Skip to content

त्यांची काळजी कधीच करू नका, ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो.

त्यांची काळजी कधीच करू नका, ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो.


मयुरी महाजन


खर तर माणूस म्हणून माणसाच्या ठायी काळजी प्रेम भावूक होणं, आपल्या माणसाविषयीची आपल्या माणूसाला नेहमी चं काळजी असते, म्हणून चं माणूस होण्याला अर्थ प्राप्त होतो, त्याचमुळे ना…

प्रत्येक आपल्या माणसाला आपल्या माणसाची काळजी वाटते, जरी कट्टर भांडखोर असले, तरी एखाद्याला दुःखात बघितल्यावर खूप यातना सहन करताना बघितल्यावर ,काळजी वाटू लागते ,कारण आपण माणस आहोत , एखादा प्राणी ,असो वाढ पशु ,जर माणूस खूप जीवाच्या आकांताने एखाद्या संकटातून जाताना बघितले, तर जीव कासावीस होतो ,व नकळत काळजी वाटू लागते, हे आपण बऱ्याच प्रसंगात अनुभवलेले असेल,

पण बऱ्याचदा आपण करत असलेली काळजी ही निष्पळ ठरते ,कारण की आपण बरेचदा कुणीतरी मदत न मागता केलेली मदत असते, किंवा आपण ज्यांची काळजी करत असतो, त्यांच्या मनात त्याची किंमत नसते, काही माणसं डोक्यात काही भरवल्यावर दुसऱ्यांविषयी मनात ज्यांच्या अविश्वास निर्माण होतो, जी माणसं दुसऱ्यांच्या चष्म्यातून जगाला बघतात, त्यांचा स्वतःचा अनुभव स्वतःचा दृष्टिकोन मात्र कधीही तयार होत नाही, व वेळेनुसार तो विश्वासही बदलत असतो,

ज्या विश्वासाच्या जोरावरती जग चालते, आज जगात विश्वासू माणूस शोधणे म्हणजे, अंधारात सुई शोधण्यासारखे झालेले आहे, कारण जगात सर्व काही लगेच मिळू लागले आहे, पण विश्वास मात्र काही परीक्षा पास व्हायच्या नंतरच मिळवता येतो, कारण डोळे बंद करून आंधळ्या विश्वासाचे आयुष्य आजकाल खूप कमी बघायला मिळते, कारण की आपली असो किंवा परकी वेळेनुसार बदलणारी व्यक्ती ही तुमच्याशी नाही तुमच्या वेळेशी बांधलेली होती हे लक्षात येते,

“जो वक्त बदलदें उसके जैसा यार कहाँ,
और जो वक्त साथ बदलें फिर वो यार कैसा”

ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलत असतो, अशांची काळजी करू नये, कारण जी माणसे विश्वास करण्यात कमजोर असतात ,त्यांना त्यांच्या काळजी करण्यास सुद्धा काहीतरी हेतू असेल ,समोरच्या व्यक्तीचा असा संशय सुद्धा ते खूप सहजरित्या घेऊ शकतात ,अशांची काळजी म्हणजे त्यांना आपण स्वतःहून दिलेली एक संधी आहे, जी काट्यांच्या पायदळी आपल्याला तुडवावी लागेल ,त्यासाठी स्वतःसाठी जपून पाऊल टाकावी, जेणेकरून आपण कोणाची विनाकारण काळजी करून स्वतःसाठी एखादी धोक्याची घंटा वाढवून घेऊ नये,

कारण अशी माणसं बरेचदा आपल्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात, व त्यांच्या फायद्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, कधी कधी आपले एखाद्यावर प्रेम दर्शवण्यासाठी सुद्धा काळजीतून ते व्यक्त केलं जाते, कारण आपण त्यांची काळजी करतो ,त्यांचा आपल्यावर विश्वास हवा , वेळेनुसार बदलणारा नसावा,

सुनील मधुराला म्हणतो ,अग माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे, पण माझ्या कानावरती आलेल्या गोष्टींनी मी अस्वस्थ झालो, मी तुझ्यावरती ठेवलेला विश्वासाची तू अशी परतफेड करशील असं वाटलं नव्हतं, मी तुला सर्वतोपरी स्वातंत्र्य दिले याचा अर्थ तू काहीही करशील का??!!

मधुरा बोलते- सुनील तू काय बोलतोस ठाऊक आहे का तुला, जाऊ दे ….सांग ना सांगणार्‍याची गोष्ट मनापासून एकलीस ना, पण ज्यांच्या विषयी ऐकले ,त्याला एक शब्द विचारावा असे देखील गरजेचं वाटलं नाही तुला, त्या अनोळखी व्यक्ती बद्दल इतका विश्वास आणि जवळच्या व्यक्तीविषयी इतका अविश्वासू निघालास, मला माझी बाजू स्पष्ट करावीशी वाटत नाही ,वेळ ते स्पष्ट करेलच, हो आणि तुझ्यावर ठेवलेला विश्वास हा वेळेनुसार इतका बदलू शकतो ,हे कधी वाटलं नव्हतं रे ….

आणि एका मताने बरंच झालं कारण तुला माहितीये नात्याची खरी वीण ही विश्वास असते, आणि तो विश्वासच जर वेळेनुसार डगमगत असेल ,त्यातच खरेपणा नसेल, तर अशा नात्याचं पुढचं अस्तित्व तरी काय ???

जो प्रेम करत असून विश्वास ठेवू शकत नाही, काय खात्री लग्नानंतर तू त्या विश्वासाला जागशील ,कारण तुला तोडण्याचा तुला हरवण्याचा लोकांचा डावपेच यामुळे फळाला येईल, कारण तू तुझ्या कानांवरही कच्चा निघालास ,तुझा वेळेनुसार बदलणारा विश्वास तुला पाडण्यासाठी एखाद्याचा मार्ग असू शकतो,

जर होत असेल, तर जगाला स्वतःच्या विश्वासाने बघायला शिक…. चांगले वाईट सर्वच अनुभव मिळतील…. परंतु एक गोष्ट शिकशील माणसं ओळखायला…..


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!