Skip to content

ऑनलाईन शॉपिंग करताना ‘मानसशास्त्र’ कसे वापरता येईल !!

ऑनलाईन शॉपिंग करताना ‘मानसशास्त्र’ कसे वापरता येईल !!


टीम आपलं मानसशास्त्र


अगदीच १० वर्षाआधीचा जर काळ पहिला तर ‘ऑनलाईन शॉपिंग’ हि संकल्पना कुठेच फारशी दिसत नव्हती किंवा असली तरी ती फार नगण्य प्रमाणात आढळून यायची. परंतु अशा प्रकारच्या बाजारीकरणावर कोणाचाही पटकन विश्वास बसत नव्हता.

तसेच ‘वस्तू समोर न पाहता ती विकत कशी घ्यायची’ हा मुद्दा त्याकाळी फार स्ट्रॉंग असायचा. परंतु जर आज आपण बघितलं तर वस्तू काय जेवण सुद्धा ऑनलाईन मागविण्याची जणू एक प्रकारची लाईफस्टाईलच बनली आहे.

दहा वर्षाआधी सुद्धा कळत-नकळत आपण मानसशास्त्र वापरतच होतो. परंतु आज ते परिणामकारक पद्धतीने का वापरता येत नाही. का आपण फोटोशॉप द्वारे आकर्षक रूप देणाऱ्या वस्तूंना सर्रास कान-डोळा करून ते शॉप करतोय. क्वालिटी जरी कमी असली तरी त्यात समाधान मानतोय.

तिथे आपल्याला असं वाटत असावं कि जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्च तरी कमी झाला. पूर्वी एखादी वस्तू विकत घेण्यासाठी पूर्ण कुटुंब जात असे आणि निरनिराळ्या वस्तू आणि विक्रेत्यांशी कमी-जास्त भावाची रस्सीखेच करू मानसिक समाधान सुद्धा मिळत होते.

पण ऑनलाईन शॉपिंग करताना ते समाधान तर मिळत नाहीच, तसेच याठिकाणी जर तुम्ही डोळे झाकून काही वस्तू विकत घेण्याची डील करत असाल तर तुम्ही फसवले जाण्याची शक्यता हि जास्त आहे.

त्यामळे ऑनलाईन शॉपिंग करताना नेमकं मानसशास्त्र कसं वापरावं हे पाहूया…

ऑनलाईन शॉपिंगमधील अनेक गोष्टी अशा असतात ज्या नेहमीच आपण दुर्लक्षित करत असतो. जरी या गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटत असल्या तरी काही माहीती घेतल्यास त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.

विशेष तज्ज्ञांच्या मते, अशा खूप साऱ्या पद्धती आहेत ज्याच्या पद्धतीने ऑनलाईन खरेदी करताना पैसे वाचवता येऊ शकतात. यासाठी आपल्याला फक्त एक छोटेसे रोबोटिक टूल (क्रोम एक्सटेन्शनच्या रूपात) डाउनलोड करावे लागेल.

जेव्हा आपण एखाद्या ई-कॉमर्स साईटवर एखादे उत्पादन पाहत असतो तेव्हा हे तात्काळ त्या उत्पादनाची तुलना इतर ई-कॉमर्स साईट्सवर असलेल्या त्या उत्पादनाच्या किमतीशी करीत असते.

हे ही गोष्ट सांगते कि आपण जे उत्पादन पाहत आहोत त्याची किंमत येथे सर्वात कमी आहे किंवा आपल्याला दुसऱ्या ई-कॉमर्स साईट्सवर जायला हवे.

तसेच आपण प्राईस अलर्ट सुद्धा सेट करू शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा आपले इच्छित उत्पादन ऑनलाईन उपलब्ध होईल तेव्हा ते आपल्याला नोटिफिकेशन अलर्ट करते. नेहमी अशा ई-कॉमर्स साईटवर लक्ष ठेवा जी आपल्याला मोफत डिलिव्हरीची सोया देत असते.

पण यामध्ये सुद्धा एक मर्यादा ठरवलेली असते. अर्थातच मोफत डिलिव्हरीसाठी किमान एका ठराविक रकमेची खरेदी करावी लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी एक वार्षिक शुल्क देऊन आपली मेंबरशीप अपग्रेड करून घ्यायला हवी किंवा ती खरेदी आपल्या शेजारी, मित्र किंवा मैत्रिणींसोबत क्लब करून घ्यावी.

काहीजण एखाद्या विशिष्ट साईटवर ती साईट त्यांना मोफत भेटवस्तू, कुपन व सूट देत असल्यामुळे खरेदी करतात. वास्तविक हे डील तेवढे आकर्षक नसल्यामुळे अशा ऑफर स्वीकारण्यापूर्वी त्याविषयी माहिती घ्यायला हवी. तसेच इतर साईट्सवर सुद्धा त्याची किंमत पाहावी.

जर आपण थोडेसे जागरूक राहू तर आपल्या ऑनलाईन साईट्सवर खरेदी केल्यानंतर रिवोर्ड पॉईंट मिळतात. ते पॉईंट आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देणाऱ्या आर्थिक संस्था किंवा उत्पादन बनवणाऱ्या कंपन्या किंवा ई-कॉमर्स साईट्स देत असतात.

हे पॉईंट्स ऑनलाईन पोर्टलच्या ई-व्हाऊचरनेही वापरता येऊ शकतात. कित्येकदा लोक एखाद्या संबंधित नेटवर्कवर रजिस्टर करतात आणि त्या अकाऊंटवरून खरेदी करतात. ज्यामुळे त्यांना कॅशबॅक मिळते.

हि पैसे वाचवण्याची एक उत्तम पद्धत आहे. बहुतेक ई-कॉमर्स साईट्स वेळोवेळी क्रेडिट/डेबिट कार्डवर खास ऑफर देतात, ज्या सवलतीच्या रूपात असतात किंवा कॅशबॅकच्या रूपात.

याद्वारे आपण बचत करू शकतो.

म्हणजेच तुम्हाला भुरळ पडणारे असे असंख्य पद्धती या ई-कॉमर्स वेबसाईट्स आणत असतात. योग्य वस्तूंची माहिती आणि त्या प्रॉडक्टची इतर साईट्सवरही तुलना केल्यास योग्य पद्धतीची आपण निवड करू शकतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!