स्मरण-विस्मरण
मधुरा पळणीटकर | मो.: 8805725599
“सखींनो अशा कितीतरी गोष्टी महत्वाच्या असतात, ज्या आपल्या लक्षातच रहात नाहीत. शाळेतल्या मुलांना, कॉलेजमधल्या युवक-युवतींना तर सदैव आपली स्मरणशक्ती चांगली ठेवावी लागते. पण, आजूबाजूच्या ताणांमुळे त्यांच्या लक्षातच त्या रहात नाहीत.
आता बघू यात, स्मरण म्हणजे काय आणि परफेक्ट अभ्यास कसा कराल? एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणे, तो मेंदूत साठवून ठेवणे आणि योग्यवेळी तो आठवून झालेल्या गोष्टीबद्दल कारवाई करणे म्हणजे स्मरण”
स्मरणकौशल्ये कशी वाढवावीत ते पाहू.
आत्मविश्वास :
मला आठवणारच असा आत्मविश्वास बाळगा आणि आपल्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेवा. पॉझिटिव्ह थिंकिंगद्वारे तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. जे पाठ करायचे त्यातील आपला रस वाढवा. त्या विषयात आवड निर्माण करा.
सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करा :
डोळा, कान, नाक, जीभ, स्पर्श अशी सर्व ज्ञानेंद्रिये आपण अभ्यास करताना वापरली तर अभ्यास चांगला लक्षात राहू शकतो. एखादे स्पेलिंग नुसते पाठ करण्याऐवजी ते लिहिता लिहिता मोठ्याने म्हटले तर त्याचा जास्त उपयोग होतो.
उजळण्यांनी स्मरण-शक्तीला उजाळा द्या : रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात शिकलेल्या सर्व मजकुराची धावती उजळणी म्हणजे मनन करा.
मोक्याच्या जागी चार्टस वापरा :
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर आली तर ती चांगली लक्षात राहते, म्हणून चांगली सूत्रे किंवा टिपणे स्केच पेनने मोठ्या अक्षरात लिहून चार्टस तयार करा.
अभ्यास पद्धतीत विविधता आणा : एकाच प्रकारे अभ्यास केल्यावर त्याचा कंटाळा येतो. म्हणून दिवसभर सलग पाठांतर करण्यापेक्षा लेखन, वाचन, मनन करावे.
कविता पाठांतर :
कविता रोज पुस्तकात एकदा तरी बघून म्हणण्याचा सराव करा. म्हणजे एकाच दिवशी तासभर कविता पाठ करण्यापेक्षा रोज पाठ करावी.
टेपरेकॉर्डरचा वापर :
अभ्यासाच्या कॅसेट्स ऐकूनही आपली स्मरणशक्ती वाढवू शकाल.
वेळच्या वेळी प्रथिनयुक्त आहार घ्यावा :
कारण आहाराचा व स्मरणशक्तीचा जवळचा संबंध आहे. टी. व्ही. पाहताना जेवू नये किंवा जेवताना अभ्यास करू नये.
मुलांच्या मेंदूला सातत्याने ग्लुकोज ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. दररोज घरातल्या मोठ्या माणसांना वाकून नमस्कार केल्यामुळे मेंदूतील रक्तपुरवठा वाढतो. पर्यायाने याचा परिणाम चांगल्या वर्तनात व चांगल्या स्मरणशक्तीत होतो.
नोट्स काढणे :
नोट्स काढण्याची चांगली सवय आत्मसात करा. मेरिटमध्ये येणारी मुलं परीक्षापूर्व काळात आपल्या नोट्सवरच भर देतात.
सातत्याने वाचन :
जी वस्तू वापरात नसते ती नाश पावते. म्हणून सातत्याने लक्षपूर्वक वाचन करा.
उतारा वाचन :
मोठा उतारा थोडा थोडा पाठ करा. खंड पाडा.
आहार :
मुलांना दाणे, कडधान्ये, बदाम, काजू, चुरमुरे, सुकी फळे यांचा अधिक वापर करा. मुलांना परीक्षा काळात जड जेवण देऊ नका.
स्पर्धा :
आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये निकोप स्पर्धा लावा. माझं आधी पाठ झालं पाहिजे ही माणसाची प्रवृती असते. त्यामागे अहंकार असतो. या प्रवृत्तीचा असाही आपण उपयोग करू शकतो.
वेळापत्रक करा :
अभ्यासाचे वेळापत्रक करा. रोजनिशी लिहा.
सखींनो या माहितीचा तुम्हाला तुमच्या मुलांच्या शैक्षणिक यशासाठी नक्कीच उपयोग होईल. प्रत्येक मुल म्हणजे प्रत्येक फूल, त्याचं सौंदर्य, रंग वेगळा, सगळीच मुलं अभ्यासात यशस्वी होतीलच असे नाही. म्हणून त्यांचा कल जिकडे तिकडेच त्यांना उमलू द्या.
आपण फक्त त्यांच्यावर प्रेमाचं सिंचन करायचं, त्यांचं कौतुक करायचं. कारण जीवनाच्या बागेत वेगवेगळी फुले असतील तरच ती सुंदर दिसतात… हो, ना…?
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.