दरमहा पैसे वाचविण्याच्या सात सायकॉलॉजीकल टिप्स…


मित्रांनो आपण किती पैसे वाचवतो किंवा खर्च करतो ते आपल्या पैसे वापरण्याच्या सवयीवरुन ठरत असतं.जर आपण आपल्या मेंदुला train केलं तर या सवयी आपण स्वतःला शिकवू शकतो. आज मी तुम्हाला पैसे save करण्याच्या काही psychological tips सांगणार आहे.

1.CASH

पहीली टिप आहे कॅशचा वापर

Advertisement

जेंव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाता किंवा खरेदीला जाता तेंव्हा साधारण १००० रु.ची खरेदी असेल तर Credit card, Debbit card किंवा wallet पेक्षा cash वापरा.आपण जेंव्हा पैसे आपल्या हाताने मोजुन देतो तेंव्हा आपल्या हातुन पैसा जातोय याची आपला मेंदू नोंद घेतो.तुम्हाला सांगतो मित्रांनो १०० रु.च्या ५ नोटा देणे हे ५०० रुपयांचे Credit card द्वारे पेमेंट करण्यापेक्षा फार वेदनादायक असतं.

2. Automatic Deduction

ही एक जबरदस्त टिप आहे.ज्याप्रमाणे आपला पी.एफ automaticaly आधीच कापला जातो. त्याप्रमाणे automaticaly आपल्या account मधून काही पैसे आपोआप एका दुसर्‍या saving account किंवा मध्ये वळवा जे अकांउट तुम्ही सहजा वापरत नाही. काही वर्षानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकी तुमची रक्कम आपोआप वाढलेली असेल.

Advertisement

3. Monthly Statement

तिसरी टिप आहे महीन्याच्या जमाखर्च मांडणे. मॅनेजमेंट मध्ये एक म्हण आहे, “If you can’t measure it, u can’t manage it” म्हणून पहिल्यांदा आपलं उत्पन्न आणि खर्च किती आहे ते मोजायला सुरु करा. आणि दर महीन्याला तुम्ही बाहेर जेवण, मोबाइल बिल, खरेदी, लोनचे हफ्ते अशा अनेक गोष्टींवर केलेला खर्च आणि तुमची salary आणि इतर उत्पन्न यांचा ताळेबंद मांडा.जर खर्च उत्पन्नापेक्षा ७०% हून अधिक असेल तर तो पूढील महीन्यात कमी करण्याचा प्रयत्न करा.

4. Delayed Gratification

Advertisement

तूमच्या बरोबर असं कधी झालय का…!!! खुप भुक लागलेली असताना पाणी प्यायलात तर काही वेळासाठी भुक भागते. यालाच Delayed Gratification म्हणतात. प्रयत्नपुर्वक ही सवय आपल्या अंगी बाणवावी लागते. एखादा नवीन मोबाइल विकत घ्यायची इच्छा झाली कि तो लगेच न घेता थोडं थांबा. आणखी काही दिवसांनी कदाचित तो घ्यावासा वाटणार नाही किंवा त्याहुन चांगले मॉडेल बाजारात आलेला असेल, किंवा कदाचित मोबाइल न घेता इतर कोण्त्याही उपयुक्त गोष्टीसाठी ते पैसे तुम्हाला खर्च करावेसे वाटतील. या सवयीमुळे तुमचे बरेच पैसे वाचतील.

5. Value spending

पाचवी टिप आहे Value spendingची. Value spending म्हणजे एखादी गोष्ट विकत घेताना त्याच्या किमती इतके पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे आपल्या मनामध्ये मोजून बघा.

Advertisement

उदा. एखादा शर्ट २०००रु.चा असेल तर तेवढे पैसे कमवायला तुम्हाला २/३दिवस काम करायला लागेल हे स्वतःला सांगा.५०,०००चा मोबाइल घेण्यासाठी तुम्हाला एक महिनाभर काम करावं लागतं हे स्वतःला बजावा. आपला मेंदू मग बरोबर त्या गोष्टीची खरी किंमत जाणतो आणि अनावश्यक खरेदीपासुन आपल्याला वाचवतो.

6. Increase Income

आणि शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची टिप Robert Kiyasaki या Rich dad poor dad या पुस्तकाच्या लेखकाने सांगितल्याप्रमाणे पैसे वाचविण्यापेक्षा जास्तीत जास्त पैसे कमविण्यावर भर द्या. गाडी घेण्यासाठी पैसे साठवण्यापेक्षा गाडीसाठी अतिरीक्त पैसे कसे कमावता येतील याकडे लक्ष द्या. Actually पैसे कमावणे हे पैसे वाचवण्यापेक्षा जास्त सोपं आहे. ऑफिसमधून घरी आल्यावर रोजचे दोन तास T.V बघण्यापेक्षा किंवा Weekends ला फिरण्यापेक्षा हाच वेळ वापरून आणखी पैसे कसे कमवायचे यावर Focus करा त्यासाठी काही नवीन शिकवं लागलं तर ते शिका.

Advertisement

7.चंगळवादी गोष्टी वरील खर्च टाळा-

मिञांनो गुटखा, तंबाखू , सिगारेट व दारू यावर महिन्याला रोज 30 रु.प्रमाणे सरासरी 1000 रु. खर्च होतो. पण याच 1000 रु. चे 15 वर्षे चे planning केल्यास अंदाजे 10 लाख रुपये होऊ शकतात.

वरील गोष्टींचा नक्की विचार करा आणि आचरणात आणा…

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.