Skip to content

सतत स्वतःला दबावाखाली ठेवायची सवय बंद केली पाहिजे….

सतत स्वतःला दबावाखाली ठेवायची सवय बंद केली पाहिजे….


सौं.वैष्णवी व कळसे


दबाव-सवय की नाईलाज?

दबाव हा शब्द वाचण्यात आला की लगेच दुसऱ्यांनी दिलेलं ‘pressure’ ही समजूत तयार झाली असेल ? झाली ना?

बिलकुल नाही!दुसर्यांचा दबाव नाही मी त्या दबावाबद्दल बोलतेय जो आपण स्वतःला देतो दुसऱ्यांसाठी…

फार जुनी सवय असते आपल्या पैकी काही लोकांना की सर्वांच्या good books मध्ये असलं पाहिजे… तर काही असे असतात की काय करायचं आहे कोणाचं मला हवं तसंच मी राहणार… हे वाटणं देखील चुकीचं म्हणता येणार नाही खरंतर… का कोणाची इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला दबावाखाली ठेवतोय आणि हे केल्याने आपल्याला काय मिळणार आहे हे एकदा बघितलं पाहिजे

कोणाला आनंद देण्यासाठी स्वतःची इच्छा मारणं हा समजूतदार पणा आहे की मूर्खपणा… हे एकदा स्वतःला विचारलं पाहिजे…
आपल्यां माणसांसाठी किंवा नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेणं कधी त्यांचं तर कधी आपलं हे नक्कीच चालायला हवं….. पण जिथे आपण एकतर्फी समजून घेतोय आणि समोरचा फक्त आपल्याला समजायला सांगतोय मग काही उपयोग नाही…

आपण नेहमीच सर्वांना आनंद देऊ शकत नाही.. आपल्याकडून कधी कोणी आनंदी तर कोणी नाराज… हे चालत राहणार आणि या गोष्टींचा समतोल राखता राखता आपल्याला किती दडपण येतं हे तरी बघायला कोण येतं सांगा?

आयुष्यभर जे आपण मुळात नाहीच ते कोणासमोर का बनण्याचा प्रयत्न करायला हवा? जेव्हा आपण समोरच्याला आहे तसं स्वीकारलं आहे त्याचप्रमाणे आपण जसे आहोत तसेच का आपल्याला स्वीकारण्यात येत नाही.?

सतत प्रत्येक गोष्टीत तडजोड आणि त्याग करण्याची सवय असू शकते पण या सवयीला जगणं म्हणू शकत नाही.

Compromises आणि Sacrifices आपल्याला शांत बनवतात, समाधानी कधीच नाही बनवू शकत…. मग काय उपयोग हे सर्व करून?

जिथे गरज तिथे हट्ट सोडावा लागतो,कधी मन मारावं लागतं, कधी त्याग करावा लागतो पण हे करण्यासाठी देखील योग्य कारण आहे का हे बघितलं पाहिजे… फक्त समोरच्याला बरं वाटेल आणि तो माझ्याशी चांगला वागेल म्हणून करत असाल तर नक्कीच चुकत आहात…

फक्त त्यांच्या मनाप्रमाणे वागल्यामुळे तुम्हाला आदर मिळत असेल तर तो एकदिवस नक्कीच जाणार… कधी ना कधी आपण या गोष्टींना कंटाळून जाणारच मग तेव्हा तुम्ही आहात तसे समोर स्विकारल्या जाल का? नाही ना? मग आपलंही मन आहे त्यालाही भावना आहे ते लपवण्यापेक्षा दाखवण्याचा option का निवडून बघत नाहीत?

आयुष्य तर फक्त ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल यात निघून जाईल स्वतःसाठी कधी जगणार… दुसरे त्यांना हवे तसे वागतात आणि तुम्ही पण त्यांना हवे तसे वागावे ही अपेक्षा ठेवतात… दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला का जज करतो आपण?हे आपण करतोय तर दुसरे काय करत आहेत?

मी असं केल्यावर त्यांना काय वाटेल, ते काय बोलतील, हे ते रिऍक्ट व्हायच्या आधीच स्वतःला विचारत बसतो आणि नाराज होऊन शांत बसतो.. बरं शांत म्हणजे खरोखर आतून शांत नाही बरं का! फक्त तोंड बंद ठेवतो आणि मनात लगेच ह्यांच्या मुळे मला हे करता आले नाही…. हा असा तो तसा माझं आयुष्य खराब केलं त्याने…. असे स्वतःशीच बोलत बसतो आता तो समोरचा काही बोलला पण नाही आणि उगीचच मनात त्याच्याबद्दल चीड निर्माण करायची… यात कोणाची चूक आहे?

काही करून बघितल्यावरही तेच होणार न करता ही तेच होणार मग हवं तसं वागून का बघत नाही… स्वतःला हवं तसं जगून का बघत नाही…

जवाबदारी आणि कर्तव्याच्या नावाने स्वतःवर दबाव आणणे कितपत योग्य आता बघितलं पाहिजे…?



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “सतत स्वतःला दबावाखाली ठेवायची सवय बंद केली पाहिजे….”

  1. श्रेया शंकर कुंभार

    हो ही सवय बंदच करायला आहे मला हे बरोबर वाटत आहे मी पण सतत हाच विचार करत असते त्या मुळे कधी कधी डोकं सुन्न होत काहीच सुचत नाही विचार करून करून कधी डोळ्यासमोर अंधार येतो नेहमी कोणत्यातरी दबावा खाली असल्या सारखं वाटत . की आहे तेच कळत नाही

  2. All questions …I need answers….you forget one aspect i.e.once a good done by you ..always it pays toll upon you in form of sacrifices

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!