नको असलेल्या व्यक्तींना कसं टाळायचं ??


मिनल वरपे


आपल्याला एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं आवडत नसेल पण नाईलाज म्हणून आपल्याला ते संबंध तोडता येत नसेल किंवा अशावेळी आपली भूमिका आपल्या मनात असलेल्या त्या व्यक्तीबद्दल च मत यावर काहीच रिऍकट होता येत नसेल तर अशावेळी आपण काय करतो..???

जस की आपल्या घरात एखादी व्यक्ती असते जीचा स्वभाव आपल्याला आवडत नसतो पण वाद निर्माण होऊ नये म्हणून आपण प्रतिउत्तर देत नाहीत.

Advertisement

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी किंवा अधिकारी यांचं वागणं आपल्याला पटत नसेल पण काम महत्त्वाच आहे म्हणून आपलं मत आपण आपल्याजवळ ठेवतो.

मित्र मैत्रिणीं यांच्यात सुद्धा आपल्या ग्रुप मधील एखाद्याचा स्वभाव आपल्याला नसेल आवडत पण आपल्या एकाच्या तक्रारीमुळे ग्रुप तुटायला नको म्हणून आपण काही बोलत नाही.

काही वेळासाठी का असेना पण प्रवासात आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचं वागणं आपल्याला चीड निर्माण करणार असेल तर आपण गप्प राहतो.

Advertisement

म्हणजेच नको असलेल्या, घृणा निर्माण करणाऱ्या लोकांसोबत आपली वागणूक नेमकी कशी ठेवायला हवी.

१) दुर्लक्ष करणे

त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात कितीही राग असेल, नकारात्मक भावना असेल तरी ती व्यक्त न करता त्या व्यक्तीकडे किंवा तिच्या वागण्यकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं.कारण लक्ष दिलं तर आपला राग वाढतो.

Advertisement

२) आपण आपल्या कामात लक्ष द्यायचं.

रिकाम डोकं असेल म्हणजेच काही काम नसेल तर अशावेळी आपल्या मनात नकोते विचार येतात. आपण अशावेळी आपल्याला काय आवडते याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय नाही आवडत यावर जास्त लक्ष देतो.

त्यापेक्षा असे विचार करण्यापेक्षा आपल्या कामात आपण व्यस्त राहायचं म्हणजे या गोष्टींचा विचार करायला आपल्याला वेळ मिळणार नाही.

Advertisement

३) चर्चा करायची नाही.

आपण एखाद्या विषयावर किंवा व्यक्तीबद्दल सतत चर्चा केली तर आपल्याला त्याची सवय लागते आणि तो विषय जर नकारात्मक असेल तर त्याबद्दल चर्चा करून आपल्या हाती काहीच लागत नाही.

कारण एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही म्हणून सर्वांनाच आवडत नाही असे नसते. आणि आपण त्या व्यक्तीबद्दल इतरांना सांगितलं तर उगाच इतरांना चर्चेला विषय मिळतो.

Advertisement

४) तेवढ्यापुरती बोलायचं.

जर ती व्यक्ती आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी त्या व्यक्तीशी एकदम नकारार्थी वागण्यापेक्षा तेवढ्यापुरते बोलायचं.

५) नात्यांची काळजी घ्यावी

Advertisement

स्वतःहून आपण अशा व्यक्तींसोबत संपर्क करत नसलो तरी ज्यावेळी आपला संबंध येईल अशावेळी समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही आणि आपल्या वागण्यामुळे इतर संबंध खराब होणार नाही याची काळजी घ्यायची.Online Counseling साठी !

क्लिक करा

Advertisement


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.