Skip to content

आपल्या आवाजावरून काहीतरी झालंय हे ओळखणारी माणसं लोप पावत आहेत.

आपल्या आवाजावरून काहीतरी झालंय हे ओळखणारी माणसं लोप पावत आहेत.


मयुरी महाजन


खरं सांगायचं तर आजच्या आधुनिक जगात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक नव्हे ,तर कितीतरी उपकरण तयार झालेली आहे, परंतु ती उपकरणं खरच माणसाच्या मनाचा तळ गाठू शकतात का??? खरच त्यामुळे मनाचा मनाशी थेट संवाद होतो का ???असे प्रश्न पडतात, जी माणसे, माणसे ओळखण्यात तरबेज असतात ,ती आपल्या अनुभवाच्या जोरावरती ते कौशल्य त्यांनी अंगीकृत केलेलं असतं, तसं तर आपण कितीतरी माणसांना ओळखतो, असं आपण म्हणतो ,परंतु खरंच माणसांशी असणारी ओळख वेगळी, आणि ज्यांच्या नुसत्या आवाजाच्या चालीवरून त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या बर्‍यावाईट प्रसंगांची होणारी ओळख वेगळी, हा फरक जरी आपल्याला सिद्ध करता येत नसला, तरी तो आपल्या लक्षात येतो ,

जनरेशन बदलत गेली, तशी माणसं अपडेट होत गेली, आधी माणसं भावनिक दृष्टीने विचाराला प्राधान्य द्यायची, आता मात्र प्रॅक्टिकल विचारांना प्राधान्य दिले जाते, कदाचित यामुळे माणसा-माणसातला एक विशिष्ट टप्पा जो की माणसाला दुसऱ्या माणसाशी बांधून ठेवत होता, त्याला कुठेतरी अंतर निर्माण झाले, परंतु हे सर्व असूनही अजूनही काही अंशी ती जागा शिल्लक आहे ,पण आपल्या आवाजावरून काहीतरी झालंय हे ओळखणारी माणसं लोप पावत आहेत, हेही खरं आहे ,त्याला कारणांची यादी सुद्धा आहे, थोडक्यात बघूया यापाठीमागची कारणे…

माणसा माणसांमधील विश्वास हरवलेला बघायला मिळतो,जिथे अति विश्वास ठेवून सर्वकाही शेअर केलं जातं, नेमकं तिथेच अडकण्याची शक्यता जास्त असते, व्यक्तीच्या मनात निर्माण झालेला अविश्‍वास , कुणाशीही एकरुप होऊ शकत नाही ,कारण प्रत्येक वेळेला मनात शंका निर्माण होतात, आणि गरज बघून बोलणारी माणसं कधीच कोणासोबत निस्वार्थपणे जुळू शकत नाही, आणि सर्वात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आपल्याकडे काही नसताना आपल्याशी असणारी वागणूक आणि आपल्याकडे सर्वकाही असताना दिलेली वागणूक या दोघांमध्ये असलेली तफावत माणसाला आपल्यापेक्षा आपल्या कडे असणाऱ्या गोष्टीला दिली गेलेली किंमत ,खरच माणसाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकते ,हे अनुभवल्यामुळे माणसं जितकी साधनांच्या आहारी गेली तीतकीचं ती माणसांच्या जवळून दुरावत गेली,

कारण आई आपल्या मुलाला जवळ घ्यायची, आणि मुलं रडायचं थांबायचं, आजच्या आधुनिक जगात मुलं रडताना दिसली, तर आई लगेच मोबाईल काढून देते ,याचा अर्थ आपण लहानपणापासूनच मुलांना आपल्यापासून दुरावतोय, माणसांची जागा साधनांनी घ्यायला सुरुवात केली, तर तिथे मायेची ऊब कशी तयार होईल? आणि जर ती मायेची ऊबचं हरवत चालली, तर आवाजावरून काहीतरी झालंय हे कळणार तरी कसं ,

चेहऱ्यावरून आपण लाखो माणसांना ओळखतो, किंवा आपल्यालाही लाखो लोक चेहऱ्यावरून ओळखतात, परंतु काही माणसे इतकी जवळची असतात ,की आपण कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना समजते नुसत्या आवाजाच्या चढ-उतार वरूनही ती व्यक्ती आपल्या मनाला जाणते, आपण सुखात आहोत, की दुःखात, हे अचूक सांगते, अशी व्यक्ती आपल्या प्रत्येक परिस्थितीत आपल्याला साथ देते, कारण कोणी कितीही

खोटं बोलून काही समजावण्याचा प्रयत्न केला, तरी अशी माणसे आपल्या त्या बनावटी पणाला लगेच ओळखतात, आपल्या

आवाजावरून काहीतरी झालंय हे ओळखणारी माणसं लोप पावत आहेत, त्या कारणांची यादी आपण बघितली, त्यात आपल्याला हे काही प्रमाणात समजले असेलच ,परंतु प्रश्न असा येतो की आपण सुद्धा खरच किती जणांच्या आवाजावरून काहीतरी झालेय ,हे अचूकपणे ओळखतो , कारण की अशी अपेक्षा नेहमी दुसर्‍यांकडूनचं का ठेवावी, तशी अपेक्षा कदाचित आपल्याकडूनही असू शकते,

खरं तर माणसं ओळखणे ही एक कला आहे,ती प्रत्येकाला जमेलच असं नाही, कारण एखादा चित्रपट किंवा मालिका त्यात सर्व चित्रिकरण, नाटक करत असतानाही आपल्याला ते जिवंत वाटतात, त्यामुळे वास्तविक ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात वेगळ्या पणाने वावरतात ,आणि त्यांचा खरा जीवनातला रोल पूर्णपणे वेगळा असतो ,त्यामुळे वास्तव खरं काय आणि अभ्यास का यामध्ये फरक करता येत नाही, त्यामुळे फसवणूक होण्याचा संभव असतो ,

जरं व्यक्ती जवळ असेल ,तर त्यांना डोळ्यांची भाषा आणि व्यक्ती लांब असेल, तर त्याचा आवाज दोन गोष्टी जर आपल्याला डोळ्यांची भाषा आणि आवाजातील चढ-उतार कळले ,तर आयुष्यातल्या बर्‍याचं गोष्टी सोप्या होऊन जातीलं…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!