Skip to content

विनाकारण एक्सप्लेनेशन देण्याची आपल्याला सवय असते, ही सवय अशी दूर करा.

विनाकारण एक्सप्लेनेशन देण्याची आपल्याला सवय असते, ही सवय अशी दूर करा.


पुजा सातपुते


आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच लोकांच्या संपर्कात येत असतो. कधी वयक्तीत रित्या तर कधी कामा निमित्त. त्यातल्या काही लोकांना आपण विसरून जातो तर काही लोकं आपले खास बनतात. कळत नकळत आपण ते नातं पुढे नेतो. यामध्ये कधी आपली घानिष्ठ मैत्री होते ते कळत सुद्धा नाही.

सतत संपर्कात राहिल्याने एक युनिक बॉण्ड तयार होतं आणि आपण त्या व्यक्ती शिवाय राहू शकत नाही. काही ना काही कारणाने आपल्याले ते हवे हवे से वाटत राहतात . काही ना काही कारणाने आपण त्यांच्याशी संपर्क करत राहतो, भेटत राहतो.पण म्हणतात ना सतत संपर्कात राहिल्याने, जास्त ओळख निर्माण झाल्याने दोन गोष्टी होतात, पहिली म्हणजे आपण त्या व्यक्ती शिवाय राहू शकत नाही, ती व्यक्ती आपला विकनेस बनते आणि दुसरी म्हणजे सतत संपर्कात राहिल्याने आपला व समोरच्याचा इंटरेस्ट हळू हळू कमी व्हायला लागतो.

आयुष्य हे नेहमी आनंदी नसतं. दुःख व सुखाच्या दिवसांची सांगड म्हणजेच आयुष्य. आपल्या आयुष्यात व नात्यांमध्ये सतत बदल हे घडत असतात. कधी प्रेम तर कधी भांडण. माणूस म्हंटल्यावर भावना या आल्या आणि भावना अति प्रमाणात निर्माण झाल्या तर आपण हळवे होतो , हळवे झाल्यावर कोणी जर आपल्याला बोललं तर आपलं मन दुखावता आणि मन दुखावलं तर ते भांडणात रूपांतर होतं. आत्ता भांडण जर परक्या कोणाबरोबर झालं तर एवढा फरक पडत नाही पण जर ते आपल्या खास आणि जवळच्या व्यक्ती बरोबर झालं तर आपल्या मनाला त्रास हा नक्कीच होतो.

भांडण पुढे वाढू नये यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. आपल्या मनात काय आहे किंव्हा आपण तसे का वागलो, तसे का बोललो याचं एक्सप्लेनेशन द्यायला जातो पण राग हा इतका खराब आहे ना कि तो अनावर झाला तर आपण काहीच ऐकण्याच्या मानस्तितीत नसतो. मग त्या व्यक्तीला आपण काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही.

हे सगळं करताना आपल्याला आपले प्रयत्न व्यर्थ गेल्या सारखे वाटतात. त्यामुळे आपण निराश होतो, स्वतःच्या चुकी बद्दल विचार करायला लागतो. जरी आपली चूक नसली तरी आपण ती स्वतः वर ओढवून घेतो. नको नको ते विचार मनात येतात, त्याचा परिणाम आपल्या तब्येती वर व आपल्या दिनचर्ये वर व्हायला सुरवात होते. आपली प्रिय व्यक्ती आपल्या पासून दुरावली आहे त्याचं दुःख आपण पचवू शकत नाही आणि मग विनाकारण एक्सप्लेनेशन देण्याची आपल्याला सवय लागते.

खरं म्हणजे आपले जे खास असतात ना आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना आपल्याला एक्सप्लेनेशन द्याची गरजच पडत नाही. त्यांना आपला स्वभाव पूर्ण माहित असतो. आपण तसे का वागलो असणार हे पण त्यांना नक्कीच माहित असतं. जरी आपल्या खास लोकांना आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडलीच तर ते आपल्या भावनांना समजून घेतात आणि ज्यांना समजण्याची इच्छाच नसते त्यांना कितीही एक्सप्लेनेशन दिलं तरी त्याचा उपयोग होत नाही.

प्रत्येक रिलेशन हे वेगळ असतं. आपण जर ते खूप घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या हातून तेवढं सुटत जातं. म्हणून कधी कधी त्याला थोड्या वेळासाठी सोडून दिलं तर नक्कीच सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होते. जसं बघा, तुम्ही हातात रेती घेतली आणि हाथ हलका सोडला तर ती रेती तुमच्या हातात तशीच राहते पण तुम्ही जर हाथ घट्ट बंद करून ठेवला तर ती रेती तुमच्या हातातनं सुटायला लागते.

नात्यांचही तसच आहे. त्यामुळे विनाकारण एक्सप्लेनेशन देणं सोडून द्या. त्या पेक्षा सगळं नॉर्मल होण्यासाठी थोडा वेळ द्या आणि त्या वेळेत स्वतः मध्ये पॉसिटीव्ह बदल आणायचा प्रयत्न करा. आपल्या मध्ये आपल्या स्वतः व्यतिरिक्त कोणीही बदल आणू शकत नाही. स्वतःला स्वतः मध्ये गुंतवा, तुमची हॉबी जोपासा, एखादा कॉमेडी मूवी बघा आणि मुख्य म्हणजे स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तिची हीच इच्छा असते कि तुम्ही खुश राहावं. तुमचा हसरा चेहरा त्या व्यक्तीला आनंद देतो. ती व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जाऊ शकत नाही. हा फक्त एवढच असतं कि काही जणांना थोडा वेळ व स्पेस हवा असतो आणि ते मिळालं तर तुम्हाला विनाकारण एक्सप्लेनेशन द्यायची गरजच पडत नाही.

त्यामुळे खुश राहा, हसत राहा. खूप जन्मातना जाऊन आल्यावर आपल्याला माणसाचा जन्म मिळतो. हा जन्म विनाकारण एक्सप्लेनेशन देण्यात किव्हा डिप्रेशन मध्ये घालवू नका. भरवसा ठेवा, वेळ सर्व काही ठीक करते.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “विनाकारण एक्सप्लेनेशन देण्याची आपल्याला सवय असते, ही सवय अशी दूर करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!