Skip to content

कोणत्याही नात्यात जर एकच व्यक्ती सारखी समजून घेत असेल तर…

कोणत्याही नात्यात जर एकच व्यक्ती सारखी समजून घेत असेल तर…


सोनाली जे.


नाती म्हणली की डोळ्यापुढे येते ती रक्ताची च नाती जसे आई वडील , भावंडे ..पण असे काहीच नाही..नाती मैत्रीची असू शकतात, नवरा बायको, प्रियकर प्रेयसी , नाती शेजाऱ्यांच्या बरोबर आपुलकीची असू शकतात..मानसिक धैर्य देणारी किंवा सर्व दृष्टीने मदत करणारी असतात.

कोणतीही नाती असोत ती दोन्ही बाजूने strong पाहिजेत..काही वेळेस असे होते की नात्यात एकच व्यक्ती सतत समजून घेत असते आणि समोरच्या व्यक्तीयला ती सवय होवून जाते..किंवा त्यापूर्वी असेही घडले असू शकते की ती दुसरी व्यक्ती पूर्वी समजून घेत असेल पण ते इतके वेळा झाले असेल समजून घेणे की आता परत ती समजून घेण्याची क्षमता शिल्लक नसते..मानसिकता नसते.त्यामुळे सतत समोरची व्यक्तीचं समजून घेते असेही होवू शकते.

पण आज आपण या एकाच विषयावर बघुया की कोणत्याही नात्यात एकच व्यक्ती समजून घेत असेल तर काय ..

१. असे काय कारण असते की ती कायमच समजून घेते :-

काही वेळेस वय जरी लहान असेल तरी अनुभव एव्हढे असतात की आपल्या व्यक्तीला ..नात्याला संभाळणे जास्त महत्वाचे वाटते. काळ आणि वेळ जरी बदलत गेले तरी जेव्हा एकत्र असतो किंवा होतो तेव्हाच्या आठवणी , भावना , काही गोष्टी शिकल्या असतील त्या सगळ्यांचं गोष्टींचा मनावर पगडा असतो की त्या सकारात्मक गोष्टीचं नाती उत्कृष्ट सांभाळतात.

२. काही व्यक्ती अशा असतात की एकदा नाते मानले की ते आयुष्यभर सांभाळणार च..

अशा काही व्यक्ती असतात की एकदा आपले म्हणले की शेवटपर्यंत आपलेच म्हणणारे ..मानणारे..उदाहरण बघायचे झाले तर दोन मैत्रिणी हे मैत्रीचे नाते, एकत्र असल्या की अभ्यास , बाहेर फिरायला जाणे , किंवा अगदी जेवण पण कोणाच्या ही एकीच्या घरी.. ..त्यातली एक कायम स्पोर्ट्स मध्ये नॅशनल लेव्हल वर खेळणारी दुसरी मात्र खूप sincere अभ्यासू.

ही खेळाडू मैत्रीण बाहेर गेली कधी खेळायला तरी तिच्या वह्या वेळेत पूर्ण करण्याचे काम ही दुसरी मैत्रीण करायची..कधी पूर्ण नाही करू शकली तर ही दुसरी मैत्रीण चिडत असे , रुसत असे मग हीच अग मी देते पूर्ण करून वेळेत म्हणून रात्र रात्र जागून पूर्ण करून वेळेत तिच्या वह्या देत असे..

अशा एकच नाही अनेक गोष्टीवरून त्यांच्या मध्ये वाद होत असत ..फोन का करत नाही ..बाहेर का येत नाही.. मग ती खेळाडू मैत्रीण अबोला धरायची..ही अभ्यासू मैत्रीण सगळे सोडून परत फोन करायची अभ्यास , घरची कामे यातून वेळ मिळत नाही ..प्रत्येक वेळी sorry म्हणुन तिला मनवत असे.

का बरं असे होत असेल तर नाती जपणे टिकविणे ही एक कला आहे..त्या मैत्रिणीने रुसून , रागावून, चिडून आपल्या भावना व्यक्त केल्या तरी ही शांतपणे , समजुतीने घेत असे ..

स्वभाव असतो काहींचा टिकविण्याचा.काही लोक पटकन react होतात, चिडतात, पण पटकन सगळे विसरून sorry ही म्हणतात कारण रागाच्या भरात बोललो तो आवेश , किंवा आवेग ओसरला की चूक समजते आणि माफी मागून परत नाती जपणे हा स्वभाव ही असतो
नाती ही जुळणे आणि त्याहून टिकविणे हे खूप अवघडच.

नाती म्हणा , वाद , भांडणे म्हणा यात दोघेही भांडायला लागले किंवा दोघेही समजून घेण्याच्या मनस्थिती मध्ये नसतील तर वाद , भांडणे कधीच संपणार नाहीत किंवा नाती ही टिकणार नाहीत .

त्यातल्या त्यात जी समजूतदार व्यक्ती असते..चांगले वाईट याचे तारतम्य असते..समोरच्याच्या शंभर चुका असतील तरी त्यातले चांगले बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असेल, maturity असेल तर ती कायमच समजून घेईल ..किंवा पूर्वी कधी चुकून नाती दुरावली गेलीं असतील किंवा तसे अनुभव असतील तरीही ती नाती जपण्याचा च प्रयत्न करते.

नात्यातली वीण घट्ट होण्याकरिता काही अशा अचानक घडणाऱ्या घटना ही कारणीभूत असतात..एखादा अपघात किंवा इमर्जंसी प्रसंगी समोरच्याने खूप मदत केलेली असते.मग आर्थिक असेल मानसिक आधार असेल किंवा इतर सगळी धावपळ असेल तर समोरची व्यक्ती ते कधीच विसरत नाही .एक वेळ आनंदात नाही पण दुःख आणि त्यात सामोरच्याने आपलेपणाने जपलेले नाते सर्वश्रेष्ठ वाटते. किंवा वाद होणे न पटणे एकीकडे आणि त्याही पेक्षा खूप जास्त आपुलकी असेल , प्रेम असेल , आत्मीयता असेल , आणि जाणीव तर ते नाते अधिक चांगल्या प्रकारे टिकवावे असेच वाटते.

बरेचवेळा एकच व्यक्ती सतत नाते टिकविण्याचा प्रयत्न करत असते..तिला जशी गरज असते टिकविण्याची तशी दुसरी व्यक्ती दाखवत ही नसेल..किंवा तेवढी maturity नसते .नाती काही खेळणे नाही किंवा एखादी निर्जीव वस्तू नाहीत आज खेळून झाले वापरून झाले सोडून द्या ..टाकून द्या..मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे ..दैनंदिन व्यवहार हे काही अंशी नात्यावर आधारित आहेत ..

बघा ना आपल्याकडे दूध टाकणारा दूधवाला तो व्यवहार ..म्हणजे पैसे कमवायचे आणि आपण आपल्या गरजा पूर्ण करायच्या म्हणून ही जरी आपल्याकडे दूध टाकत असेल आणि चुकून एखाद्या वेळी विसरला च दूध टाकायचे तर आपण फोन करून विचारतो तो विसरलोच म्हणाला आणि शक्य असेल तर परत येतो दूध देवून जातो..नसेल तर माफी मागतो ..किंवा सरळ म्हणतो की आज राहू देत उद्या देतो ..पण म्हणून त्याच्या या चुकी करिता आपण त्याला काढून टाकतो का? नाही , तर एखाद्या वेळेस गडबडीत , विचारांमध्ये झाले असेल चुकून असे म्हणून माफ करत असतो..

तसेच आहे नाते ज्याला मनापासून समजले तो ते टिकविण्याचा च प्रयत्न करतो कारण विचार करण्याची कुवत किंवा क्षमता त्याच्यात असते.. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची किंवा त्यांचा आवेग कंट्रोल करण्याची मानसिकता असते.अनुभव असतो..विचार असतात. त्या दृष्टीने बौद्धिक डेव्हलपमेंट घडविलेली असते.

पण नेहमीच एक च व्यक्ती समोरच्या व्यक्तीला नाते टीकविण्याकरिता समजून घेत असेल तर समोरच्या व्यक्तीला ती सवयच होवून जाते की आपण कसेही वागलो तरी ती आपल्याला ती व्यक्ती समजूनच घेणार ..गृहीत धरते..आणि आहे त्या गोष्टींचा विचार करणे ही सोडून देते कारण काही झाले तरी समोरचा / ची सांभाळून घेणारच आहे हा विश्वास आणि अनुभव असतो त्यामुळे निर्धास्त असते किंवा विचार करून त्यावर किंवा भावना यावर नियंत्रण ठेवत नाही .

गरज पडेल तेव्हा आहे खात्री च असते मग कोणत्याही वेळ प्रसंगी सोबतच असणार ..हा विश्वास असतो. पण नाती म्हणजे केवळ गरजे पुरते जवळ येणे नाही ना? ?

समोरचा समजून घेतो म्हणून आपल्या चुकांकडे दुर्लक्षच केले जाणार कायम..इग्नोर केले जाणार..किंवा परत त्यात काय एवढे मोठे केले त्याने सांभाळून घेतले तर..असा attitude निर्माण होईल.

नाते हे रबरासारखे असते एखाद्याने च धरून ठेवावे तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते..एकाच व्यक्तीने सतत चे समजून घेतले तर तुटण्याची शक्यता जास्त असतें.

कायमच समोरच्याला समजून घेताना कधी तरी आपल्याही मर्यादा संपतात…त्याचे बांध तुटतात आणि अशावेळी मग समजून घेणे खूप अवघड होते.नाती जपणे किंवा टिकविणे ही अवघड जाते.त्यामुळे समजून घेणाऱ्याला ही काही मर्यादा आहेत हे लक्षात घ्या आणि स्वतः ही नाती जपण्याचा प्रयत्न करा.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!