आपलं मानसशास्त्र

All blog posts

Explore the world of design and learn how to create visually stunning artwork.

जर कोणाला डेट करत असाल तर…प्रेमात पडणाऱ्यांनी तर नक्की वाचा !

April 3, 2019 | by आपलं मानसशास्त्र

कायम लक्षात राहणारा “लक्ष्या”…आजही हसवतो !

April 3, 2019 | by आपलं मानसशास्त्र

साधी राहणी उच्चशिक्षित विचारसरणी…याचं जिवंत उदाहरण…म्हणजे डॉ. हेमा साने !

April 2, 2019 | by आपलं मानसशास्त्र

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा????????????

April 2, 2019 | by आपलं मानसशास्त्र

विश्वास नांगरे पाटलांनी आईला भीक मागायला लावणारी मुलं शोधली !

April 1, 2019 | by आपलं मानसशास्त्र

आपली मुलं पबजी गेम का खेळतायत ?? वाचा सविस्तर !!

April 1, 2019 | by आपलं मानसशास्त्र

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलेला किस्सा त्यांच्याच शब्दात…

April 1, 2019 | by आपलं मानसशास्त्र

जर कोणाला डेट करत असाल तर…प्रेमात पडणाऱ्यांनी तर नक्की वाचा !


राकेश वरपे

(करीअर कॉउन्सिलर)

संचालक, आपलं मानसशास्त्र


खरंतरं एखाद्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर डेटवर जाणे, ही संकल्पना पाश्चिमात्य संस्क्रुतीतुन आपल्या भारतात आलेली आहे. परंतु याचा खराखुरा अर्थ अगदीच फार कमी तरुण-तरुणींना माहीत असावा. कारण सद्यस्थितीत डेटवर जाणे, याचा भलताच अर्थ सोबत बाळगून अनेक तरुण आणि तरुणी एकमेकांना डेट करण्यासाठी बिनधास्थ टाकलेल्या पहील्या पाऊलांचा अजिबात विचार करताना दिसत नाहीयेत. तसेच ज्या व्यक्तीकडून डेटची ऑफर येते, अगदी ‘स्टार्ट टू एन्ड’ त्या व्यक्तीनेच खर्चाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची म्हणे. केवळ हे शरीर माझ्यासोबत २-३ दिवस सावलीसारखे सोबत असावे, ही दडपलेली भावना डेट च्या नावाखाली मोकळी होताना दिसत आहे, आणि मुलीसुद्धा याचा खुलेआम स्वीकार करताना दिसत आहेत. कारण शॉपिंग, ट्रॅव्हलिंग आणि असे बरेच लिंग, तसेच या सर्वांसाठी खिशातून एकही रुपया खर्च करावा लागत नसल्याने आणि विशेष घरी हातपाय पसरावे लागत नसल्याने सर्व काही सुखकर म्हणून हल्लीच्या मुली हा रिस्क घेताना दिसत आहे
सदोष वैवाहिक जीवनशैली, संशयीवृत्ती, भांडण-तंटा, संघर्ष ही मोठी उदाहरणं आजकालच्या तरुण-तरुणींसमोर वाढताना दिसत असल्यामुळे कदाचित नंतर तर लग्न करायचंच आहे, म्हणून आत्ता मनमुराद जगूया, ही तरुणांची भाषा बदलत असावी. परंतु इतक्या बिकट वातावरणात सुद्धा नात्यांमध्ये सय्यमीपणा पाहायला या तरुण मंडळींकडे फार वेळ दिसत नाही. असो,
मग डेटचा अर्थ काय ?

ज्याच्याबरोबर आपल्याला संपूर्ण आयुष्य घालवायचंय, ज्याच्याबरोबर आयुष्यभर विश्वासाचं नातं जोडायचंय, ठीक आहे, प्रेम तर झालं, पण दोघांचंही व्यक्तिमत्व पाहता, आपआपसात किती जुळेल, दोघं एकमेकांशी खुलेपणाने बोलू शकतील का (अगदी सेक्सवर सुद्धा), कोणाला कधी राग येतो-कोणाला कधी शांत बसायचंय. एकमेकांच्या नातेवाईकांसकट दोघं एकमेकांना स्वीकारू शकतील का, असे बरेच खोलात रुजलेले प्रश्न आणि त्यातून जोडीदाराची मिळणारी उत्तरं, ही एकमेकांविषयी-एकमेकांसाठी केलेली चर्चा म्हणजेच डेट. ज्यामध्ये कुठलेही वचन किंवा आणाभाका नसून तर एकमेकांना समजून घेऊन पुढे कसं जाता येईल, पुढचं आयुष्य फ्लेक्सिबल कसं करता येईल, यावर समजूतदारपणे केलेली विस्तृत चर्चा असेल.

आणि एकाच डेटमध्ये जोडीदाराचा समजूतदारपणा लक्षात येऊ शकत नाही. म्हणून हे प्रमाण जोडीदारांना वाढवावे लागेल. आणि डेटचा मुख्य उद्देश एकमेकांना जास्तीत जास्त ओळखणं, समजून घेण्याची आणि सहन करण्याची क्षमता ओळखणं, तसेच जास्तीत जास्त चांगलं बोलण्यापेक्षा खरं बोलणं, हा असायला हवा, तरच आपण योग्य जोडीदार निवडण्याच्या जवळ पोहोचू.

इतकी चर्चा कोण करणार, एकाच व्यक्तीला इतक्या वेळा कोण भेटणार ते ही फक्त बोलण्यासाठी, याकडे आजकालच्या तरुणांचा ओढा वाढतोय. कारण जोडीदार काय विचार करतोय, किती समजूतदार आहे, यापेक्षा त्याचा बँक बॅलन्स किती आहे, त्याला सरकारी नोकरी आहे ना ,लग्नाअगोदर तो फ्लॅट घेऊ शकतो का, समाजात त्याचा दर्जा उंचावलेला आहे ना, तो किती तोळे दागिने घेऊ शकतो, यांसारख्या भंपक प्रश्नांना हल्ली उजाळा मिळतोय. म्हणून अगोदरच डेटच्या नावाखाली बरबटलेली आणि धरसोड वृत्तीची तरुण पिढी लग्नानंतर अनेक समस्यांना सामोरे जातात,

या धरसोड जीवनाचा मनमुराद आनंद घेतल्याने लग्नानंतर काही जबाबदाऱ्या सोडता येत नाहीत आणि सोडल्या तरी पुन्हा कोणाला धरता येत नाही, अशी गत यांची होते.

म्हणून डेटच्या नावाखाली स्वतःला हवा तसा अर्थ शोधणाऱ्या तरुणांनो आत्ताची मजा, नंतरची सजा होऊ नये , इतकी फक्त काळजी घ्या. कारण तुम्ही जे देणार तेच तुम्हाला रिटर्न मिळणार हा समाजाचा नियम कायम लक्षात ठेवा. कारण या नियमाने भल्याभल्यांना मोठं काहीतरी गमविल्यानंतर भानावर आणले आहे, म्हणून काहीतरी गमविण्याअगोदर आत्ताच भानावर या.

वयोवृद्ध जोडपं सुद्धा डेटवर जात असतात, आयुष्याच्या संघ्याकाळी एखाद्या गार्डनमध्ये, पाणीपुरी गाडीवर, समुद्रकिनारी ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि याला मी डेटच म्हणेन. कारण या वयातही एकमेकांच्या सोबतीने रंगमंचावर आपुलकीचा अभिनय करता येतो, हे ते आपल्याला नकळत शिकवत असतात. (मग घरी ते एकमेकांना शिव्या का देत असो)
अशा वेळी जे छान आहे, फक्त तेच पाहायचं, उरलं-सुरलं सोडून द्यायचं….
पण हा मजकूर वैवाहीक जोडप्यांनाच पुरेपूर लागू होईल. डेट चा खराखुरा अर्थ माहीती असलेल्यांना जोडीदार निवडताना उरलं-सुरलं सोडून देणं, हितावह असणार नाही.

आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!