Skip to content

ज्या गोष्टीची चिंता, भिती वाटते, तीच मानगुटीवर का येऊन बसते?

ज्या गोष्टीची चिंता, भिती वाटते, तीच मानगुटीवर का येऊन बसते?


सोनाली जे


अगदी जुनी म्हण आहेच की भीत्या पाठी ब्रह्मराक्षस..!!

बरेचदा बघितले आपण ज्या गोष्टींची भीती किंवा चिंता आपल्याला वाटत असते त्याच गोष्टी आपल्या बाबत घडत असतात. शाळेत असताना आपण शाळेचा गृहपाठ करायचा कंटाळा करतो किंवा एखाद्या दिवशी खरेच आपल्याकडून चुकून विसरतो तेव्हा वर्गात गेल्यावर तास सुरू झाल्यावर आठवते की अरे रे हा गृहपाठ राहिला आहे , आता शिक्षक ही आपल्यालाच विचारणार याची भीती वाटू लागते..

आणि तेव्हा अचानक खरेच बाकी सगळे सोडून आपल्यालाच शिक्षक उभे करून गृहपाठ दाखविण्यास सांगतात. का बरे ? आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत असते तीच का बरे घडते? कारण शिक्षक जेव्हा वर्गात येतात तेव्हा ते त्यांच्या अनुभवी नजरेने सर्व वर्गाकडे बघतात.ज्या मुलांनी अभ्यास पूर्ण केला ती शांत , निश्चिंत उभी असतात.पण ज्यांनी केला नसेल ती चींतींत , घाबरलेली, काळजीत असतात..त्यांच्या कडे बघितल्यावर त्यांची चलबिचल जाणविते. आणि मग ते आपल्याला गृहपाठ दाखविण्यास सांगतात.

यामध्ये थोडासा law of attraction चा विषय आहे..किंवा आपल्याभोवती आपण जे vibrations निर्माण करतो ते ही असू शकतात .मनाची चंचल अवस्था जी वेळोवेळी आपल्या चेहऱ्यावर दिसते .ती परिणामांची मानसिक अस्थिरता ती कुठे तरी reflect होत असते .

इंटरव्ह्यू देण्याकरिता गेलो भले सगळे येत असेल पण आपल्याला वाटणारी एक अनामिक भीती , आपल्याला काय विचारतील , कसे विचारतील , मग आपल्याला सांगता येईल का याची चिंता चेहऱ्यावर कुठे तरी झळकते..ते आपल्या वागणुकीतून जाणवित असते.

अगदी इंटरव्ह्यू देताना नजर चुकवत असाल..किंवा इतर हालचाली यातून तुमच्या मनातील किंवा अंतर्गत चलबिचल किंवा भीती.चिंता जाणवित असते.आणि मग तयारी असून ही एखादा प्रश्न थोडा उलट सुलट झाला तरी गडबडून जातो आपण आणि तिथे चुका होवू लागतात किंवा येत असून ही विचार , उत्तरे भरकटू लागतात..आणि परिणामी negativity दिसते . आपण interview मध्ये मागे पडतो.

याउलट जेवढा आत्मविश्वास जास्त , कोणत्याही प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देता येत असेल ..डोळ्यात डोळे घालून ठामपणा ने उत्तर देत असाल .उत्तरे येत नसतील तरी स्पष्टपणा दाखविला की नाही माहिती पण मी त्याचा अभ्यास करेन जाणून घेण्याची तत्परता दाखविली गेली किंवा

आत्मविश्वास आणि स्पष्टपणा तर त्यातून positivity दिसते..त्यामुळे यशस्वी च होता. ज्या गोष्टी बद्दल आपण सतत चिंता करीत असतो ती आपण आकर्षित करतो.

जसे की पैशाची चिंता..आता खरे तर पैसा ही गोष्ट खेळती आहे..पैसे नाहीत ..याचीच चिंता करीत राहने ही व्यर्थ चिंता आहे.याउलट आहेत ते पैसे योग्य ठिकाणी गुंतविणे गरजेचे असते..आहेत त्या पैशातले थोडे का होईना पैसे योग्य ठिकाणी गुंतविले तर त्यातून फायदा होतो परंतु एवढेच पैसे आहेत त्यात काय होणार अशी चिंता करून ते नुसते ठेवले तर काळानुसार त्याचे मूल्य ही कमी होते आणि त्यातून अजून चिंता वाढते.

किंवा काही वेळेस पैसे गुंतवायचे धाडस ही करावे लागते जर फायदा होईल की नाही , नुकसान झाले तर या गोष्टींची भीती बाळगत राहिलो तर आहेत ते पैसे ही तसेच राहतील किंवा कमी फायद्यावर गुंतविले जातील..

तसेच एखादी काळी, बुटकी , नकटी मुलगी आधी लग्न करायला तयार नसते पण घरचे मागे लागतात म्हणून तयार होते पण जेव्हा स्थळे बघायला सुरुवात होते तेव्हा तिला आपल्यातल्या कमतरता , उणिवा यातून न्यूनगंड तयार होतो, भीती निर्माण होते , नकारात्मकता पसरते..आणि एखाद्या स्थळा ने जरी नाकारले तरी पुढे सगळीच स्थळे नकारच देणार अशी मनाची खात्री , संभ्रमावस्था निर्माण होते.

आणि जरी समोरच्या स्थळा कडून काही सकारात्मक response येत असेल तर मनात शंका निर्माण होतात की एव्हढे सगळे असून का होकार ..एवढ्या जणांनी नाकारले ..मग म्हणजे त्यांच्यात काही कमी आहे का खोट आहे का? असे विचार, भीती निर्माण होवून आपल्याच कडून नकारात्मकता दर्शविली जाते.

तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही तुम्हीं आकर्षित केली असते. ज्या गोष्टीवर मन केंद्रित केले जाते ती घडते. मग तुम्ही सतत चिंता करीत असाल तर तसेच घडेल .पैशाची असेल, किंवा जॉब , व्यवसाय कोणती ही.

भीती मग पास ..नापास होण्याची. किंवा लग्न होण्याची . अगदी नो entry मध्ये चुकून गेलात .पुढचा गेला व्यवस्थित पण तुम्हाला सारखी धाकधूक तर नेमके तेव्हा पोलिस दत्त म्हणून समोर हजर होतील .

भीती , चिंता ही भावना आहे.हे लक्षात घ्या.या भावनांना हरविता येते..जेव्हा आपण घाबरतो , भीती असते म्हणजे काय तर ती एखादी गोष्ट करणे आपण थांबवितो.प्रयत्न करणे सोडून देतो.एखादी गोष्ट करताना वारंवार अपयश येणार त्यातूनच यशाची पायरी चढत असतो आपण .
आणि खरे तर आपण घाबरतो एखाद्या गोष्टीला पण आपल्याकडे काय ऑप्शन आहेत ..निवड आहे ..choice आहे याचा विचारच आपण करत नाही.

जसे परीक्षेला जाताना अभ्यास करायचा..जे प्रश्न अपेक्षित असतात त्याची उत्तरे व्यवस्थित तयार करायची आणि तरी ही फेल झालो तर त्यातून परत प्रयत्न करायचे.

ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायचे आणि बाकी सगळे सोडून द्यायचे म्हणजे मन स्थिर होते.शांतता मिळते.
आपल्या भावनांना आपल्या मानगुटीवर बसू न देता त्या त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा त्याकरिता नियोजन करा.

सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा..अगदी पैसे , गोष्टी हरवल्या तरी आपल्या पेक्षा त्याची गरज अजून कोणाला तरी होती असाच सकारात्मक विचार करा.

कायम मीच का ? या ऐवजी अरे वाह ही संधी मला मिळाली असे विचार करा त्यामुळे मानगुटीवर बसणारी भीती ही कमी होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “ज्या गोष्टीची चिंता, भिती वाटते, तीच मानगुटीवर का येऊन बसते?”

  1. सूर्यकांत स्वामी

    खूपच छान वाटला हा लेख वाचून
    माला एक प्रश्न विचारायचा आहे मी समोरच्या माणसांना
    नीट पारख येत नाही प्रत्येकाच्या बोलण्यात मी सहज पाने बळी पडतो

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!