Skip to content

पुष्कळ पैसा, गाड्या अनुपयोगी..घरातली म्हातारी माणसं हसत असतील तरच घर श्रीमंताचं!

पुष्कळ पैसा, गाड्या अनुपयोगी..घरातली म्हातारी माणसं हसत असतील तरच घर श्रीमंताचं!


मयुरी महेंद्र महाजन


अनामीक स्पर्धेच्या जगात तुम्ही आम्ही सर्वच धावतोय, बरं कशासाठी धावतोय ते मात्र अद्यापही आपल्या लक्षात येत नाही, बदलत जाणाऱ्या जगाबरोबरचे बदल आपण स्वीकारले नाहीत, तर कुठेतरी आपण मागे राहू याची आपल्याला चिंता आहे ,जसं जसा काळ बदलला, वेळ बदलली तशी माणसे सुद्धा बदलली, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अपडेट झाली,

आणि ज्याच्याकडे जितका जास्त पैसा तितका तो व्यक्ती मोठा अशी चुकीची गृहितक इतकं घट्ट होत गेली, आणि त्याचाच परिणाम माणसे एकमेकांपासून दुरावली ,आणि भौतिक गोष्टींच्या जास्त जवळ आली, आणि त्यातच गुंतत गेल्याने फक्त हेच विश्व आहे, हेच आपले जग आहे, इतकी मर्यादित आपली जीवनशैली ठरवण्यात व्यक्तीने कुचराई केली नाही.

सुखाच्या व्याख्यांना असंख्य संकल्पना दिल्या गेलेल्या आहेत, आता त्या सुखाची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाणाऱ्या आहेत,

जगण्यासाठी पैसा हा लागतोचं, परंतु तो किती???? याचे उत्तर मात्र द्यायला थोडासा विचार करावा लागेलं, कारण पोटापाण्याची सोय अगदी थोडक्यात भागून पण होतेचं, परंतु ज्या भौतिक सुख वस्तू आहेत, ज्याच्या मागे चाललेली घोडदौड मात्र व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही, बरं खूप पैसा गाडी बंगला ऐश्वर्य मिळवलं तरी समाधान नाहीचं,

आणि मला तरी असं वाटतं की आपण काय नवीन करतोय, पैसा मिळवला प्रतिष्ठा मिळवली, खूप मोठा वैभव मिळवलं, लग्न केलं मुलं बाळं झाली, निघून गेलो ,आपण कमावलेली संपत्ती , ऐश्वर्य किती वर्षे चालणार आहे ,पाच वर्ष दहा वर्ष बसं, याच्यानंतर कुणाला आपले नाव सुद्धा लक्षात राहणार नाही, पैशांच्या मागे धावून व्यक्ती आपलं काहीतरी जग आहे, ज्या जगात आपली माणस आहेत, हे सुद्धा विसरून जातो,

आपले कुटुंब असेल मित्रपरिवार असेल सर्वचं, ज्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आपण त्या शिदोरीची सोय करतोय, त्याचं कुटुंबासाठी थोडा वेळ काढून कधीतरी मन मोकळ हसावं, एकमेकांची सुखदुःखे वाटावी बघा ते क्षण पैशांपेक्षाही सोनेरी क्षण आयुष्यात जास्त आनंद देऊन जातीलं,

म्हातारी माणसे सुकलेल्या झाडासारखी असतात, त्यांना फक्त आपल्या मायेच्या प्रेमाचे खतपाणी पाहिजे, असते ती पुन्हा डोलू लागतात, भरू लागतात अगदी आनंदाने ,आपली पिढी स्वतंत्र विचाराची आहे, एकमेकांपासून विभक्त झालेली आहे, आज जर आपल्या घरात म्हातारी माणसे असतीलं, तर अजूनही आपण खूप सुखाच्या पर्वत आहोत ,आणि त्यांच्या चेहर्‍यावर हसु असेल ,तर तुमच्या इतके श्रीमंत येथे कुणीच नाही.

पैसा गाडी बंगला या सर्व सुख सोयी उपलब्ध असतील परंतु घरी जर कोणी तुमची वाट पाहणारं नसेलं, प्रेमाने कोणी तुमची विचारपूस करणार नसेलं, तुमच्या भावना तुम्हाला मांडता येतील अशी जागा जर आयुष्यात नसेल, तर मिळवलेले वैभव सुद्धा मातीमोल आहे, असुनही नसल्यासारखे आहे, कशासाठी आणि कुणासाठी मिळवलं हा प्रश्न पडत असेलं,

एक महान व्यक्ती असे म्हणतात मी मिळून सुद्धा मिळवू शकलो नाही, आणि जे मिळवलं त्याचा आनंद घेऊ शकलो नाही, कारण मिळवताना फक्त वस्तू दिसल्या आणि गमावता फक्त माणसे दिसली, जे कमावलं त्याचा हिशोब लावत बसलो ,तेव्हा कळालं मला, कमावलं काहीच नाही, पण गमावलं मात्र बरच काही,

जोपर्यंत आपल्याला म्हाताऱ्या माणसांची सोबत आहे तोपर्यंत ते हात सुटू नयेत ,तोपर्यंत तरी आपण जपायला हवेत, ही वेळ आहे, अगदी बर्फ वितळला सारखे आयुष्य वितळण्या अगोदरच आपण जगायला हवे, खऱ्या अर्थाने, की जाताना डोळ्यात कर्तव्याचे अमाप समाधान असेल..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पुष्कळ पैसा, गाड्या अनुपयोगी..घरातली म्हातारी माणसं हसत असतील तरच घर श्रीमंताचं!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!