यास तुम्ही पुस्तक वाचू शकता, तुमच्या महत्वाच्या कामात स्वतःला अडकवू शकता, किंवा त्या मूळ कारणाचा सामना करू शकता, जेणेकरून या सगळ्याची गरजच लागणार नाही.

५. आयुष्यात आपल्याला काय महत्वाचं आहे हे शोधा, त्यावर फोकस करा.

यातल्या सगळ्या गोष्टी निर्धाराने करून पाहायचा प्रयत्न करा. शेवटी प्रयत्नांमुळेच कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. पण त्यासाठी तुम्ही स्वतः मनाने ते सोडण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!