अपमानाचा बदला न घेता या सोप्या गोष्टी करा !!


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


पुष्कळदा अपमान करणारी हि घरातीलच एखादी व्यक्ती असते. जी वारंवार स्वतःचं फ्रस्ट्रेशन जणू आपल्यासकट इतरांवर सतत लादत असते. बाहेरची एखादी व्यक्ती अपमान करणारी असेल तर त्या व्यक्तीशी रोज सहसा संबंध येत नसल्याने आपण आपलं लक्ष बऱ्याच प्रमाणात एका ठिकाणी लक्ष एकाग्र करू शकतो. म्हणून त्या व्यक्ती तितक्याशा आपल्याला रोजच छळत नसतात.

परंतु, त्या व्यक्तींचं काय करायचं ज्या व्यक्तींचे चेहरे रोजच एका घराच्या चार भिंतीत आपल्या समोर येणारच आहेत. त्या ठिकाणी आपल्या जागृत मनाची फार गैरसोय होताना दिसते आणि एका ठिकाणी लक्ष एकाग्र करणं तर सोडाच साधी-साधी सोपी कामे करताना सुद्धा दमछाक होते. चिडचिड होते आणि संपूर्ण भावनांचा आतोनात उद्रेक हा त्या व्यक्तीच्या अवतीभवती केंद्रित होतो.

Advertisement

सर्वसामान्यपणे आपण खालील गोष्टी करत असतो.

⇒ त्या व्यक्तीचा चेहरा आपल्यासमोर येऊच नये, म्हणून आपण स्वतःला एकलकोंडे करून घेतो.

⇒ सतत त्या व्यक्तीविषयी घडलेल्या प्रसंगाबद्दल अतिविचार करीत बसतो.

Advertisement

⇒ दैनंदिन जीवनातील महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करून घेतो.

⇒ भविष्याच्या नियोजनाबद्दल मनात एक शून्यात दाटून येते.

⇒ इतर जवळच्या व्यक्तींकडे, नातेवाईकांकडे आपण त्याच व्यक्तीविषयी बोलत राहतो.

Advertisement

⇒ आपल्या रागाचा पारा किंवा चिडचिडेपणा यावर आपलं काहीच नियंत्रण राहत नाही.

⇒ रोजच्या ठरलेल्या कामांमध्ये क्षुल्लक चुका घडून येतात.

यापुढील गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

Advertisement

⇒ खरंच अपमान झाला आहे का ? याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

⇒ अपमान जरी झाला असं तुमच्या मनाने स्वीकारलं असेल तरी ती बाब पर्सनली न घेता आयुष्यात असे अप्स-डाऊन होतंच असतात, याबद्दल मन शांत करून सांत्वन करण्याची गरज आहे.

⇒ तो प्रसंग तुमच्या जिव्हारी लागलाय आणि मन तुमचं शांत होत नसेल तर त्याठिकाणी काहीही लेबल न चिटकवता योग्य मानसिक शांतीची वाट पाहणं केव्हाही योग्यच.

Advertisement

⇒ सतत इतरांपुढे तो अपमानाचा प्रसंग सांगितल्याने तुम्ही स्वतः त्या प्रसंगाची तीव्रता वाढवत आहात, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. कारण अपमान करणाऱ्या व्यक्तीशी न बोलता तुम्ही त्या व्यक्तीविषयी इतरांपुढे बोलत असता.

⇒ जर ती व्यक्ती वारंवार अपमान करत असेल तर अशावेळी काय ऐकायचंय आणि काय बघायचंय, तसेच कोणत्या गोष्टी मेंदूत पाठवायच्या आहेत, याबद्दल तुमचं एक विशिष्ट भावभावनांचा मॅनेजमेंट रेडी असणं तुम्हालाच उपयोगी पडणारं असेल.

⇒ जे काही ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्यात ठरवलेलं असेल त्यावर बाधा येणं हे तुमचं सर्वात मोठं अपयश असेल. कारण कोणतीही व्यक्ती फार फार तर आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु विचलित व्हायचं कि नाही हे सर्वस्वी आपल्या भक्कम मनावरच अवलंबून आहे.

Advertisement

शेवटी भक्कम मनाची सातत्यता हाच या लेखाचा सारांश असायला हवा. जेणेकरून या पुढे जरी तुम्हाला कोणी अपमानास्पद वागणूक दिली तरी त्या प्रसंगात छक्के-पंजे वापरून तुमच्या ध्येयात कोणाचा अडथळा येऊ नये.

लेख कसा वाटला नक्की सांगा.


Advertisement

Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.