Skip to content

नको त्यावेळी भावना व्यक्त होत असतील तर त्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे उपाय करून पहा.

नको त्यावेळी भावना व्यक्त होत असतील तर त्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे उपाय करून पहा.


सोनाली जे.


मनुष्य , प्राणी सगळेच खरे तर भावनाशील , संवेदनशील आहेत. काही जण खूपच भावनिक असतात. बरेचवेळा त्यांच्या आपलेपणाने केलेल्या गोष्टींची, आपुलकीची , प्रेमाची , काळजी करण्याच्या आणि काळजी घेण्याच्या स्वभावाची , समोरच्याला कोणत्या गरजा आहेत हे न सांगता त्या आणि सगळ्यात त्या त्या वेळी पूर्ण करत असतात. पण बरेचवेळा समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना त्यांच्या या भावनांची जाणिव ही नसते. ते वेगळ्याच विश्वात गुरफटलेले असतात. किंवा या व्यक्तीची दखल ही त्यांच्याकडून घेतली जात नाही. तरीही ही व्यक्ती सातत्याने तिला वाटणारे कर्तव्य म्हणून करत असते. किंवा त्या व्यक्तीविषयी वाटणारे प्रेम , आपुलकी म्हणून करत असते.

पण जेव्हा सतत च दुर्लक्ष केले जाते. किंवा त्यात काय त्या व्यक्तीने केले म्हणजे तिला वाटते म्हणून केले. मी कुठे होते सांगितले काही करायला. याउलट त्या व्यक्तीने एखाद्या वेळेस काही गोष्टी केल्या नाहीत. तर उलट बोलले जाते. उदाहरण: एखादी व्यक्ती रोज आपुलकीने विचारते जेवला / जेवली का , खाल्ले का , समोरची व्यक्ती लगेच reply देणे सोडाच. तिच्या वेळेने , सवडीने , मूड ने कधी तरी reply देते. तरीही ही भावनिक व्यक्ती रोज.विचारत राहते. काही कारणाने जर एखाद्या दिवशी जमले नाही विचारायला आणि दुसरे दिवशी विचारले तर समोरची व्यक्ती उलट याच व्यक्ती ला दोषी ठरवून म्हणते काल विचारले नाही मग आज कशाला पाहिजे. असे म्हणून चक्क उत्तर देणे टाळते. आणि रोज विचारणाऱ्या व्यक्तीच्या भावना मात्र दुखावल्या जातात. की एकच दिवस गडबडीत विसरलो. तर एव्हढे वर्षानुवर्ष विचारतो हे कुठे ही count न होता जे विसरले ते मात्र लगेच count होवून direct दोष देवून रिकामे. आणि भावना दुखावल्या का .. किंवा वाईट वाटले का समोरच्या व्यक्तीला याचेही देणे घेणे नसते.

अशावेळी भावनिक व्यक्तीला जर सहन झाले नाही. नको त्यावेळी भावना व्यक्त होत असतील तर त्या वेळी एक दोघांच्यात तर वातावरण गरम असते. त्यामुळे वादच होणार . किंवा मग भावनिक व्यक्तीची रडारड.

एखाद्यावेळेस असे होते की खूप छान सगळे सुरू आहे. सगळे आनंदात आहेत. आणि अचानक एखाद्या गोष्टीवरून काही तरी बिघडते. पण तरी ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून देवून परत आनंदात राहणे जमत नाही.

याशिवाय पूर्वी कधी तरी काही तरी मनाविरुद्ध झालेली घटना आठवते. किंवा पुढे काही तरी प्लॅन्स समोरच्याने केले असतात जे या भावनिक व्यक्तीला वगळून , न सांगता , महत्व न देता परस्पर काही सुरू असतें.
हे त्या भावनिक व्यक्तीला इतर कोणाकडून समजते तेव्हा ते खटकते. अशा वेळी आपल्या सह सगळे छान मूड मध्ये आनंदात आहेत हे विसरून नको त्यावेळी भावना व्यक्त होत असतील. राग येणे , वाईट वाटणे , निराशा आणि त्यातून समोरच्या व्यक्तीला दोष देवून , टोचून बोललो तर वातावरण चिघळत जाते.

उदाहरण : – अगदी नवरा बायको छान मूड मध्ये आहेत. आणि बायको खूपच भावनिक आहे. तिला आधी असे काही समजले आहे जे नवऱ्याने तिला डावलून केले आहे. आणि तिला सांगितले ही नाही. तर ती त्या बेडवरच्या छान क्षणी ही एकदम नवऱ्याला त्या गोष्टीवरून बोलायला सुरुवात करते. कधी शांतपणे की मला हे आवडले नाही. पटले नाही. किंवा मग एकदम वाद , तू असे का केले , किंवा मग चिडचिड , रडारड.

म्हणजे त्या क्षणी दोघात जे चांगले वातावरण होते तेही खराब झाले. आणि नको त्यावेळी भावना व्यक्त होत गेल्या. त्यातून अजून तू तू मैं मैं सुरू होवून कोणत्याही दिशेला ते भरकटू लागते.

म्हणूनच नको त्यावेळी भावना व्यक्त होत असतील तर त्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे उपाय करून पहा. :-

१. शक्यतो कायम हे लक्षात ठेवायचे की कोणत्याच गोष्टीला लगेच प्रतिसाद आणि प्रतिक्रिया या द्यायच्या नाहीत : –

मानवी स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीला आपण लगेच react होतो. त्या ऐवजी आपण स्वतः वर कंट्रोल करण्यास शिकणे गरजेचे. जेव्हा अस काही घडते तेव्हा शांत राहायचे. React व्हायचे नाही. कारण ते त्या क्षणिक परिस्थिती , विचार , वातावरण याला आपण दिलेली प्रतिक्रिया असते. आणि हे क्षणिक वातावरण , परिस्थिती ही बदलणारी असते. त्यामुळे तेव्हा शांत राहिले की ती वेळ निघून जाते.

आणि मग शांतपणे प्रतिसाद द्या. म्हणजे त्या वर विचार करून , मार्ग काढा. शोधा. एकमेक बोला. तेव्हा तो तापलेला तवा शांत झालेला असतो त्यामुळे कोणालाच भाजनार ही नाही. आणि उपाय ही निघतील. आणि वेळ गेल्याने ही परत शांतता राहील.

२. जेव्हा जे वातावरण , मुड असेल तो क्षण , त्या व्यक्ती, किंवा कुटुंब, मित्र मैत्रिणी यांच्या सोबत एन्जॉय करा. :
त्याक्षणी इतर कोणतेही विचार करू नका. जरी कोणी आधी किंवा त्यांक्षणी तुमच्या सोबत कसे ही वागले असो. त्यांचे वागणे चुकीचे असेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीत involve केले नसेल. तरी त्याक्षणी सोडून द्या ते सगळे. त्या क्षणी सगळे आनंदात आहेत तर ते तसेच वातावरण टिकवून ठेवणे गरजेचे असते. म्हणजे आहे त्या गोष्टीत जास्त involve व्हा. ज्या गोष्टी नाहीत त्या तेव्हा इग्नोर करा.

तर तुम्ही नको त्यावेळी भावना व्यक्त करणार नाही.

३. भावना आणि विचार यावर संयम ठेवा :

दुसरे असे आधी काही तरी घडून गेले असेल आणि उगीच ते आठवून आता या क्षणी उगीच भावना व्यक्त करून तो बदला किंवा ती आठवण काढून आज वर्तमान आणि उद्याचे भविष्य ही खराब करू नका.

सगळ्यात महत्वाचे त्याक्षणी संयम ठेवा. त्याकरिता खूप प्रयत्न करावे लागतात. शांत राहणे म्हणजे तपस्या च असते.

आपल्या षड रीपुंवर कंट्रोल ठेवणे म्हणजे त्याकरिता खूप अथक परिश्रम , योगा , एकाग्रता , meditation यातून स्वतः वर , भावना , विचार यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. ते आत्मसात करावे लागते.

४. REBT : रॅशनल इमोटिव्ह behavioral therapy : –
आपले विचारच आपल्याला घडवत असतात.
ते सकारात्मक आहेत का नकारात्मक यावर आपली पुढची कृती आणि म्हणले तर आपले आयुष्य ही घडत असते.

अल्बर्ट एलिस यांनी ही सगळ्यांच्या जीवनाला , आयुष्याला कलाटणी देणारी , सकारात्मक अशी ‘ विवेकनिष्ठ उपचारपद्धती ‘ सुरू केली.
अल्बर्ट एलिस यांच्र्या मते आपल्या सगळ्या त्रासदायक भावना आणि अतार्किक वागण्यामागे मनात चालणारे अतिरेकी विचार , त्यातून निर्माण होणाऱ्या भावना असतात. या थेरपी ची काही तत्वे

१. मी प्रत्येक गोष्ट कुठल्याही परिस्थितीत चांगलीच केली पाहिजे नाही तर माझ्यात काही अर्थ नाही.

२. प्रत्येकाने माझ्याशी कुठल्याही परिस्थितीत चांगलेच वागले पाहिजे, सन्मानाने वागले पाहिजे. नाही तर मग ते लोक वाईट.

३. जीवना कडून मला हवं ते मिळालं च पाहिजे. , नाही तर मी ते सहन करूच शकत नाही.

या तीन टोकाच्या अपेक्षांच्या मुळे (३ मस्ट) येणारे अविवेकी विचार , हे आपल्या सगळ्या भावना जसे राग , ताण , निराशा यांचे मूळ कारण असते.
याचमुळे नको त्या वेळी आपल्या भावना व्यक्त होत असतात. अविचारी वागणं घडत असते.

यावर कंट्रोल ठेवण्यासाठी पहिली गोष्ट Irrational self talk..आपल्या विचारांचा मागोवा घेत अतार्किक स्वगत बदलायचे, आपल्या मुड्स वर काम करण्याऐवजी आपण अतार्किक आणि तार्किक विचार समजून घेवून त्या मूड्स मागच्या मनातल्या विचारांवर काम करण्याची गरज असते.

विचार करण्याची क्षमता प्रत्येकात असते. तसे मनातल्या विचारांवर काम करण्याची क्षमता ही प्रत्येकात असते. आणि आपले बदललेले वस्तुनिष्ठ विचारच आपल्याला स्वतः वर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. आणि आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी, राहण्यासाठी मदत करतात.

आर इ बी टी ही मनोरुग्ण आणि सामान्य माणसांना ही रोजच्या जीवनात मन, भावना , ताण यातून मोकळे होण्यासाठी ही विचारपद्धती खूप उपयोगी आहे. मदत करते. आपल्या जीवनाला नवीन दिशा देते.

आपल्या मनाशी चालणार अविवेकी स्वगत, आपलं आणि इतरांचे जीवन दुःखी करत असते. अविवेकी आणि अतार्किक विचार हे आपल्या काही ठाम मतांमधून , beliefs , धारणाधून आलेले असतात.

प्रत्यक्ष परिस्थिती पेक्षा त्यांच्याबद्दल चे आपले मनातले विचार, इतर कोणी सांगितलेले विचार आणि त्यात आपल्या विचारांची भर यातून ते अजून जास्त भीतीदायक होत जातात. किंवा भीतीदायक असतात.

आणि आपल्या मनातल्या या निराशावादी , नकारात्मक विचारांची स्वगत बदलून विवेकी विचारात बदलण्याची क्षमता असतेच ती वाढवायची.

भूतकाळातल्या घटना आठवून , विचार आठवून त्या गोष्टींचे विश्लेषण करण्यापेक्षा , आपल्या वागण्याची करणे शोधण्यापेक्षा सारासार विचार करून वर्तमानात जगणे , विचार करणे या गोष्टीवर ही थेरपी भर देते.

Iraational self talk मुळे परत परत त्याच अविवेकी , अतार्किक गोष्टी विचारात येवून त्रासदायक भावना पुन्हा पुन्हा उद्दिपित होतात.

वर जी तीन तत्वे दिली .कोणत्याही परिस्थिती मध्ये मी प्रत्येक गोष्ट चांगलीच केली पाहिजे.

या समजामुळे मनात चिंता , विफलता , भीती, खिन्नता , निराशा , निरर्थक वाटणे या भावना उफाळून येतात.

कुठल्याही परिस्थिती मध्ये इतरांनी माझ्याशी चांगले वागले पाहिजे तसे नाही झाले तर ते वाईट, ते कायमच वाईट वागणार, ते वाईटच आहेत ,

हा समज मनात राग , चिडचिड , संताप, द्वेष , खुन्नस , असुरक्षितता या भावनांना जन्म देतो.

या खेरीज तिसरे माझे आयुष्य माझ्या मनासारखे, कोणत्याही अडथळ्यां शिवाय सुरक्षित आणि सुखिच असले पाहिजे , तसे नसेल तर ते मी स्वीकारू शकणार च नाही. सहन करू शकणार नाही. मला जगणे अशक्य होईल.
अशविचारांमुळे खिन्नता , वैफल्य , परिस्थिती असह्य होणे, स्वतःचा राग येणे, इतरां चा राग येणे, स्वतः ची कीव येणे, राग अशा भावना उद्दिपित होतात.

म्हणून कायम लक्षात ठेवायचे की ,
१. आपल्या स्वतः च्य भावना आणि कृतींसाठी आपणच जबाबदार असतो.

म्हणून त्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असते.

२. आपल्या मनातल्या त्रासदायक भावना , अविचारी वागण्याला आपल्या स्वतः कडूंच्या मागण्या आणि इतरांकडून असलेल्या मागण्या कारणीभूत असतात. मनाविरुद्ध घडलेलं सहन करतच न येणे, अविवेकी समज, विचार कारणीभूत असतात.

टोकाच्या अपेक्षा करण्या ऐवजी प्राधान्यक्रम ठरवायचे.
हे सहन करणे शक्य नाही ऐवजी परिस्थिती शी लढण्याची शक्ती वाढवायची, लोक आपल्या मना प्रमाणे वागावे ही आपली अपेक्षा असते तसे त्यांना ही आपल्या मनाप्रमाणे वागायचे असते हे लक्षात घ्यायचे तर त्रास होणार नाही. भावना नको त्या वेळी व्यक्त होणार नाहीत. कंट्रोल राहील.

स्वतः वर प्रेम करायचं. सर्वात आधी ते शिकले की इतरांच्या कडून अपेक्षा कमी होतात. आणि अतिरेकी विचारांवर ताबा मिळविता येतो त्यातून आपला आनंद शोधता येतो. गवसतो. अवघड परिस्थितीत ही आनंदाने जगता येते.

बरेचवेळा परिस्थिती , भावना कंट्रोल मध्ये नसतात तेव्हा एकटे राहावे वाटते. अशावेळी कोणी सतत बोलू लागले तर चिडचिड होते ..मला एकटे शांत राहू दे की असे फटकन बोलले जाते. नको तेव्हा भावना उफाळून येतात.

एखादी व्यक्ती आपल्याशी विचित्र वागते. रिलेशनशिपमध्ये अपयश येते. तेव्हा मी जुळवून घेण्यास कमी पडले. माझ्यात कमी आहे म्हणून ती व्यक्ती अशी वागते. मी नालायक आहे म्हणून ती अशी वागली. तिच्या दृष्टीने इतर व्यक्ती लायक आहेत म्हणून त्यांच्याशी चांगली वागते.
आपला अपमान , राग या आपल्या मनातल्या अविवेकी विचारांच्या मूळ नकारात्मक भावना परत परत उद्दिपित होतात. आणि भावना त्रासदायक ठरतात.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतच्या अतार्किक आणि अविवेकी विचारांवर ताबा मिळविणे गरजेचे असते. स्वतः लार इतर चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. सकारात्मक गोष्टी करा.

इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या स्वतः पूर्ण करण्याची तयारी आणि जिद्द ठेवा.

माणसाच्या हातात परिस्थिती बदलणे शक्य नसते, इतरांचे वागणे आपल्या इच्छेनुसार बदलणे शक्य नसते. इतरांच्या मनात आपल्या विषयी भावना निर्माण करणे ही शक्य नसते. मग आटा पिटा करून , आदळआपट करून , चिडचिड करून , राग काढून परिस्थिती अजून अनियंत्रित होणार असते. त्यातून सगळ्यांना त्रास होणार असतो.
अशावेळी परिस्थिती कडे ,लोकांच्या वागण्या कडे बघण्याचा आपला दुष्टिकोन बदला. तो आपल्या हातात असतो. त्यातून आनंद आणि शांतता मिळेल.

आणि नको त्या वेळी भावना व्यक्त होणार नाहीत. आपलं आणि आपल्या जवळच्या लोकांचे आयुष्य आनंदी आणि सुखी , समाधानी , शांततामय बनविणे हे आपल्याच हातात आहे. आपल्या विचार आणि दृष्टिकोन यात बदल घडविणे महत्वाचे. इतरांनी कसे वागावे यात अडकू नये.
आपल्याला भावना आहेत तशा इतरांना ही असतील. आपल्याला त्यांच्या विषयी वाटते म्हणजे त्यांना आपल्या विषयी काही वाटेलच असे नाही. त्या जागी दुसऱ्या कोणाविषयी त्यांना वाटत असते.
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावरून स्वतः त्रास करून घेणे आणि इतरांना देणे सोडून द्यायचे.

हे खरे तर खूप उशिरा समजते जेव्हा आपण आपल्या व्यक्ती गमावतो तेव्हा. पण ठीक त्यानंतर तरी परत आपण कधीच अशा अवेळी भावना व्यक्त करणार नाही नक्कीच. त्यातून आपले आणि इतरांचे आयुष्य ही आनंदी आणि शांततामय होईल.

All the best.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!