Skip to content

मनात गोंधळ असेल तर एखाद्या एक्स्पर्टचा सल्ला घ्यायला हवा का ?

मनात गोंधळ असेल तर एखाद्या एक्स्पर्टचा सल्ला घ्यायला हवा का ?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“निशी खूप दिवस झाले बघत आहे तु शांत शांत बसलेली असतेस. कोणामध्ये पहिल्यासारखी मिसळत नाही, बोलत नाहीस. काय झालंय? तुला काही प्रॉब्लेम जाणवत असेल तर मला सांग आपण दोघं त्यावर मिळून विचार करू. पण अशी शांत बसून राहू नकोस.” प्रतिक निशिसोबत बोलत होता. प्रतिक आणि निशी खूप चांगले मित्र होते. शाळेमध्ये एकत्र, पुढे कॉलेज मध्ये पण एकत्र. त्यांच्या कुटुंबाची चांगली मैत्री होती त्यामुळे साहजिक ही दोघं पण लहानपणापासून एकमेकांसोबत वाढली होती. दोघांना एकमेकांचे स्वभाव खूप चांगले माहीत होते.

निशी पहिल्यापासून खेळकर, हसरी आणि बडबड्या स्वभावाची होती. हात पाय गप्प राहतील पण तोंड कधी शांत असायचं नाही. घरातली तिच्या बडबडीला अक्षरशः कंटाळून जायची. मग तीच ऐकणार कोण? तिच्याशी गप्पा कोण मारणार? तर प्रतीक. त्याला तिच्याशी बोलायला, खेळायला फार आवडायचं. लहान असताना पण कोणी आलं नाही तरी त्यांची ती दोघं खेळत बसायची. पुढे शाळेत पण एकत्र असल्याने सोबत जायची यायची त्यामुळे घरातील लोकांना काळजी नसायची. दोघांच्याही घरातली लोकांना माहीत होत ही दोघं एकटी पडणार नाहीत. स्वतःच काही सिक्रेट असेल, काहीतरी गोंधळ घालून ठेवला असेल तर तो एकवेळ आई बाबांना सांगणार नाहीत पण एकमेकांना सांगतील अशी ही दोघं होती.

पुढे कॉलेजमध्ये आल्यावर त्यांना नवीन मित्र मैत्रिणी भेटले. त्यांचा मोठा ग्रुप झाला. निशी आधीपासूनच बडबडी, उत्साही असल्याने सर्वांना हवीहवीशी वाटे. कारण तिच्यामुळे वातावरणात एक जिवंतपणा येई. प्रतिक पण काही कमी हुशार नव्हता. डान्सिंग मध्ये नेहमी पुढे. कलेचा आसक्त त्यामुळे सर्वांमध्ये फेमस. अस जरी असल, आजूबाजूला खूप सारे नवीन मित्र मैत्रिणी असले तरी यांच्या मैत्रीवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. लहानपणीची ती दोघं आताही तशीच होती. न बोलता देखील नुसत्या कृतीवरून त्यांना अंदाज येई की काहीतरी ठीक नाही, बिनसलेले आहे.

बाकी कोणाला समजलं नाही तरी यांना ते लगेच लक्षात येई. असच काहीस निशीच्या बाबतीत झालं. नेहमी सर्वामध्ये मिसळणारी, हसत खेळत राहणारी निशी गेले कित्येक दिवस गप्प होती. त्यांच्या exam सुरू झाल्या होत्या त्यामुळे प्रतिकला वाटलं ती त्या गोंधळात असेल म्हणून त्याने लक्ष दिलं नाही. पण परीक्षा होऊन गेल्या तरी निशी तशीच होती. कॉलेजमध्ये यायची आणि लगेच निघून जायची. सर्वांसोबत बसलेली असली तरी तिचा लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नसायचं.

खूप दिवस पाहून पाहून नंतर प्रतीक ने एक दिवस तिच्याकडे हा विषय काढला. एक लेक्चर झालं होत व ती दोघं कॅन्टीन मध्ये बसली होती. आता पण जेव्हा प्रतीक तिच्याशी बोलत होता जेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हत. ती वेगळ्याच विचारात हरवल्यासारखी वाटत होती. दोन तीनदा जोरात बोलल्यावर तिने त्याच्याकडे लक्ष दिलं. त्याने परत तेच विचारलं की ती का अस वागत आहे? पण तिला काहीही नीट सांगता येत नव्हत. ती म्हणाली, “प्रतीक मलाच समजत नाही मला नेमकं काय होतय, एकप्रकारचा गोंधळ मनात निर्माण झाला आहे. माझा मला तो सुटत नाही मी तुला तरी कस सांगू? गेले काही दिवस खूप अस्वस्थता जाणवत आहे. ती कश्याने नेमकी निर्माण झाली मला नाही सांगता येणार.

पण ती कमी करता येत नाही याचाच मला अजून त्रास होतोय. सारखं चुकल्या चुकल्या सारखं वाटत राहतं. आपण कुठेतरी भरकटत आहोत अशी जाणीव होत राहते. आता हे सर्व कश्याने होतय हे माझ मला समजत नाही. सारखे वेगवेगळे विचार मनात येत राहतात. त्यामुळे कुठेच लक्ष लागत नाही. तु म्हणतोस तुला का सांगत नाही. पण तुला तरी मी काय सांगू? आता तू पाहिलं ना इतका वेळ मी बोलत आहे. तुला खरच काही समजल का?” ही खरी गोष्ट होती की प्रतिकला यावेळी काही अंदाज लागत नव्हता निशी ना नेमक काय म्हणायचं आहे.

पण तो तिला दोष देणार नव्हता. त्याला तिची अवस्था समजत होती. आपल्याला स्वतः लाच जेव्हा काही गोष्टींची उत्तर मिळत नसतात तेव्हा कसं वाटू शकत याची त्याला जाणीव होती. तिचं तिलाच समजत नव्हत तर ती त्याला तरी काय सांगणार होती. पण त्याला या गोष्टीचं गांभीर्य पण माहीत होत आणि म्हणूनच त्याने मनाशी काही योजल. तो निशीला म्हणाला, “निशी जरी तू काही सांगू शकत नसलीस तरी आताच्या तुझ्या बोलण्यावरून मी समजू शकतो तुला काय वाटत असेल.

एक मित्र म्हणून तुला मी मदत करू शकत नसलो तरी तुला कोणाकडे नेल्यावर तुझी ही समस्या सुटू शकते हे मला माहीत आहे.त्यांच्याकडे मी तुला नेऊ शकतो. ते तुझ्या या समस्येला समजून घेऊ शकतील आणि तुला यातून बाहेर पण काढू शकतील.” निशीचा प्रतिकवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे ती ही लगेच तयार झाली. शेवटी ती तरी किती दिवस हा त्रास सहन करणार होती. प्रतिक तिला एका चांगल्या समुपदेशक तज्ज्ञाकडे घेऊन गेला. त्यांचं तिच्याशी बोलण झालं, तिच्या काही चाचण्या घेण्यात आल्या, काही सेशन घेण्यात आले आणि काही काळानंतर निशी पूर्णपणे बरी झाली. तिला तिचं पहिल अस्तित्व मिळालं आणि प्रतीकला त्याची तीच हसरी, बडबडी मैत्रीण.

मित्र मैत्रिणी, घरातली माणसं आपल्या कितीही जवळची असली तरी काही बाबतीत अस होत की त्यांना पण आपली अवस्था समजून येत नाही. मर्यादा पडतात. आपण जरी त्यांच्याशी बोललो तरी त्यातून आपल्याला तात्पुरतं बर वाटत. पण कायमस्वरूपी आपल्याला बर वाटायचं असेल तर त्यासाठी त्या त्या वेळी तज्ञांचा सल्ला घेणच योग्य ठरतं. कारण अनेकदा आपल्यालाच समजत नाही आपल्यासोबत काय होत आहे. पण तज्ज्ञांना ते शोधून काढता येतात कारण त्यांच्याकडे ते कौशल्य असत. जसं सोनाराने कान टोचलेले योग्य असते म्हणतात तसच ज्या व्यक्तीला त्यातली माहिती आहे, त्यातल कौशल्य आहे त्याच्याकडे आपण सल्ला घेतला, मदत घेतली तर आपली समस्या सुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मनात गोंधळ निर्माण होत असेल तर एक्स्पर्टचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!