Skip to content

…कुणीतरी आपलंसं असावं !!

… कुणीतरी आपलसं असाव !!!


शिवाजी भोसले | 9689964143


या पृथ्वीतलावावर निर्मिकाने जेव्हा मानवाची निर्मिती केली, तेव्हा त्याच्या सोबतीला कुणीचं नव्हतं. वाटयाला केवळ एकटेपण आलेलं… त्याला कुणचीतरी आवश्यकता भासायची. त्याची अनेक कारणं होती. त्यानंतर मानवाने समुह बनविले.

कालांतराने मानव एकोप्याने राहू लागलायं. स्वताचं संरक्षण, हल्ले, प्रतिहल्ले यातून त्यास आधार मिळाला. यातूनचं विविध शोध जन्मास आले. माणसांची प्रगती होत गेली.

पुढे एकोपा, समुहात त्यास आपला स्नेह, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सुख दुःख, भावना व्यक्त करण्याकरीता कुणाची तरी आवश्यकता भासू लागलीय. तेव्हा मानवाने सहवासातील व्यक्तींना आपलंसं केलयं. यातूनच नाती निर्माण झालीत. तेव्हापासून ते आजतागत रक्ताचं… स्नेहाचं… आपुलकीचं… प्रेमाचं नात अधिक दृढ होत गेलयं. हा प्रवास जीवसृष्टीच्या अनेक बदलाने घडत गेलाय. याकरीता हजारो वर्षे घालवावी लागलीत.

माणूस हा समाजशिल प्राणी आहे. असं म्हटल जातं. तो समाजाव्यतिरिक्त इतरत्र राहू शकत नाही. आज आवश्यकता म्हणून प्रत्येकाला वेगवेगळं नातं निर्माण करता आलं. हे नात कुठल्याही स्वरूपाचं असो त्याची विन अधिक घटट होत चाललीय. मनाचा गाभारा, आठवणी, स्मरणांनी भरल्यावर तो रिता करण्याकरीता कुणीतरी आपलसं असावं लागतं.

आजच्या चंगळवादी जगण्यात कुठेतरी नातेसंबध लोप होत असल्याचं प्रकर्षानं जानवतयं. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, स्नेह, आपलेपणा, आत्मीयता कमी होत असून एकमेकांप्रती मानसा मानसातील दुरावा अधिक वाढत चाललाय.

हा सर्व काळाचा महिमा म्हणावा लागेल. आजच्या क्षणाला केवळ गरजेपुरतंचं नात निर्माण केलं जातं. गरज संपली की नात मोडकळीस येतं. किंवा आणलं जातं. हे आपणास केव्हाचं नाकारता येणार नाही. याचे प्रत्येकास विविध क्षणाला अनुभवही येतात.

जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मन हळवं असतचं. मनाच्या अंतNयात कुठेतरी चांगुलपणाची किमया लपलेली असते. माणसांचं जगणं पुढे पुढे सरकत राहत आणि आठवणीचा काळोख मागे गर्द होत जातोय. प्रत्येकांचं आयुष्य तेवढचं असतं, जेवढं आपणास जगता येत. आणि या आठवणी नयनाश्रुनी बाहेर पडतात.

डोळयात भरून आलेलं आभाळ रित होण्यास कासावीस होतोय जीव… भावनाचे आक्रंदन सुरू होतं… डोळयाचे काठ भरून येतात आणि मन मनसोक्त रडायला लागत… कुणच्यातरी कुशीत डोक ठेवावं आणि मनसोक्त रडावं असं वाटतयं… त्यासाठीचं कुणीतरी आपलसं असावं लागतं.

जीवन जगतांना प्रत्येक क्षणाला जगण्याचे संदर्भ बदलत जातात. तरी माणसेही बदलत चाललीत. अनेकांना क्षणाक्षणाला व पाऊलापाऊलावर याचे अनुभव येतचं असतील. सर्वच काही आपल्या मनासारखं आणि विरोधासारखं होत नसतं. अनेकवेळा मनाच्या विपरीत्र घडतं. मनाला पटण्यासारखं असतं, पण करावचं लागतं ना… आणि प्रत्येकांच्या मनासारखं झालं असतं तर प्रत्येकांच्या जीवनाचे संदर्भच बदलून गेले असते. जीवन अगदी खालीखाली झालं असतं.

प्रत्येक मनाचे, व्यक्तीचे स्वभाव भिन्न असतात. त्यामध्ये आपणपणं ओतलं की जगण्याचे सर्वच संदर्भ सुटतात. हे आपलेपण जपता यायला हवं. स्वतःचं जग बदलवयास आपलेपणं हळुवार जगता येण गरजेचं असतं. हे आपलेपण माझं यातचं दडलेलं असतयं. ते कल्पकतेनं बाहेर काढावं लागतं. सर्वांना प्रेरीत करावं लागतं. तेव्हा जगणं अधिक समृध्द होतं. मन प्रसन्न होत जातं.

कधी कधी कुणीतरी आपलसं असतं. पण काही कारणास्तव एकमेकांचं मन दुरावतं. सुसंवादाचं रूपांतरण विसंवादात व्हायला लागतं. मनाचं आपलेपणं पोरवंâ होतं असतं. तेव्हा दुभंगलेलं मन एकमेकांना साधता यायला हवं. त्याकरीता स्वताची चुक असो वा नसो सर्वांना स्वॉरी म्हणता यायला हवं.

मनाचं मोठेपण दाखविणं गरजेचं असतं. जगण्यातला ’मी’ आणि ’अंह’पणा बाजूला सारता यायला हवेत. एकमेकांच्या जगण्याचे संदर्भ जाणून घ्यायला हवेत. लैकिक अलैकिकाची जोड जगण्यास दिली की जगणं अधिक सुंदर होत जातं.

जीवनात घडणाNया असंख्य घटना कल्पनाबाहेरच्या असतात. त्या कळत नकळतपणे घडतात. त्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सर्वकाही अकल्पीतचं असतं. एखाद्या घटनेनं होत्याचं नव्हतं होवून जातं. मनावर असंख्य घाव होतात. जीवनाचे आणि जगण्याचे सर्वंच संदर्भ, पैलू बदलून जातात. मन अगदी सुन्न, बधीर होत जातं. त्या सर्वच घटनातून जगण्याचं आत्मभान मिळतं.

अशा घटनांमधून खूप सार शिकता येवू शकतं. त्याकरीता मन तसं असावं लागतं. मात्र कधी कधी या घटना मानवी मनावर विपरीत्र परीणाम घडवून जातात. त्याचे खूप दुरगामी परीणाम भोगावे लागतात. तेव्हा मन हळव होवून जातं. अत्यंत दुखी व्हायला लागतं. सर्वकाही नकोस वाटायला लागतं. यावेळी डोक्यात विचारांचा कल्लोळ उठतोय. सर्वकाही संपल्यागत होतयं.

या क्षणाला मनाला उभारी देणारं कणीतरी आपल्या जवळ आपलंसं, आपुलकीचं असावं लागतं. मनात निर्माण झाालेले भाव, भावना, विरह व्यक्त करावेसे वाटतात. आपुलकीच्या नात्यानं जीवाभावाचं विचारणार कुणीतरी असावं. यातून मन मोकळ होत जातं.

मनातलं कोड त्यांपुढे उलगडता यावं. दिवसागणीक आलेल्या क्षणांनी मन मोकळ करता यावं. इतर कुणालाही सांगता न येणार गुपीत त्यांच्या पुढे हळुवार खोलावेत. मन रित करता यायला हवं. यातून ताणतवाण, टेंशन मुक्त होता येतं. जीवनातलं दुख कमी करता येतं.

मन अगदी स्वच्छंदी होत जातं. प्रसन्नतेचे झरे मनाच्या कपारीतून वाहू लागताहेत. आणि जीवनाचं सकारात्मक रूप, स्वरूप बाहेर यायला लागतं. यासाठी कुणीतरी आपलंसं असावं लागतं. आपुलकीचं असावं लागतं.

कुणीतरी आपलसं असलं की हदयाच्या घावांना पुर्णता नव्हे पण क्षणभर तरी भरून काढता येतं. मनाचं आउटपुट निघण गरजेचं असतं ते इथचं निघतं. मन मोकळ होण गरजेचं असतं. दोन शब्द आपुलकीनं बोलणारं… जिव्हाळयाने उराशी कवटाळणारं… आलेला क्षीण एका क्षणात घालविणारं… आपल्याचं सुखदुखात स्वताचं सुखदुख पाहणारं… मायेचं ममत्व जाणणार व जपणारं… ओलावलेल्या डोळयाच्या कडांना हळुवार पुसणार… मनाचं अंर्तमन समजून घेणारं, असं कुणीतरी आपलंसं असावं लागतं.

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला कुणीतरी आपलसं असणं गरजेचं असतं. यातून मानवी जगणं समृध्द होत जातयं. जगण्याचं आत्मबळ भेटतयं. कुठलाही संकोच न बाळगता मन सरळ सरळ उघड केलं जातं. जगातलं पहाडासारखं सामोर आलेलं दुख क्षणात नाहीस केलं जातं.

आपुलकी, स्नेह, जिव्हाळाच्या आशेनं प्रकाश किरणं उगवतं. मन निरभ्र होत जातं. याकरीता शेवटच्या श्वासापर्यंत कुणीतरी आपलसं असावं लागतं. आणि ते प्रत्येकासं मिळावं.

आत्मभान जगण्याचं ! या सदरातून



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!