Skip to content

आयुष्य मानलं तर सोपं नाहीतर कठीण!!

आयुष्य मानलं तर सोपं नाहीतर कठीण!!


पुजा सातपुते


आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात ज्यांचा आपल्याला ठाम पणे सामना करावा लागतो .माणूस जन्माला आल्या पासून बऱ्याच प्रसंगानां तोंड देत असतो . अगदी बोलायला शिकण्या पासून ते चालण्या पर्यंत किव्हा अभ्यासाच्या परीक्षे पासून ते जीवनाच्या परीक्षे पर्यंत . अश्या बऱ्याच गोष्टी आणि बरीच आवाहना .

देवाने विचार करण्याची क्षमता ही माणसाला दिली आहे . या जगात जितके ही जीव आहेत त्यात माणसाचा जन्म हा सर्वांश्रेठ मानला जातो . माणसाला देवा कडून तर्क लावण्याची , आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर काही तरी करून दाखवण्याची , प्रयत्नाने आपला उद्धेश साध्य करण्याची शक्ती दिली आहे . जर आपण या वरदानाचा उपयोग केला तर आपण आपल्या आयुष्यात खूप सारे सकारात्मक बदल घडवून आणू शकतो .

कुठलाही कठीण प्रसंग बदलण्याची क्षमता आपल्यात आहे हा जर अटीट्युड ठेवला तर डिप्रेस होण्याचा किव्हा डिप्रेशन सारख्या आजारपणाचा विचार देखील मनात येणार नाही . मानलं तर सोप्पं नाहीतर कठीण या जर तत्वाचा मार्ग निवडला तर बरेच कठीण प्रश्न अगदी सहज रित्या सुटू शकतात .

जर कुठल्याही प्रसंगाचा सामना पॉसिटीव्ह अटीट्युड ने केला तर तो प्रसंग नक्कीच सोप्पा वाटू लागतो . प्रयत्न करण्या अगोदरच आपण हा विचार केला कि या कठीण गोष्टीचा सामना मी कसा करणार तर या प्रश्नाचं उत्तर हे कधीच सापडू शकणार नाही . त्या पेक्षा जर पॉसिटीव्ह विचाराने मार्ग शोधला तर ऑप्टिमिस्टिक उत्तर नक्कीच मिळेल . पेस्सीमिस्टिक प्रश्ना पेक्षा ऑप्टिमिस्टिक उत्तर हे कधीही चांगलं .

आपल्या समोर अश्या बऱ्याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी नकारात्मक मार्ग सकारात्मतेत बदलला आहे आणि आपल्या समोर एक उदाहरण सेट केलं आहे . तुम्ही तुमचंच उदाहरण घ्या ना . लहानपणी खेळ खेळताना कधी कधी सहज पणे तुम्ही जिंकयचे, का तर तो खेळ तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी खेळायचे , कोणाला कंपेटिशन देण्या साठी नाही .

मग मोठे झाल्यावर आपण का एवढा विचार करतो , विनाकारण टेन्शन घेतो आणि आपल्या भोवती नकळत पणे कंपेटिटिव्ह वातावरण निर्माण करतो . जीवनाच्या या स्पर्धेत आपण परीक्षा कशी सोडवतो हे आपल्या हातात असतं .

कठीण प्रश्न बघून परीक्षा नाही द्यायची का उत्तरपत्रिकेला आपल्या कडून झालेलेल्या चुकांच्या एक्सपेरियन्सस चा सप्लिमेंट जोडून आणि स्वतः मध्ये पॉसिटीव्ह बदल आणून ती परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन एक एक्साम्पल सेट करायचं…हा चॉईस आपला आहे .

शेवटी…मानलं तर सोप्पं नाहीतर कठीण .


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!