Skip to content

माझी पत्नी स्वतःहून कधीच तयार होत नाही, म्हणून माझी खूप चिडचिड होते. काय करू?

माझी पत्नी स्वतःहून कधीच तयार होत नाही, म्हणून माझी खूप चिडचिड होते. काय करू?


टीम आपलं मानसशास्त्र


लग्न याचा हेतूच हा आहे की शरीर आणि मनाचे मिलन . आणि त्यातून पुढच्या पिढीची निर्मिती , वंशवृद्धी.

आजकाल बरेच पुरुष ही तक्रार करतात की , माझी पत्नी स्वतःहून कधीच तयार होत नाही, म्हणून माझी खूप चिडचिड होते. काय करू? चिडचिड न करता शांत रहा. आणि परिस्थिती काय आहे .. कारणे काय आहेत याचा विचार करा.

१. पत्नी स्वतः हुंन का तयार होत नाही याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करा : –

A. भारतीय पुरुष प्रधान संस्कृती मध्ये आणि घरातून मिळालेले संस्कार हे एक मुख्य कारण आहे की स्त्री ही खूप मर्यादाशिल असते. आणि त्याचमुळे ती लज्जा , पे संकोच या कारणांमुळे आपणहून तयार होत नाही.

अशावेळी पती ने आधी एकमेकांच्या मध्ये मोकळेपणा निर्माण होईल याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. एकदम शरीर संबंध न ठेवता सुरुवातीला एकमेकांचे स्वभाव समजून घेणे जरुरीचे असते. आवडी निवडी समजून घेणे , हलके फुलके विनोद यातून वातावरण निर्मिती , कधी मोकळेपणाने ऑफिस , काम , घरच्या व्यक्ती यांची माहिती दिली पाहिजे. आणि त्यातून जवळीक निर्माण करण्याचा , अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

B. घरात जास्त कामे , ऑफिस मधील जास्त कामे यांचा परिणाम की वेळ नसतो , दमायला होते. अशावेळी शक्य असेल तर पती ने मदत करावी , घरकामास बाई लावावी , जेणेकरून पत्नीला थोडा रिकामा वेळ मिळेल. आणि ती फ्रेश राहील.

C. पत्नीची मानसिकता बदला. बाहेरून येताना छानसा सुगंध दरवळणारा मोगरा , चाफा , जाई जुई यांचे गजरे घेवून या. जेणेकरून वातावरण प्रसन्न राहील. कधी बायकोला फिरायला घेवून जा, बाहेर जेवण , एखादे छान नाटक , सिनेमा दाखवा ..थोडे मनोरंजनातून , बाहेरच्या मोकळ्या वातावरणातून रिलॅक्स होता येईल.
कधी सिनेमा मधल्या काही लव्ह story , प्रसंगातून ही पत्नीला पतीबद्दल आकर्षण आणि ओढ निर्माण होईल.

D. पूर्वानुभव : – पत्नीशी मोकळेपणाने बोला. पूर्वानुभव विचारा. त्यातून काही चुकले असेल, उणिवा राहिल्या असतील, त्रास असेल तरी बोलून ,विचारून त्यावर उपाय शोधा.

F. शारीरिक त्रास काही आहे का विचारून घ्या. किंवा शारीरिक जवळीक करताना काही शारीरिक त्रास होतात का हे मोकळेपणाने विचारून त्यावर वैद्यकीय सल्ला घ्या , उपाययोजना करा.

२. काही वेळेस पुरुष नैसर्गिकदृष्टया खूप घाई करत असतो आणि स्त्री ला तयार होण्यास वेळ लागतो. बरेचवेळा पुरुषांना हे समजत नाही. आणि स्त्रियांना आपणहून येण्यास वेळच देत नाहीत.

३. कधी तरी असे मोकळेपणाने बोलून , कुठे बाहेर जावून दोघांना एकांत मिळेल असे जा. दिवसभरात एकत्र फिरा , हलकेच स्पर्श होवू देत. रात्री करिता काही खास प्लॅन arrange करा.. दोघे मिळून एखादी theme ठरवून तसे प्रत्यक्षात आणायचे हे निर्धार करून तसे करा. तेव्हा दिवसभराच्या हलक्या स्पर्श , एकत्र असण्यातून पत्नी खरेच आपणहून जवळ येईल.

नेहमी असे बाहेर जाणे शक्य नाही. पण सुरुवातीला केलेले हे प्रयत्न कायमच जवळ येण्यास मदत करतील.

४. मुख्य पत्नी मध्ये हे विचार , भावना जागृत करा की पुरुष प्रधान संस्कृती वगैरे बाजूला पण स्त्री आणि पुरुष या नात्यात दोघेही समान असतात. एकरूप होण्यासाठी भावना व्यक्त करणे गरजेचे.

मोकळेपणाने तिला ही संबंध पाहिजे असतात पण कसे बोलू ..काय वाटेल हे विचार मागे खेचतात. म्हणून पती ने तिला तिच्या मतानुसार , भावना काय आहेत तसे आपणहून व्यक्त होण्यास साथ द्यावी , encourage करावे. तर ती आपणहून पुढाकार घेण्यास तयार ही होईल.

कसे आहे की कोणतेही नाते फुलवावे लागते. त्याकरिता बोली भाषा , सुसंवाद , विनोद , चेष्टा मस्करी , मनोरंजन ,हळुवार स्पर्श ,रोमान्स यातून ते नातं बहरत जाते.

कधी बरोबरीच्या मित्रांच्या बायका , तिच्या मैत्रिणी यांना एकत्र येवून मोकळेपणे चर्चा करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे असते.

नात्यातली ओढ , आपुलकी , घेण्यात येणारी काळजी , स्थैर्य , सुरक्षितता , समजूतदारपणा , कर्तुत्व ही स्त्रीला पती विषयी अजून जास्त आकर्षण निर्माण करत असते. आणि ती ओढ निर्माण होवून बरेचवेळा ती आपणहून पतीच्या जवळ येते.

आणि सगळे असूनही जर जवळ येत नसेल तर पती ने तेवढे स्पष्ट विचारावे की आपणहून जवळ येण्याबद्दल काय प्रोब्लेम आहे. घरातले मोठे काय म्हणतील हे विषय असतील तर घरच्यांना ही थोडे सांगावे की आमचा असा थोडा वेळ पाहिजे. असे पुरुषांनी सांगणे गरजेचे असते. स्त्री या गोष्टी वडील मंडळी पुढे बोलू शकत नाही.

एक ठराविक वेळ मिळाला, अंतर कमी होवून , त्याचे आकर्षण आणि आवड वाढली तर स्त्री ही नक्कीच आपणहून जवळ येते .

चिडचिड करून अजून दोघांना ही त्रास होईल आणि आहेत ते चांगले संबंध ही बिघडतील, बाकी काही गोष्टी असोत, भांडणे , वाद , मतभेद सगळे विसरून जेव्हा शारीरिक जवळीक साधता तेव्हा केवळ त्यात involve होण्याची सवय लावा. अधून मधून स्त्री मोकळी व्हावी म्हणून त्या विषयी बोलत रहा. तिला बोलायला द्या. त्यातून मोकळेपणा वाढेल आणि स्त्री ला आवड निर्माण होईल. ती आपणहून जवळ येईल.

चिडचिड न करता संयम ठेवा. आणि सुरुवातीपासूनच मोकळेपणा ठेवा . कधी आपल्या ताई , तिच्या ताई सोबत हे प्रोब्लेम शेअर करा आणि तिला समजविण्यासाठी सांगा.कारण बरेचदा या गोष्टी स्त्रीच्या लक्षातच येत नाही. की ती ही पुढाकार घेवू शकते. आणि बऱ्याच पुरुषांना ते आवडते ही. पण त्यात नाते, मन , शरीर हे पूर्णपणे एकरूप झाले असेल तर मग नाते अजून जास्त चांगल फुलत जाईल. आणि स्त्री आपणहून जवळ येत जाईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “माझी पत्नी स्वतःहून कधीच तयार होत नाही, म्हणून माझी खूप चिडचिड होते. काय करू?”

  1. खूप छान लेख सत्याला महत्व दिले आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!
%d bloggers like this: