आपलं मानसशास्त्र

All blog posts

Explore the world of design and learn how to create visually stunning artwork.

खास लग्न करणारे पुरुष आणि त्यांच्या आईसाठी…..

May 27, 2019 | by आपलं मानसशास्त्र

परस्त्रीच्या स्तनांकडे पाहून मनी फक्त वासनाच का येते ममता का नाही?

May 27, 2019 | by आपलं मानसशास्त्र

त्याच्या डोळ्यादेखत प्रेयसीचं लग्न झालं….

May 27, 2019 | by आपलं मानसशास्त्र

जगण्याचा वीट येऊ नये म्हणून….

May 25, 2019 | by आपलं मानसशास्त्र

आयुष्यात एकदा तरी मुन्नाभाई भेटावाच…

May 25, 2019 | by आपलं मानसशास्त्र

बालपणाची आठवण येणाऱ्या त्या प्रत्येकांसाठी !

May 24, 2019 | by आपलं मानसशास्त्र

या पेन्शन नेच वाटोळे केलंय !

May 20, 2019 | by आपलं मानसशास्त्र

मुसाफिर

खास लग्न करणारे पुरुष आणि त्यांच्या आईसाठी…..


एक दिवस “प्रशांत” कामावरून
घरी येतो, “प्रियंका” झोपलेली
असते … तिच्या पोटात दुखत
असते … ती प्रशांतला सांगायचा
प्रयत्न करते … पण त्याचे मन
दुसऱ्या कामात असते …

त्याची आई स्वयंपाक करता
करता त्याला बोलते .
“मलाच स्वयंपाक करायचा
होता, तर बायको कशाला केली,
तिला कसला कंटाला येतो …
बाकीच्या बायका नौकरीवरून
आल्यावर काम करतच नाही
का ???

“आईचे बोलणे ऐकून प्रशांत
रागात प्रियंकाला उठवतो आणि
स्वयंपाक करायला लावतो
तिचा एकही शब्द ऐकून न घेता
म्हणतो, पोटदुखल्याने माणूस
मरत नाही “।

त्याची आई आऩंदी असते,
“याला म्हणतात खरा पुरूष”।
प्रियंका ढसाढसा रडते पण
स्वयंपाक करते 7-8 लोकांचा
आणि सगळे काम करून झोपी
जाते … जेवन न करता,

प्रशांतच्या मनात राग असतो ..
म्हणून तो तिच्याशी काहीच
बोलत नाही,

ती हुंदके देऊन रडत असते,
आणि प्रशांत कानात बोळे
टाकून झोपी जातो व म्हणतो,
“कायसारख छोट्या छोट्या
गोष्टीला रडू येत तू जा बाई
एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून …

“प्रियंका रडता रडता एक
जोराचा हुंदका देते आणि शांत
होते, बर झाल एकदाची
झोपली, आता मला शांत झोप
येईल ..

सकाळी बराच वेळ झालेला
असतो। पण ती काही ऊठत
नाही, प्रशांत रूम मधून बाहेर
येतो .. त्याच्या आईची बडबड
सुरूच असते,

पण आता प्रशांत आईला
समजवायचा प्रयत्न करतो
“अग आई तिला खरच बर
नसेल,
रोज सगळ करून जाते ना ती।

शेवटी बायकोचाच झालास ना,
आता आमच कशाला ऐकशील,
आईकडे दुर्लक्ष करून प्रशांत
रूम मधे जातो प्रियंकाला प्रेमाने
हाक मारतो। 3-4 दा पण ती
काही ऊठत नाही …

तो तिला हलवतो तेव्हा त्याला
जाणवते की ती एकदम गार
पडली आहे आणि त्याला
देत नाहीये प्रतिक्रिया।

तो लगेच तिला दवाखान्यात
नेतो, डॉक्टर तिला मृत सांगतात
प्रशांतला हादरा बसतो।

#reports आल्यावर डॉक्टर
सांगतात की, #ulcer
फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला।
तुम्ही जर लगेच काल आनलं
असत तर ती वाचली असती
#body मध्ये #poision
पसरल्यामुळे रात्री 11:30 ला
तिचा मृत्यु झाला।

प्रशांतला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो।

प्रियंका सगळे नाते सोडून
माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला
समजून न घेता तिच काहीही न
ऐकता तिच्याशी असा वागलो,

माझ्यामुळे ती गेली “पण आता
तो काही करू शकत नव्हता ती
नेहमीसाठी त्याला सोडून गेली
होती … आता तीनेही त्याच्याशी
अबोला धरला होता आणि तोही
कायमचा।
,
,
मित्रहो: -व्यक्ती जिवंत असेपर्यंत
त्याची काळजी घ्या त्याला
समजून घ्या,
त्याच्या मरणानंतर रडून काही
अर्थ नाही कारण मरणानंतर
शत्रूही रडतात।

आपल्या घरातील व्यक्तिवर
खुप प्रेम करा …
आज तुम्ही त्यांना जवळ केले
तर उद्या ते तुम्हाला जवळ
घेतील ..

राग आल्यास शांततेने
समाजवा .. आज ती सुन
आहे .. उद्या तुमची मुलगीही
कोणाची तरी सुन होणार आहे …
हे विसरु नका…..

स्टोरी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरु नका……


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!