Skip to content

आजपासून कुणावरही विश्वास ठेवणार नाही हे ठरवून जगलेल्या लोकांचा प्रोग्रेस रेट खूपच डाऊन आहे.

आजपासून कुणावरही विश्वास ठेवणार नाही हे ठरवून जगलेल्या लोकांचा प्रोग्रेस रेट खूपच डाऊन आहे.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणसाच्या आयुष्यात जसं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत तसेच नातेसंबंध, प्रेम, आपुलकी तितक्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. जगायला जसं योग्य प्रमाणात अन्न व राहायला घर, कपडे हे सर्व लागतं तसंच चांगली नाती, जिव्हाळा हे ही लागतच. ह्या सगळ्यातून माणसाच आयुष्य समृद्ध होत असतं. नातेसंबंध माणसाला आधार मिळवून देत असतात.

पण एकूणच पूर्ण आयुष्यात वावरत असताना, जगत असताना आपल्याला फक्त चांगलेच माणूस भेटेल असे नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमाने सर्व प्रकारच्या माणसांचा अनुभव आपल्याला येत असतो. हे अनुभव आपल्याला शिकवत असतात. त्यातून योग्य तो धडा घेऊन आपण पुढे जायचं असतं.

पण काही लोक मात्र असं करत नाहीत. जे काय वाईट अनुभव येतात लोकांच्या बाबतीत ते कटू अनुभव येतात ते सर्व ते सर्वांना लावून मोकळे होतात. म्हणजेच काय तर एखाद्या माणसाने फसवलं किंवा विश्वास तोडला तर त्यांना वाटतं सर्व माणसं अशीच आहेत. सर्व माणस चुकीची आहेत आणि मग त्यांचं मत असं होतं की कोणावर विश्वास ठेवायचा नाही. ह्यात ते विचारांची चूक करत असतात ज्याला overgeneralization म्हणजेच एखाद्या गोष्टीच अतिसामान्यीकरण करण म्हणतात.

थोडक्यात एखादी व्यक्ती चुकीचे वागली असेल तर सगळे असेच असतात असं वाटतं व कोणावरी विश्वास ठेवायचा नाही असे म्हणून ते पुढे जायचे ठरवतात. पण यातून फायदा कमी आणि नुकसान जास्त आहे. कारण व्यक्ती कधीही पूर्ण एकटी नसते. आयुष्यभर कोणाच्या ना कोणाच्या संपर्कात असतेच.

अशामध्ये नाते तयार करण, जपणं हे सर्व महत्त्वपूर्ण कार्य बजावतात आणि जेव्हा माणूस कोणावर विश्वास ठेवणार नाही म्हणतो तेव्हा होतं अस की जे लोक त्यांच्याशी चांगले वागतात त्यांच्यावरही संशय घेतला जातो. यातून नातेसंबंध खराब होतात. अस समोरच्या माणसाला संशयाने पाहिलं व त्याप्रमाणे वागणं आपण शेवटी एकट पडण्याची शक्यता वाढते.

मोठमोठ्या कंपनी, बिजनेस हे तिथे असलेल्या मॅनपावर ने चालतात. अशा वेळी जर आपण समोरच्या विश्वास दाखवला नाही तर आपल्या कामावर परिणाम होतो प्रोग्रेस रेट कमी होतो. कामगार जेव्हा संपावर जातात तेव्हा बिझनेस बऱ्याचदा होत्याचा नव्हताही होतो. असं का होत? कारण विश्वास.

मालक आणि त्यांच्या कामगारांमध्ये चांगल नात असेल, योग्य तो विश्वास असेल तर अस कमी होत. हा विश्वास आपण निर्माण करावा लागतो. कारण आपण कितीही म्हटलं की सर्वकाही एक करू शकतो पण असं कधी होत नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामी येत असते. तिची मदत होत असते. अशा वेळी विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कारण नातेसंबंध याचा मोठा भाग हा विश्वासाने व्यापलेला आहे. तुम्ही जर समोरच्यावर विश्वास दाखवला तर ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी करण्याची शक्यता वाढते. अविश्वासाने काही साध्य होत नाही.

म्हणून आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवावा का? तर नाही. इथे आलेल्या अनुभवांतून माणसाची पारख करता आली पाहिजे. यात सर्वांना एकाच तराजूत बसवणं योग्य नाही. खरं कोण खोटं कोण हे समजलं पाहिजे. अनुभवातून शहाण झाला पाहिजे. जर आपल्याला काही मोठे सध्या करायचे असेल, काही उभारायच असेल तर इथे मनुष्यबळ पाठबळ लागतं.

आणि त्यासाठी लागतो विश्वास. संशयी व्यक्ती सोबत कोणीही राहत नाही म्हणून जर चांगली कामगिरी करायची असेल कामाच्या ठिकाणी प्रोग्रेस वाढवायची असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवणं, विश्‍वासात घेण खूप महत्वाच आहे. याच गोष्टी आपल्या पुढील कामी येतात आणि फायद्याच्या ठरतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आजपासून कुणावरही विश्वास ठेवणार नाही हे ठरवून जगलेल्या लोकांचा प्रोग्रेस रेट खूपच डाऊन आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!