Skip to content

ह्या विजयादशमीला स्त्री शक्तीचा आदर आणि स्त्री शक्तीचा जागर करुयात.

स्त्री शक्तीचा आदर, स्त्री शक्तीचा जागर


डॉ. माधुरी मिसाळ.


दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा.

आजच्या ह्या सणाला रावणाच्या राक्षस वृत्तीचे आपण दहन करतो.

या नऊ दिवसात आपण भक्तीभावाने देवीची पूजाअर्चा केली तिला साडीचोळी चढवली.
पण खर्‍या आयुष्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत.

आपली मानसिकता का बदलत आहे? जिला देवी म्हणून आपण आदर देतो, ती जेव्हा, स्त्री म्हणून आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपण तिचा अनादर का करतो? तिच्या जन्माच्या वेळी आपण तिचे स्वागत का करत नाही?

वंशाला दिवा हवा म्हणून कित्येक स्त्रीभ्रूणहत्या आजही समाजात का होत आहेत? घरातील स्त्रीला आजही कित्येक घरांमध्ये मूल आणि चूल एवढेच तिचे क्षेत्र आहे असे का सांगितले जाते?

मुलीने घातलेल्या कपड्यांमुळे तिच्यावर बलात्कार केला असे निर्लज्जपणे सांगणारे गुन्हेगार आजही समाजात का दिसत आहेत? हुंडाबळीची संख्या अजूनही कमी का नाही?

या सगळ्यामागे समाजाची खालावत चाललेली मानसिकता, हे एकमेव कारण असू शकते. ह्या अशा मानसिकतेचे ह्या दसऱ्याला दहन करावे.
स्त्री शक्तीचा आदर करावा.

स्त्री व पुरुष हे दोघेही समाजव्यवस्थेचे आधार आहेत .कोणी एक आधार नाहीसा झाला तर समाज व्यवस्था पूर्णपणे ढासळते, कोलमडते. त्यामुळे दोन्ही आधार भक्कम हवेत.

सततच्या मानसिक आघातांमुळे स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण होते. स्त्रियांचे मानसिक आरोग्य खालावत जाते. घरातील सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेणाऱ्या स्त्रीच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात नाही.

परिणामी तिच्या आरोग्याची आबाळ होते आणि पर्यायाने सगळ्या कुटुंबावर याचा परिणाम होतो .जर घरातील स्त्री मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असेल तर कुटुंब पण मजबूत राहते.

ह्या विजयादशमीला स्त्री शक्तीचा आदर आणि स्त्री शक्तीचा जागर करुयात. स्त्री शक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊ या.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!