Skip to content

सकारात्मक दृष्टिकोन – अंधारातून प्रकाशाकडे.

सकारात्मक दृष्टिकोन – अंधारातून प्रकाशाकडे


गिरीशकुमार तुकाराम कांबळे


आयुष्यातील प्रत्येक दिवस आणि त्या दिवसाचे तास त्या तासाचे मिनीट आणि त्या मिनिटाची सेकंद जुने जातात. येणारा प्रत्येक सेकंद नवा म्हणता त्याची नोंद आठवण अशीच होते .तो क्षण चांगला असो वा वाईट त्याची नोंद आठवणीत नक्कीच होते .येणारा प्रत्येक क्षण चांगल्या गोष्टी आठवण घेऊन येतो .त्याची नोंद चांगली आठवण अशीच होत .

वाईट क्षण घेऊन येणारा क्षण आपल्याला वाईट भासतो .त्याची आठवणही वाईट अशीच होते .आयुष्यात येणारा प्रत्येक सेकंद आठवणीच्या रूपात जमा होतो .अनेक क्षण येतात आणि जातात पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या जगलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट क्षणांची आठवण त्या त्या क्षणाला होत असते .येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे असे मानून जगले तर आयुष्यातील बरेचसे क्षण चांगले जातील.

चांगला असेल तर आनंदात भर पडेल . पण ,वाईट असेल तर जगण्याची नवी उमेद निर्माण होईल .अनेक क्षण आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येतात. तर काही दुःखाचे क्षण अश्रू च्या रूपात बाहेर पडतात .आयुष्यातील अनेक चांगल्या आठवणी तेव्हाच आठवतात जेव्हा तुम्ही चांगले स्वतःच्या बाबतीत विचार करता विचार करता आणि वाईट आठवणी किंवा वाईट क्षण तेव्हाच आठवतात जेव्हा आपण स्वतः बद्दल वाईट विचार करतो येणारे क्षण चांगले-वाईट तेव्हाच वाटतात जेव्हा आपल्या आयुष्यात चांगली घटना घडली तर त्या क्षणाचे कौतुक होते पण वाईट क्षण हा अपयशसारखा निराधार असतो. त्याला कुणाचाही आधार नसतो. आयुष्यातील वाईट घटना घडली त्यामुळे आपल्याला तो वाईट भासतो.चांगला क्षण हा आपल्याला यशा सारखा सर्वांचे आधारसारखा वाटत असतो .

येणारा प्रत्येक क्षण आपल्याला चांगलाच जाणार .हा दृष्टीकोन ठेवला तर निम्म्याहून प्रसंग घटना आपल्याला चांगले दिसतील .साधे उदाहरण घ्यायचे झाले तर पावसाळ्यात कारने किंवा बसने प्रवास करत असताना पावसाचे थेंब आपल्या काचेवर पडत असतात आणि ते वेळीच साफ केले नाही तर अपघात होण्याची दाट शक्यता असते. आयुष्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये दृष्टिकोन मध्ये केलेला बदल भावी आयुष्यासाठी उपयुक्त ठरतो.

आपल्याला येणाऱ्या प्रत्येक सेकंदा बद्दल कोणतीही कल्पना नसते .पण ,येणाऱ्या सेकंदकडेे सकारात्मक दृष्टीकोनाने आपल्या आयुष्याकडे बघितले तर येणारा प्रत्येक सेकंद हा आपल्याला चांगलाच भासतो .उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या घराची खिडकी साफ केले नाही तर आपल्यासमोर वास्तव्य करणाऱ्या दाम्पत्य किंवा शेजारी आपलं घर नीट ठेवत नाहीत .असं आपल्याला वाटतं पण दोष त्यांच्यात नसून आपल्या विचारांमध्ये आहे . आपल्या घरच्या खिडकीवरील धूळ वेळीच साफ केली तर समोरच्या शेजारी नीट राहतात .असा आपला समज होतो म्हणजेच दृष्टिकोन चांगला ठेवला तर समोरच्या दृश्य देखील आपल्याला चांगलं वाटतं .

आनंद चित्रपट मधील एक संवाद आहे

” बाबुमोशाय जिंदगी बडी होनी चाहिए… लंबी नही ” .

आपण श्वास घेत असताना क्षण क्षण नव्या चा जुना होऊन जातो अनेक चांगले प्रसंग आपल्याला धरून ठेवावे वाटतात. किंवा हे प्रसंग असेच राहावे असे वाटते .समुद्रातील रेती हातात धरली आणि ती खाली सोडली तर ती थांबत नाही. त्याचप्रमाणे चांगले वाईट क्षण येतात आणि जातात काही क्षण आनंद घेऊन येतात तर काही क्षण दुःख घेऊन येतात.

येणाऱ्या प्रत्येक क्षणावर अधिराज्य गाजवण्यास मी सज्ज आहे .असे आपल्या मनाला ठणकावून सांगितले तर येणारा प्रत्येक क्षण आपल्याला चांगला भासतो. एखाद्या क्षणाची आठवण आपल्याला तेव्हाच होते जेव्हा त्या प्रसंगा सारखा प्रसंग आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा येतो. समजा तुम्ही चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालात तर त्या क्षणाचा प्रसंग पुन्हा एकदा जेव्हा आयुष्यातील प्रसंग चांगला येतो तेव्हा ती आठवण येते .

सकाळी सकाळी आपल्या कानावर आपल्या आवडीचे गाणं ऐकू आले तर दिवसभर आपण ते गाणं गुणगुणत राहतो आणि ती ऊर्जा आपल्या मध्ये पूर्ण दिवस राहते व दिवसाच्या सुरवात खूप चांगले झाली असे आपल्याला वाटत . आपल्याला दिवसभरात 24 तास मिळतात .आणि दिवस संपला की ते पुन्हा येतात .हे वेळेचे चक्र असेच चालू राहते .आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा रिचार्ज करावे लागत नाही .

आज सर्वांकडे मोबाईल आहेत त्या मोबाईलचे सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी तर महिन्याला रिचार्ज करावा लागतो .नाहीतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कॉल करता येत नाही. नाहीतर आपले सिमकार्ड काही कालावधीनंतर बंद होते .रोज रात्री बारा वाजता इंटरनेट इंटरनेटचा बॅलन्स येतो. पण ,रिचार्ज केला नाही तर आपले सिम कार्ड बंद होते .जेव्हा आपण रिचार्ज करतो तेव्हा ते सिमकार्ड चालू होते .

आपल्याला दिवसाचे चोवीस तास जन्माला आल्यापासून मोफतच आहते .रिचार्ज कधीच संपत नाही .तो अखंडित चालू राहतो .त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगले तर सर्वच दिवस आपल्याला चांगले भासतील व वाईट क्षणात प्रसंगात जगण्याची नवी उमेद मिळेल .येणारा प्रत्येक क्षण मनासारखा तेव्हा जगता येईल जेव्हा तुमची इच्छा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन चांगला असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “सकारात्मक दृष्टिकोन – अंधारातून प्रकाशाकडे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!