चुकीचे ‘पूर्वग्रह’ मनाचं खच्चीकरण करत असतात.
मिनल वरपे
एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्णपणे जाणून न घेता झालेले समज गैरसमज यालाच पूर्वग्रह म्हणतात. एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीत कळत नकळत जे काही वागते त्यावेळी त्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल ठाम मत बनवणे मग ते चांगले असो वा वाईट..
जॉब करताना, शिक्षण घेताना, नवीन नाते जोडताना, मैत्री करताना यासारख्या एक ना अनेक ठिकाणी वागताना पूर्वग्रह बाजूला ठेवून वागायला हवं..
सायली च नुकतच शिक्षण पूर्ण झालं आणि तिने वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी अर्ज केले. एका ठिकाणी तिला मुलाखतीसाठी बोलावलं गेलं.
तिला जिथे बोलवण्यात आलं ती कंपनी खूप मोठी होती. तिकडे गेल्यावर तिच्यासोबत अजून काही लोक मुलाखती साठी आले होते.आणि त्यांच्यात चर्चा चालू होती की ही ज्यांची कंपनी आहे ते साहेब खूपच कडक शिस्तीचे आहेत. जास्त बोलत नाहीत. त्यांनी सांगितल्यानुसारच इकडे सर्व चालते. ते कोणाचं काही ऐकून घेत नाहीत यासारख्या चर्चा तिच्या कानावर पडताच तिने त्या साहेबांची मनातच कल्पना केली की ते कसे असतील.
आणि जेव्हा मुलाखत घेण्यासाठी तिला केबिन मध्ये बोलवलं तेव्हा ती खूपच घाबरलेली होती. आत गेल्यावर तिची मुलाखत सुरू झाली पण ऐकलेल्या चर्चेमुळे आणि मनात वाढलेल्या भीतीमुळे तिला काहीच बोलता येत नव्हते आणि त्यावेळी त्या साहेबांनी अगदी प्रेमाने तिला समजावलं की तू कसली भिती मनात ठेवू नकोस.मोकळेपणाने बोल.
या कंपनी मधे शिस्त आहे कारण शिस्त असेल तरच काम व्यवस्थित होतात. मला strict राहावं लागते त्यामुळेच जो तो आपल्या मर्यादेत राहतो आणि कोणी कोणाला त्रास देत नाही आणि त्यामुळेच ही कंपनी एवढी मोठीच झाली नसून कोणीच या कंपनी बद्दल वाईट बोलू शकणार नाही.
आणि तू इकडे आलीस ते तुझ्या शिक्षणामुळे. तुझी पात्रता असेल तर तुला हा जॉब नक्कीच मिळेल.त्यामुळे तू मोकळेपणाने मुलाखत दे.
त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर सायली च्या मनात त्यांच्याविषयी असलेली भिती आणि झालेला गैरसमज दूर झाला.
खरंतर आपण सुद्धा असेच एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह करून त्या व्यक्तीला कायमचा शिक्का मोर्तब करतो की ही व्यक्ती अशीच आहे वैगेरे पण एक व्यक्ती सगळ्यांसोबत सारखच वागेल असे नसते.
कोणताच पूर्वग्रह न करता त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखून, त्या व्यक्तीशी बोलून त्यानंतर त्या व्यक्तीविषयी मत बनवावे. कारण आपण एखाद्याला वाईट पूर्ण न ओळखता ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत कळत नकळत काय वागली की ती व्यक्ती ही अशाच स्वभावाची आहे अस म्हणून मोकळे होतो आणि इतरांना सुद्धा आपलं मत ठासून सांगतो.
आणि आपल्या अशा वागण्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा कायमची वाईट होऊ लागते.त्यामुळे ज्याने त्याने कोणताही पूर्वग्रह न बाळगता पूर्ण माहिती घेऊन, त्या व्यक्तीला भेटून,ओळखून त्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल मत बनवाव आणि ते सुद्धा स्वतःपुरते मर्यादित असावं.