Skip to content

आपल्याला सहानुभूतीपेक्षा समानभुतीची गरज असते!!

आपल्याला सहानुभूतीपेक्षा समानभुतीची गरज असते!!


टीम आपलं मानसशास्त्र


सहानुभूतीत आपण इतरांचे दुःख जाणून ते दूर करण्याचा विचार करतो, पण स्वतः दुःखी होत नाही. यामध्ये दया दाखवल्यामुळे स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा अहंकार उत्पन्न होतो. सहानुभूती म्हणजे इतरांना जे जाणवते ते जाणवणे. यामध्ये संवेदनांचा व्यवहार नसतो, तर व्यवहारात संवेदना झळकते. दोन्हींमध्ये संवेदनांच्या सखोलतेचा फरक आहे.

अतिशय व्यक्तिवादाने पीडित अशा ज्या हिंसक समाजात आपण आज जगत आहोत, तो आक्रमक स्पर्धेला प्रोत्साहन देऊन व्यक्तीला व्यक्तीविरुद्ध भांडणाच्या स्थितीत उभे करीत आहे. आपण अशा संवेदनहीन समाजात बदलत जात आहोत, ज्यामध्ये प्रत्येक ‘दुसरा’ आपला प्रतिस्पर्धी आहे. त्याचे सुख-दुःख आपल्यावर परिणाम करीत नाही. मानवी संबंध बिघडण्यामागे हे कारण तर आहेच. शिवाय देशांमधील संघर्षालाही काही प्रमाणात हेच जबाबदार आहे.

समानभुतीचा अर्थ आहे, ‘दुसऱ्याला जे जाणवत आहे. तसेच जाणवणे.’ यासाठी स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेऊन विचार कार्याला हवा. सहानुभुतीत आपण इतरांचे दुःख जाणून त्याला मदत करण्याचा विचार करतो.

त्यासाठी आपण स्वतः दुःखी होण्याची गरज नसते. सहानुभूतीत एक दुरावा असतो, समानुभूतीत स्वतः तीच भावना भावना जाणवण्यासमान असते. सहानुभूतीत दया करताना नेहमी आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार झळकतो. सहानुभूतीत आपण एखाद्या गरिबाला मदत करू शकतो.

परंतु ज्याने एकुलता एक मुलगा गमावला असेल त्याच्या समोर आपल्या मुलाच्या यशाची व वैभवाची चर्चा न करणे समानुभूतीचे उदाहरण आहे. यासाठी मनाचा मोठेपणा हवा, तोंडाला भपका नको. यामध्ये इतरांचा बोध तिऱ्हाईत होतो व कारुण्याचा जन्म घेतो.

इतरांच्या भावना जाणून घेत त्यात सहभागी होण्याची मानवी संबंध मधुर व कायमस्वरूपी राखण्यातील स्वतःची भूमिका कोण नाकारू शकतो. मैत्रीची सुरुवातही नेहमी याच विश्वासाने होते कि समोरची व्यक्ती आपल्या भावना व विचार निर्णायक न होता समजू शकेल.

आध्यात्मिक गुरु किंवा मनोविश्लेषकांच्या यशाचे रहस्यही हेच आहे कि साधकाला किंवा रुग्णाला पूर्ण विश्वास होतो कि गुरुकिंवा मनोविश्लेषक त्याला पूर्णपणे समजतो व आपण त्याच्यासमोर मन मोकळे करू शकतो.

सामाजिक जीवनतही जिथे मतभेद असतात तिथेही संवादाच्या यशाची शक्यता तेव्हाच जास्त असते, जेव्हा दोन्ही पक्ष परस्परांचे दृष्टिकोन व्यवस्थित समजत असतील व त्यांच्याविषयी संवेदनशील असतील.

महात्मा गांधी व मार्टिन ल्युथर किंगचा सत्याग्रह याचे उत्तम उदाहरण आहे. दलाई लामा याचे आधुनिक प्रवक्ते आहेत.

समानुभूती अभावी लोक चुकीचा निर्णय घेतात जो त्यांची व आजूबाजूच्या लोकांची हानी करत असतो. चांगली गोष्ट हि कि समानुभूती आपण शिकूही शकतो व जीवन जास्त प्रसन्न व कमी गुंतागुंतीचे बनवू शकतो.

संदर्भ – साध्यानंद



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!