Skip to content

समजून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा हट्टी आणि बालिश वागणाऱ्या व्यक्तींना पटकन समजून घेतलं जातं.

समजून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा हट्टी आणि बालिश वागणाऱ्या व्यक्तींना पटकन समजून घेतलं जातं.


हर्षदा पिंपळे


आयुष्यात “समजून घेणं” खूप महत्वाच आहे.अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत इथे प्रत्येकालाच समजून घ्यावं लागतं.समजून नाही घेतलं तर खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. कुणाला राग येतो तर कुणाला वाईट वाटतं.पण प्रत्येकाला समजून घ्यायच म्हणजे जरा अवघड आहे. प्रत्येकाला समजून घेणं काही शक्य नाही. तरीही आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.आपण जसं समजून घेत असतो त्याप्रमाणे समजून घेणाऱ्या व्यक्तीही आपल्या आयुष्यात असतात.

आणि त्याचबरोबर काही व्यक्ती हट्टी आणि बालिशही असतात.पण मग यामध्ये त्या दोन्ही व्यक्तींना समजून घेताना आपला कस लागतो.नक्की कुणाकुणाला समजून घ्यायच या विचारातच आपण गर्क होत जातो.आणि अनेकदा समजून घेणाऱ्या व्यक्तीलाच समजून घेतलं जात नाही.हट्टीपणाने आणि बालीशपणे वागणाऱ्या व्यक्तींना मात्र पटकन समजून घेतलं जातं.त्या व्यक्तीच्या हट्टापुढे आणि बालिशपणापुढे आपल्याला काही दिसत नाही.

“जाऊदे हट्टी आहे, बालिश आहे.. आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार ?” असं म्हणून आपण कित्येकदा अशा व्यक्तींना सहजतेने समजून घेतो.पण यामध्ये जो समजून घेतो त्याच्यावर मात्र अन्यायच होतो.जी व्यक्ती नेहमी समजून घेते त्याच व्यक्तीला नेमकं समजून घेता येत नाही याची अनेकदा कित्येकांना खंतही वाटत असणार यात शंकाच नाही.

पण मग का..? आपण असं का वागतो याचा विचार केला का…? आपलं वागणं थोडफार चुकतय याचा विचार केला का..? नसेल केला तर एकदा हा विचार करून पहा.काही प्रश्नांची उत्तरं नक्की सापडतील. काय करायला हवं आणि काय करायला नको या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील.मित्रांनो, तुम्ही फक्त एकदा विचार करून पहा.

खरंतर हे अगदी साधं सरळ नी सोपं आहे. एक व्यक्ती अशी आहे जी की खूप समजूतदार आहे.आणि दुसरी व्यक्ती खूप हट्टी आणि बालिश वगैरे आहे.आपल्याला दोन्ही व्यक्तींना समजून घ्यायच असतं.दोघांना समजून घेता यावं यासाठीच आपले प्रयत्न असतात. पण काही केल्या ते शक्य होत नाही. आणि शेवटी आपण हट्टी आणि बालिश वागणाऱ्याला समजून घेतो.”ठीक आहे, ती समजूतदार आहे ती घेईन समजून.तिला नाही वाईट वाटणार.” असं आपण अगदी सहजपणे बोलतो.आणि मग एकामागोमाग एक असे प्रसंग नेहमीच घडतात.

पण नेहमी समजून घेतलं जातं ते हट्टीपणाला.यामुळे खरच समजूतदार व्यक्तीला खूप वाईट वाटतं.इतक की ती व्यक्ती ते बोलून दाखवत नाही.समजून घेण्याच्या प्रयत्नात कित्येकदा ती व्यक्ती स्वतःला adjust करत असते.आज नाही पण ऊद्या तरी ते मलाही समजून घेतील याच आशेवर ती व्यक्ती जगत असते.पण प्रामाणिकपणे सांगायच झालं तर हे असं सारखं सारखं वागणं चांगलं नव्हे. एखादा हट्टी असला म्हणून काय झाल..? नेहमीच काय हा हट्टीपणा समजून घ्यायचा.

अशाने हट्टी माणसाचा हट्टीपणा वाढतच जाणार.आणि यामध्ये भरडला जाणार ती समजून घेणारी व्यक्ती. तुम्हीच सांगा,हे असं किती काळ वागायचं..? भावना काय हट्टी आणि बालिश वागणाऱ्यालाच आहेत का…? समजून घेणाऱ्या व्यक्तीला थोड्याफारही भावना नाहीत का…?ज्याप्रमाणे आपण एखाद्या हट्टी माणसाला समजून घेऊ शकतो त्याचप्रमाणे एखाद्या समजून घेणाऱ्या माणसाला का समजून घेऊ शकत नाही…?

विचार करा…आणि नेहमीच हट्टी आणि बालिश वागणाऱ्याला समजून घेण्यापेक्षा समजून घेणाऱ्या व्यक्तीलाही कधीतरी समजून घ्यायला शिका.कारण आयुष्यात समजून घेणारे बोटावर मोजण्या इतकेच असतात.आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येकासाठी तितका वेळही नाही.त्यामुळेच जी काही समजून घेणारी माणसं आयुष्यात असतील त्यांनाही कधीतरी समजून घेत चला.त्यांच्या मनाची व्यथाही जाणून घ्यायचा प्रयत्न करा.अशा माणसांना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करा.

कायमच हट्टी माणसांना समजून घेता घेता एक दिवस ही समजून घेणारी माणसं निसटून जाणार नाहीत याची नक्की काळजी घ्या. काय मग पटतय नं…? विचार करा कुणाकुणाला समजून घेतलय आणि कुणाकुणाला नाही…?


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “समजून घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा हट्टी आणि बालिश वागणाऱ्या व्यक्तींना पटकन समजून घेतलं जातं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!