आपलं मानसशास्त्र

All blog posts

Explore the world of design and learn how to create visually stunning artwork.

पैसे किती कमवायचे आणि कोणासाठी???

February 18, 2020 | by आपलं मानसशास्त्र

आपल्या समस्येचं रूपांतर संधीमध्ये करता यायला हवं!!

February 17, 2020 | by आपलं मानसशास्त्र

आज जरा एकमेकांसाठी अनोळखी होऊया….

February 17, 2020 | by आपलं मानसशास्त्र

भोजनाचा मनावर काय परिणाम होतो? चला वाचूया!!

February 17, 2020 | by आपलं मानसशास्त्र

आयुष्य जगण्यासाठी नेमकं काय लागतं ??

February 17, 2020 | by आपलं मानसशास्त्र

आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत हे जरूरी नाही ..

February 16, 2020 | by आपलं मानसशास्त्र

हमेशा जिंदा रहो….दिलसे जवान रहो!!

February 15, 2020 | by आपलं मानसशास्त्र

पैसे किती कमवायचे आणि कोणासाठी…


वन बेडरुम फ्लँट
(written by An unintended Indian Engineer who hv lived his dream life in USA)

माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नाेकरीला लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवऴपास पुर्ण हाेत आले हाेते.

आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे. मी असे ठरवले हाेते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलाे की पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल.

माझे वडिल सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट, अन तुटपुंजी पेंशन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते. घरची, आई-बाबाची खुप आठवण यायची. एकट वाटु लागायच. स्वस्तातल एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना काँल करत हाेताे. दिवस वार्‍यासारखे उडत हाेते. दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.

लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली. मी खुश हाेताे, आईबाबांना भेटणार हाेताे. नातेवाईक व मित्रांसाठी खुप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या हाेत्या. त्याही राहुन गेल्या.

घरी पाेहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फाेटाे मी पाहिले, वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडिल समजुतदार हाेते. दाेन दिवसात माझे लग्न लागले. खुप सारे मित्र येतील अस वाटत असताना फक्त बाेटावर माेजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर टेकवले. “आम्हाला तुझे पैसे नकाे पाेरा पण वरचेवर भेटायला येत जा ” अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खाेल गेला हाेता. बाबा आता थकले हाेते, चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत हाेत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पाेहचलाे.

पहिले दाेन वर्ष बायकाेला हा देश खुप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत हाेत. बचत कमी हाेऊ लागली पण ती खुश हाेती. हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल. कधीकधी ती आठवड्यातुन दाेनदा किंवा तिनदा भारतात फाेन करु लागली. दाेन वर्षानी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचाे तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे हाेते.

दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचाे. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागन वर्ष सरत हाेती, भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले हाेते. एक दिवस अचानक आॅफीस मधे असताना भारतातन काॅल आला, “माेहन बाबां सकाळीच गेले रे”. खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही, अग्निला तर साेडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उदविग्न झालेल. दहा दिवसात दुसरा काॅल आला, आईची पण प्राणज्याेत मालवली हाेती. साेसायटीतील लाेकांनी विधी केले, नातवंडाचे ताेंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले हाेते.

अाईबाबा जाऊन दाेन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पाेकळी तयार झालेली, आईबापाची शेवटची ईच्छा , ईच्छाच राहिलेली.
मुलांचा विराेध असताना भारतात येऊन स्तिरस्थावर हाेण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात हाेती. राहण्यासाठी घर शाेधत हाेताे पण आता पैसे कमी पडत हाेते नवीन घर ही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत अालाे. मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलाे.

मुले माेठी झाली, मुलीने अमेरिकी मुलासाेबत लग्न केल. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहताे. मी ठरविले हाेते आता पुरे झाले, गाशा गुंडाळुन भारतात आलाे. चांगल्या साेसायटीत ‘ दाेन बेडरुमचा’ फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे हाेते. फ्लॅटही घेतला.

आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या ‘दाेन बेडरुमच्या’ फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहताे. उरलेल आयुष्य जिच्यासाेबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव साेडला.

कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटाेप केला ताे कशासाठी? ? याचे माेल ते काय? ?

माझे वडील भारतात राहत हाेते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट हाेता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले, मुलांना साेडुन आलाे, बायकाेपण गेली.

खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते, त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात.
अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फाेन येताे ते माझ्या तब्येतीची चाैकशी करतात, अजुनही त्यांना माझी अाठवण येते यातच समाधान आहे.

आता जेव्हा माझा मृत्यु हाेईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांच भल कराे.

पुन्हा प्रश्न कायम अाहे. हे सर्व कशासाठी अन काय किंमत माेजुन.

मी अजुनही उत्तर शाेधताेय.

फक्त एका बेडरुम साठी?
जगण्याचे माेल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!