Skip to content

इतरांकडून दूर फेकले जाण्यापेक्षा स्वतः दुर होणे कधीही योग्य!

इतरांकडून दूर फेकले जाण्यापेक्षा स्वतः दुर होणे कधीही योग्य!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


सगळ्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारची नाती ही असतातच. अगदी जन्माला आल्यापासून आपली नाती तयार होतात ती आयुष्याच्या शेवटपर्यंत असतातच. पण या नात्यामध्ये पण सर्व खूपच छान आणि चांगलं अस असत नाही. चढ उतार येत असतात. कधी खूप छान छान माणसं भेटतात तर कधी आपण काही काळासाठी एकटे देखील पडतो. पण हाच आपल्या परीक्षेचा काळ असतो. या काळात आपण स्वतःला कस टिकवतो, कस सांभाळतो हे पाहणं गरजेचं असत.

आता हे जे नात्यामध्ये येणारे चढ उतार आहेत ते कोणत्या प्रकारचे असतात. तर यात वाद होतात, मतभेद होतात, दुरावा येतो आणि एकटेपणा पण येतो आणि ही नाती फक्त घरा पुरती किंवा अगदी जवळच्या लोकांमधली असतात का? नाही. नाती ही सर्व ठिकाणी तयार होत असतात. औपचारिक, अनौपचारिक. दोन्ही प्रकारची नाती असतात. कामाच्या ठिकाणी असणारी नाती ही बऱ्याच अंशी औपचारिक असतात. ज्याला वर्क रिलेशन अस म्हटल जात.

अशी नाती सांभाळत असताना आपल्याला बरेचदा असे अनुभव येतात की आपल्याला दुर्लक्षिल जातंय. अगदी शाळा, कॉलेज मध्ये पण अस होत. नव नवीन मित्र मैत्रिणी बनत असतात. नवीन ओळखी होत असतात. अश्यामध्ये अनेकदा आपल्याला मिसळून न घेणं, एकट पाडणं अश्या गोष्टी होतात. आपण मात्र खूप प्रयत्न करतो त्यांच्यात परत जाण्याचे. पण ते दर वेळी पाहिल्यासारखं नीट होत अस नाही. खूप लोक याच वाईट वाटून घेतात. मी अस काय केलं म्हणून माझ्यासोबत अस होत अस त्यांना वाटत. हे होत कश्यामुळे? तर खूप जास्त attach झाल्यामुळे. त्यामुळे या गोष्टीचा त्रास होतो आणि आपण आपला स्वाभिमान पण बरेचदा विसरतो. नात्यामध्ये जर अडथळे येत असतील तर ते सुधारायला प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत.

पण जिथे आपला मान नाही राहत तिथे एकसारखे प्रयत्न करण्यात तरी काय अर्थ आहे? अशी वाटच का पहायची की जिथे समोरची व्यक्ती किंवा इतर लोक आपल्याला दूर फेकायचा प्रयत्न करतील. त्यांनी अस करण्यापेक्षा आपण स्वतः हुन दूर गेलेलं कधीही चांगलं.
जस आपण attach होतो तस आपल्याला detach पण होता आलं पाहिजे.

वयानुसार आपल्याला इतकी तरी maturity आलेली असते जिथे आपल्याला समजत की एखाद्या समूहात आपला आदर किंवा मान ठेवला जात आहे की नाही. जर अस होत नसेल, सतत आपला अपमान होत असेल, आपल्याला जाणवत असेल की आपलं इथे काही स्थान नाहीये अश्या ठिकाणी त्यांनी आपल्याला काहीतरी बोलण्यापेक्षा आपण स्वतःच बाजुला झालेले केव्हाही बर. अस नाही केलं तर लोक आपल्याला गृहीत धरून त्यांना हवं तसं वागवू शकतात.

म्हणून इतरांनी आपल्याला दूर फेकण्यापेक्षा आपण बाजुला व्हावं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!