Skip to content

सारखं पॉझिटिव्ह राहणं पण अंगाशी येऊ शकत!!

सारखं पॉझिटिव्ह राहणं पण अंगाशी येऊ शकत!!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


नरेन आपल्या कुटुंबासोबत गावात राहत होता. काही दिवसांपूर्वीच तो गावात आला होता. नोकरीच्या निमित्ताने तो शहरात गेला होता तो तिथेच राहायला लागला. पण आता आई बाबांची पण तब्येत जरा ठीक नव्हती आणि नरेनला भेटून पण खूप दिवस झाले होते. त्यांना शहरात जाणे तर शक्य नव्हते म्हणून नरेनच काही दिवसांसाठी गावी आला. गावाला वेढून नदी होती. त्याच पात्र पण मोठं होत. नरेन आला त्यावेळी पावसाला सुरुवात झाली होती आणि यावेळी जोर जास्त असल्याने पुर येण्याची शक्यता पण दिसत होती.

त्यामुळे गावातील सर्व मंडळी त्या दृष्टीने काही ना काही व्यवस्था करून ठेवत होती. म्हणजेच धान्य वरती टाकणं असेल किंवा किमती सामान दुसरीकडे ठेवणं असेल अश्या गोष्टी ते करत होते. तसच अचानक पूर आलाच किंवा वाढला तर दुसऱ्या जागी राहायला लागणार होते. म्हणून त्याचीही तयारी चालली होती.

गावातले लोक हे सर्व करत असताना नरेन मात्र निश्चिंत राहिला होता. गावातली लोक जेव्हा त्याला सांगायला आली की पूर येऊ शकतो तुम्हीपण तयारी करून ठेवा तेव्हा तो त्यांना म्हणू लागला, “तुम्ही मुळात असा विचारच का करता की पूर येईल? आपण नकारात्मक विचार केला की तसच होत. तुम्ही अस म्हणा ना, यावेळी पूर नाही येणार. पाणी ओसरेल.” यावर गावकऱ्यांनी त्याला समजावलं की समोर जे दिसत आहे ते आम्ही सांगतोय. यात विचार कसले?

पण त्याने काही लोकांचं ऐकल नाही. त्याच म्हणणं एकच आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे सर्व ठीक होत. अख्खा गाव सर्व तयारी करत बसला, पण हा मात्र तसाच राहिला. शेवटी व्हायचं तेच झालं. त्याचा हा पॉझिटिव्ह एटीट्यूड त्याच्या आणि त्याच्या घरातल्या लोकांच्या अंगाशी आला. कारण घर बैठ होत. त्यात नदी जवळ त्यामुळे पाणी येणं साहजिकच होत. ते म्हणतात ना मांजरीचे कितीही डोळे झाकून दूध प्यायला तरी दिसायचं राहत नाही. तसच नरेन ने जरी पॉझिटिव्ह एटीट्यूड ठेवला तरी व्हायचं ते होणारच होत आणि तेच झालं.

अस का झालं? कारण आपण तर नेहमी म्हणतो की कोणत्याही परिस्थितीत चांगला, सकारात्मक विचार केला पाहिजे. तर समस्या सुटतात. आताच्या काळात तर सकारात्मक विचार, वातावरण यांना पूर्वी पेक्षा जास्त महत्त्व आलं आहेत. त्याच्यावर अनेक पुस्तक, अनेक व्याख्यान दिली जातात. सगळीकडे तेच सांगितलं जात की
पॉझिटिव्ह राहा. मग नरेन वर संकट कस ओढवल? तो पण पॉझिटिव्ह विचारच करत होता ना!

याच कारण जरी तो पॉझिटिव्ह विचार करत असला तरी तो वास्तववादी विचार नव्हता. तो असा विचार करत होता जो त्याला अकार्यक्षम करत होता. म्हणूनच त्याने काही तयारी केली नाही. त्याच्या या पॉझिटिव्ह विचारामध्ये समोरच्या सत्य परिस्थितीची डोळेझाक होत होती आणि म्हणून त्याने स्वतः वर संकट ओढवून घेतल.

परीक्षेच्या वेळी अनेक मुलांचा असाच दृष्टिकोन असतो. परीक्षा काय नेहमीची आहे. मी सहज पास होईन. आता हा विचार वरकरणी सकारात्मक आहे. पण अशीच मुल नंतर तोंडावर पडतात. कारण हे विचार त्यांना अभ्यास करायला भाग पाडत नाहीत. तर त्याकडे दुर्लक्ष करायला प्रोत्साहित करतात.

म्हणूनच जर तुम्हाला अस वाटत असेल की सतत पॉझिटिव्ह विचार केल्याने सर्व चांगलं होत तर अस नाहीये. हे आपल्या अंगाशी येऊ शकतं. कारण सर्व पॉझिटिव्ह विचार आणि भावना आरोग्यदायी असतात अस नाही. तसच सर्व नकारात्मक भावना, विचार अनारोग्यदायी असतील अस नाही. औषध घेतल नाही तर मी आजारी पडेन जरी निगेटिव्ह वाटत असेल तरी त्यामुळेच आपण औषध घेतो. ज्याचा परिणाम आपल्याला बर वाटत. तेच जर मला काय होणारे? मी होईन बरा व्हायचं जेव्हा अस म्हणल तर कदाचित तात्पुरतं बर वाटेल. पण त्याच परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण आजारीच पडणार.

म्हणून विचार करताना पूर्णपणे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या दृष्टिकोनातून न करता पुरेसा वास्तववादी, समोरची परिस्थिती पाहून आणि ज्याचा आपल्याला फक्त आताच नाही तर भविष्यात देखील फायदा होईल असा करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सारखं पॉझिटिव्ह राहणं पण अंगाशी येऊ शकत!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!
%d bloggers like this: