Skip to content

कोणत्याही परिस्थिती मध्ये strong राहता येणं…‌हि स्री ची खरी शक्ती आहे….!!!

कोणत्याही परिस्थिती मध्ये strong राहता येणं…‌हि स्री ची खरी शक्ती आहे….!!!


मयुरी महाजन


स्री आणि पुरुष हे विधात्याने घडवलेली एक सुंदर कलाकृती आहे, स्त्री व पुरुष दोघेही मानव असले, तरी दोघांमध्ये कमालीचा फरक आढळून येतो ,बरेचदा असं म्हटलं जातं की स्त्रिया खूप भावनिक असतात, आपले अश्रू लगेच त्यांच्या डोळ्यात तरडतात, मग एखाद्या वेळेस टीव्ही बघताना जरी भावनिक सीन समोर असेल, तरी स्त्रियांचे डोळे अश्रूंनी तरडतात ,

पण हेही अगदी खर आहे ,की तेच डोळे पुसून पुन्हा नव्याने ठाकलेल्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद सुद्धा स्त्रीचं आहे ,पुरुषाच्या आयुष्यात स्री चे स्थान हे आदिशक्तीच्या रूपाने आहे, ज्या आदिशक्तीची नवरात्रीत नऊ दिवस मोठ्या व्यक्ती भावाने आराधना होते, तीच आदिशक्ती आपल्या प्रत्येकाच्या घरात आईच्या, पत्नीच्या, मुलीच्या ,बहिणीच्या रूपाने वास करते, याचा कुठेतरी विसर पडतो,

सविता पवार म्हणून एक महिला आहे, आणि त्या महिलेच्या जिद्दीची कहाणी आपल्याला खरंच कुठल्याही परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग राहून त्यांनी आपल्याला स्री शक्तीची नव्याने ओळख करून दिलेली आहे, ही काल्पनिक कथा नाही ,कुठल्याही कल्पनेच्या मनोर्‍यांनी रचलेली कहाणी नाही, ही सत्य घटना व आपल्याला जगण्याकडे एका विशाल दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडणारी आहे,

सुनिता पवार यांचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले. कोवळ्या व नकळत्या वयात लग्नासारखी जबाबदारी अगदी हसून पार पाडत होत्या, परिस्थिती हलाखीची असली तरी कधी कुणापुढे हात पसरून भीक मागायची नाही, अशा विचारांच्या सुनीता ताईंना आयुष्य त्यांची अजून किती परीक्षा घेणार हे ठाऊक नव्हते, लग्नानंतर काही वर्षांनी सुनीताताई गर्भवती राहिल्या, व त्या गर्भवती असताना, जिथे बिल्डींगचे काम चालतात तिथे त्या सिमेंट आणि विटा यांच्या वाहतुकीचे काम करायच्या, एके दिवशी काम करत असताना त्यांची जी साखळी असते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माल द्यायची, त्या साखळीत वरच्या भागाला असलेली महिला, एकदम सून्य आणि एकच ठिकाणी उभी राहिलेली सुनिता ताईंना दिसली,

त्यांना वाचण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, व तेथे काही कळायच्या आतच त्यांना जोराचा शॉक बसला, व त्या शॉकची तीव्रता एवढी जास्त होती, की सुनीता ताईंचे दोघं हातांचे पंजे जळून गेले व उपचारांती त्यांचे कोपर्‍यापर्यंतचे थोडं अलीकडच्या बाजूपासून संपूर्ण दोघ हातांचे पंजे कापावे लागले, परंतु या परिस्थितीला ही सुनीताताई पूर्ण क्षमतेने सामोरे गेल्या, त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला ,व याही पुढे त्यांना परीक्षा द्यावी लागेल, असं वाटलेलं नसताना ,आई-वडिलांनी ही आसरा दिला नाही, नवऱ्यानेही त्यांना आसरा दिला नाही,

उलट दुसरे लग्न करून घेतले, पण सुनीताताई जिद्दी होत्या ,खूपदा मरावसं पण वाटलं, परंतु त्या सांगतात, की मी माझ्या मुलीसाठी पुन्हा जगायचं ठरवले, व ज्या हातांवर आघात झाला, आज त्याच हाताने त्या स्वयंपाक घरातील सर्व पाककृती अगदी उत्तमरीत्या बनवतात ,घरातील सर्व कामे मुलांना सांभाळण्यापासून घर आवरणे सर्व ते स्वतः करतात,

सुनिताताई म्हणतात भीक मागून कुणाकडे किती दिवस मागायची, त्यापेक्षा स्वतःकडे नसलेल्या क्षमतांपेक्षा स्वतःकडे असलेल्या क्षमतांना कामाला लावून जे काही साध्य करता येईल, त्यासाठी झोकून द्यावं स्वतःला…. स्वाभिमानाने जगणाऱ्या सुनीता ताईंना स्री शक्तीचा सलाम……

आपण बरेचदा ऐकतो, अमुक एका व्यक्तीने आत्महत्या केली, महिलांपेक्षा पुरुषांचे त्याबाबतीत प्रमाण जास्त आहे, आणि हो आत्महत्या करून गेलेला कुठलाही व्यक्ती त्याच्यामागे त्याची बायको पोरं सोडून जातो, अशा परिस्थितीला ही स्री अगदी ठामपणे सामोर जाते ,दुःख गिळून त्या प्रसंगातून आपल्या पोरांना वाढवते, आणि चांगला माणूस घडवते,

बरेचदा स्त्रीला कमजोर समजले जाते ,परंतु स्त्री आबला नाही, सबला आहे, KGF मध्ये तो डायलॉग आहे ,
“दुनिया में माँ से बडा ताकदवार कोई नहीं”

म्हणून स्रीला स्री ची ताकद ओळखणे फार गरजेचे आहे, परिस्थिती कितीही बेताची असली, तरी ती डगमगत नाही, स्री ही त्यागी आणि सहनशील आहे, परंतु तिच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस करू नये, नाहीतर ती दुर्गा पण आहे, चंडी पण आहेच, आणि महत्त्वाचं स्री सुद्धा स्वतःसाठी जगू शकते, परिस्थिती हरवायला आली म्हणून ती त्या समोर नतमस्तक होत नाही, त्यालाच आपली ताकद बनवून लढत असते ,आणि जिंकते, कोणत्याही परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग राहता येणे ही स्री ची खरी शक्ती आहे…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!