Skip to content

तुमच्या आयुष्यवर कोणाचीही जबरदस्ती होऊ देऊ नका.

तुमच्या आयुष्यवर कोणाचीही जबरदस्ती होऊ देऊ नका.


सोनाली जे.


व्यक्ती म्हणले की कुटुंब आले , समाज , नातेवाईक, रीती रीवज , कायदे – कानुन या सगळ्या गोष्टीतून त्याला जावेच लागते. आपण लहान असतो तेव्हा आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपले आई वडील घेत असतात.अर्थात तेव्हा आपल्याला कशाची जाण नसतेच..

हळूहळू मोठे होवू लागतो तेव्हा अनुभव येवू लागतात, समज येवू लागते. तेव्हा आठवीत subject निवडी पासून , class निवडी पर्यंत काही जन आपले निर्णय घेतात.. तर काहींना बरेचदा तेही माहिती नसते..किंवा ते करून घेत नसतात..अशा वेळी पालक जो निर्णय घेतील तोच फायनल असतो.

१. निर्णय घेण्याची सुरुवात कुठून होते तर दहावी नंतर कोणती Stream निवडायची? सायन्स , कॉमर्स , आर्ट्स किंवा अजून काही वेगळे ऑप्शन्स ..नंतर इंजिनियरिंग, मेडिकल , असे वेगवेगळे ही.

काही मुले प्रचंड हुशार असतात सगळ्या विषयात त्यामुळे पालक त्यांना सायन्स ला च जायचे असे जबरदस्ती निर्णय थोपवितात .पण तेव्हा आपल्या मुलांचा कल कुठे आहे, आवड काय आहे, त्यांना काय करायचे आहे पुढे जावून याचा विचार करत नाहीत..किंवा काही वेळेस मुले average ही असतात आणि पालक हीच साईड निवडायची म्हणून अट्टाहास करतात तेव्हा आपल्या मुलांची नक्की कुवत काय हे लक्षातच घेत नाहीत.

तरी जबरदस्ती पालक मुलांचे निर्णय घेतात..तेव्हा सुरुवातीला हुशार असणारी मुले ही अभ्यासात मागे पडू लागतात. तसेच मुलांनी जरी एखादी stream निवडली असेल पण त्यात जेव्हा लक्षात येते की नाही हे आपल्याला जमत नाही तरी केलेच पाहिजे , पर्याय नाही असे कोणतेही विचार करू नयेत..

किंवा जबरदस्तीने आता निवडले आहे हे पूर्ण करावेच लागणार पर्याय नाहीत असे समजू नका..पर्याय असतात ..सायन्स मधून ही आर्ट्स , कॉमर्स ही निवडू शकता , अगदी इंजिनिअरिंग मधून वाटले नाहीच जमत तरी ही इतर पर्याय असतात..फक्त आयुष्यात कोणत्याच गोष्टी जबरदस्तीने करू नका, मग स्वतचं निर्णय घेतला म्हणून ही किंवा इतर कोणी ठरविले म्हणून ही..वेळीच निर्णय घेण्यास शिका…

आणि हो ही वेळ म्हणजे तरी काय ? आपण सगळे एखाद्या रेस मध्ये , स्पर्धेत उतरल्या सारखे कायम धावत असतो, का? का घाबरतो आपण? आपले आई वडील? तर आपल्या बरोबरची मुले पुढे जातील …आपण मागे राहू म्हणूनच ना…पण विचार करा ना हे आयुष्य सतत स्पर्धा पार करण्यासाठी आहे का?? तर नाही..

कित्येक अशिक्षित लोक ही आयुष्यात यशस्वी झाले आहेत , आनंदी आहेत जसे सिंधुताई सपकाळ.. असे म्हणत नाही की म्हणून अभ्यास करायचा नाही , शिक्षण घ्यायचे नाही..पण आयुष्यात एखादे वर्ष गेले आपण मागं राहिलो तरी फार मोठे काही नुकसान नाही.

आयुष्य खूप मोठे आहे , ताण , तणाव , चिडचिड , काळजी करून किंवा अपयशी होवून जीवन त्रासिक करू नका .कोणत्याच गोष्टी जबरदस्तीने करू नका..पर्याय असतात मार्ग असतात ते शोधा..मदत घ्या कोणाची .

२. नोकरी किंवा व्यवसाय निवड … नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही ची निवड करताना विचारपूर्वक करा..त्यात ही कोणाची जबरदस्ती होवू देवू नका..कोणी सांगते म्हणून त्यांचे निर्णय अंतिम नकोत.किंवा जरी नोकरी किंवा व्यवसाय निवडला आणि त्यात कामाचा ताण जास्ती असेल, काम तुमच्या शिक्षणाच्या आणि क्षमते पेक्षा कमी कुवतीचे किंवा जास्त ही क्षमतेचे असेल तरी तुम्हाला त्यातच आयुष्यभर अडकून राहण्याची जबरदस्ती नाही..

तसेच व्यवसाय ही .त्यात अपयश येत असेल तोटा होत असेल किंवा इतर ही अनेक आपल्या हाताबाहेर ची कारणे असतात तरी तोच शेवटपर्यंत करायची हा जबरदस्ती अट्टाहास करू नका..तो ही अजून जास्त मानसिक त्रास , आर्थिक नुकसान होंवून गोष्टी हाता बाहेर जण्या आधीच सांभाळा..

३. मित्र – मैत्रिणी , नातेवाईक , घरचे यांचा पगडा…बरेचदा मित्र मैत्रिणी म्हणतात चल आज लेक्चर बंक करू..बाहेर फिरायला जावू ..movie बघू ..किंवा त्यापुढे जावून आजकाल तर माहिती च किती स्वातंत्र्य ..पार्टीज ,ड्रिंक्स आणि त्यापुढे जावून ही अनेक गोष्टी..यांचा force करत असतील. तसेच घरचे कुठे जायचे किंवा एखादी गोष्ट करायची म्हणून force करत असतील.

अगदी प्रियकर प्रेयसी नात्यात ही बरेचदा प्रेमाचे रूपांतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही जबरदस्ती केली जाते.. साध्या साध्या गोष्टीत ही जसे खान पान , पेहराव , वापरायच्या वस्तू , रंग यांचे ही निर्णय दुसरे कोणी आपल्यावर जबरदस्तीने थोपवू नयेत त्या गोष्टी आपल्या आपण आवडीने कराव्यात ..

एखादी गोष्ट करणे इतरांनी सांगितले असे कॉम्बिनेशन try कर असे suggestion दिले असेल ते एखादे वेळी करून बघणे वेगळे पण आपण आपल्याला आवडते ते करणे त्यात आनंद , सुख , समाधान आणि आपली creativity असते त्यातून उत्साह आणि मानसिक समाधान मिळते.

अगदी आपण नास्तिक असू आणि घरच्यांनी देवाचे करण्याची जबरदस्ती करणे चूकच..नास्तिक मध्ये देवळात जाणे अमान्य असेल परंतु जे वेद पठण, मंत्र , श्लोक याचा अर्थ आणि ते कुठे वापरायचे याचे ज्ञान असेल तर कोणाच्या जबरदस्तीने होम हवन किंवा देवळात जायलाच पाहिजे असे नाही..

तुम्ही घरात बसून ही मंत्र पठण जपजाप्य करू शकता. एक आहे की जेव्हा देवळात जण्यचा अट्टाहास असतो तेव्हा तिथले वातावरण किंवा सतत आणि सामूहिक पठण यातून वातावरणांत निर्माण झालेले positive Vibes अस्तात.

पण तेच तुम्ही घरी बसून ही positive feel करत असाल तर तुम्ही कुठे जाणे येणे यात कोणी जबरदस्ती करू शकत नाही..आणि ती तुम्ही स्वीकारणार ही नाही.

४. लग्न ..जोडीदार निवड.. लग्न हा. हिंदू धर्मात संस्कार मानला जातो आणि त्याही पेक्षा ती गरज ही ..की मग पुढची पिढी जन्माला घालण्यापासून ते आयुष्यात आई वडील , भावंडे आयुष्यभर पुरू शकणार नाहीत म्हणून कायमचा जोडीदार असावा जो किंवा जी काळजी घेईल .आवडी निवडी जपेलं,. साथ देईल,

पण काही वेळेस आई वडील जबरदस्तीने जोडीदार आपल्या करिता निवडतात..तोच किंवा तीच योग्य हे पटवितात परंतु हे आयुष्याचे निर्णय आहेत त्यामुळे ते शक्यतो विचारपूर्वक आणि आपल्या इच्छेने च घ्यावेत..

काही वेळेस अगदी जबरदस्तीने लग्न झाली तरी ही पुढे जावून मतभेद झाले तर कायम त्याच जोडीदारासोबत राहावे असे compulsion नाही .
याउलट आपल्या इच्छेने लग्न झाले आणि किंवा प्रेम विवाह ..तरी ही जेव्हा दोन भिन्न व्यक्ती कायमच्या एकत्र येतात तेव्हा त्यांना जवळून बघता येते जसे त्यांच्या आवडी निवडी , वागणे , स्वभाव किंवा इतर ही गोष्टी ज्या लग्नानंतर गरजेच्या असतात.

शारीरिक संबंध असतील, आर्थिक स्थैर्य , मानसिक संतुलन, किंवा त्याहून एखादा व्यसनी असेल आणि ती तडजोड करणे शक्य नसेल तर आयुष्यभर जबरदस्तीने एकत्र राहण्याचा अट्टाहास सोडून द्यावा..त्यात ही जे योग्य पर्याय असतील ते निवडावेत..

याखेरीज सध्याची आर्थिक परिस्थिती , , शारीरिक क्षमता, भविष्यकालीन गोष्टींचे विचार करून मूल होवू देणे का नाही हे निर्णय ठरवू शकता..त्यात ही जोडीदाराची जबरदस्ती नको .

६. मेडिकल प्रोब्लेम किंवा आरोग्य समस्या..काही वेळेस लहान वयात ही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात किंवा कोणत्याही वयात निर्माण होतात तेव्हा शरीर साथ देत असते आणि जर डॉक्टर किंवा घरच्या कोणी जबरदस्तीने आरोग्य विषयी निर्णय घेतले तर त्यांना तसे घेवू देवू नका ..अगदी ताबडतोब ऑपरेशन करायची जबरदस्ती केली तरी जर तुमची मानसिकता नसेल तर थोडा वेळ मागून घ्या किंवा अजून दुसऱ्या डॉक्टरांचे मत घ्या..पर्याय शोधा..पण इतरांच्या करिता कोणती गोष्ट जाबरदस्तीने करू नका..तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी , साथ , पैसा यांची तजवीज याचे विचार करून पुढे जा..

७. रिटायरमेंट…निवृत्ती चे एक ठराविक वय असते पण काही वेळेस असे होते की आपली कर्तव्य संपतात .शरीर कधी साथ देत नाही..कधी कामाचे व्यवस्थापन जमत नाही तसे कधी कामाचा ताण सहन होत नाही तेव्हा जबरदस्तीने तेवढी वर्ष काढलीच पाहिजेत असे बंधनकारक नाही ना?? तुम्ही तुमच्या करिता तुमचे निर्णय बदलू शकता. निर्णय घेवू शकता.

८. समाज..समाज हा आपल्या सारख्या लोकांनीच मिळून बनलेला आहे ना ..मग समाज कोण आपल्या वर जबरदस्ती करणारा? त्यांच्या मतानुसार वागायला भाग पाडणारा? तुम्ही तुमच्या क्षमता सिध्द करा..असामान्य लोक हे सुरुवातीला सामान्य च असतात त्यातून त्यांचे वेगळेपण ते टिकवून ठेवतात त्याचा ध्यास घेतात..किती ही विरोध झाले , जबरदस्ती झाली तरी ते त्यांच्या विचार आणि निर्णय यावर ठाम असतात.

जसे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण , विधवा विवाह त्याकरिता प्रयत्न केले शाळा काढल्या तेव्हा त्यांना विरोध केलाच ना लोकांनी..तेव्हा समाजात राहायचे असेल तर हे सोडून द्या अशी जबरदस्ती नाही तर मग अगदी त्यांच्यावर शेण सुधा फेकले .पण तरीही ते तटस्थ राहिले..कोणाची ही जबरदस्ती सहन केली नाही म्हणून तर प्रगती होवू शकली.. क्रांती तेव्हाच घडते जेव्हा काही तरी वेगळे विचार, निर्णय घेवून , विरोध पत्करून पुढे जातो.

आयुष्यात इतरांच्या आवडीनिवडी किंवा मते जपा पण आपल्या आयुष्यावर कोणाचा ही पगडा येवू देवू नका..कोणाची जबरदस्ती नको..
आपल आयुष्य जगताना , निर्णय घेताना आपण चुकलो तरी त्यातून अनुभव मिळतील जे यशस्वी वाटचाली करिता उपयोगी पडतील.
आयुष्य फुलपाखरां सारखे मोकळे पणाने आणीन स्वच्छंदी जगा .आनंद , सुख , मानसिक शांतता , किंवा अगदी दमून भागून आल्यावर सुखाने झोप लागणे हे ही आपले यशस्वी जीवन च आहे.

दुसऱ्यांच्या जबरदस्तीने मारून मुटकून आपले जीवन जगू नका..प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व भिन्न , आवडी निवडी भिन्न, त्याप्रमाणे जगा..
आयुष्य खूप सुंदर आहे.भरभरून जगा. उद्याचे माहिती नाही म्हणून प्रत्येक दिवस भरभरून जगा.आणि उद्याचा ही दिवस उगविनार याची खात्री असते म्हणून तर काही कामे उद्या वर ही सोपवितोच की आपण. म्हणजेच काय कायम सकारात्मक रहा..

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!