Skip to content

सध्या अनेकांना एकांत जवळचा वाटू लागलाय, असं का घडतंय?

सध्या अनेकांना एकांत जवळचा वाटू लागलाय, असं का घडतंय?


सोनाली जे.


आजकाल रोजचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. रोज रोज तीच धावपळ यातून थोडे स्वतः करिता वेळ काढावा .शांत , एकांत अशी मानसिकता वाढू लागली आहे.

आता जे corona सारख्या महामारी ने प्रत्येकाला insecure असल्याचे जाणविले आहे. त्यामुळे उगीचच खर्च करण्यापेक्षा थोडे फार पैसे हाताशी असलेले बरे असे विचार करणारे ही आहेतं . ज्यांच्याकडे पुरेशी बचत आहे ते हा विचार करू लागले आहेत की बाहेरच पडायचे नाही तर उगीच कपडे , वस्तू यांची ढीगभर गरज काय ? आणि रोजच्या गरजेच्या वस्तू काय याची पूर्ण जाणीव झाली आहे .

या महामारी सारख्या कठीण काळात लॉक डाऊन मुळे कुटुंब एकत्र घरी एकमेकांच्या सोबत जास्त वेळ राहू लागली आहेत. यातून बाहेरच्या कोनाच्यात जाणे शक्य नसल्याने नैसर्गिकरीत्या आनंद घरात आपल्या लोकांसोबत अनेक गोष्टी करत आहेत.

या शिवाय जे work from home करत होते त्यांना कामातून वेळच मिळत नव्हता ..कामाचा ताण , बरेचवेळा घरी काम करताना येणारे प्रॉब्लेम्स मग छोटे असोत की मोठे जसे अगदी लाईट जाणे , वायफाय नसणे , इंटरनेट प्रोब्लेम , यापासून ऑफिस सारखा proper setup नसणे. काही प्रोब्लेम आले तरी आपण च solve करायचे. यातून एकटे राहण्याची जास्त सवय झाली. आणि काम संपले की थोडे ताणातून रिलॅक्स म्हणून एकांत च आवडू लागला ..ताण कमी करण्याचा मार्ग म्हणले तरी चालेल.

याशिवाय आजकाल निस्वार्थी , निरागस लोक आसपास फार कमी असतात. अगदी चांगले मित्र मैत्रिणी सुधा वरून गोड बोलतात पण आतून एकमेकांशी स्पर्धा करत असतात.

शेजारी पाजारी ही एकमेकांच्या पोझिशन , राहणीमान यावरून तुलना करत असतात. जर गरिबी असेल , साधेपणाने राहत असतील तर हिणवत असतात. आणि श्रीमंती असेल तर द्वेष , जेलासी करत असतात.

नोकरी निमित्त आपल्या लोकांपासून दूर जावे लागणे .तिथले स्ट्रगल , येणारे यश अपयश, जबाबदाऱ्या या सर्वस्वी एकट्याला पार पाडाव्या लागत असतात. बरेचदा आपलेच लोक आपल्या ओळखी , माहिती , ज्ञान , मैत्री यांचा गैरफायदा घेत असतात. अशा वेळी लोकांच्या तोंड देखल्या सहानुभूती पेक्षा , मैत्री पेक्षा आपण आणि आपले काम आणि घरी एकांत बरे अशी ही मानसिकता वाढत चालली आहे.

गृहिणी दिवसभर घरकाम , मुलांच्या जबाबदाऱ्या , येणारे जाणारे , यात पूर्ण अडकून पडल्या आहेत. पण या सगळ्या व्यापातून थोडा विसावा म्हणून त्यांना ही एकांत च बरा वाटतो. काही वेळेस मैत्रिणी भेटतात ही. पण माझे असे , तुझे असे , मी अशी , साड्या , ड्रेस , कपडे किंवा तक्रारी याच चर्चा होत असतात त्यातून काही नवीन गोष्टी शिकता येत नाहीत .माहिती होत माहीत. नुसते गॉसिपिंग ही नको वाटते त्यापेक्षा. शांत निवांत , एकांतात बसुन आपले आवडते छंद जपणाऱ्या स्त्रिया ही आहेत.

तर असे पुरुष ही आहेत जे सगळे त्रास , कामाची धावपळ संपवून आपला वेळ आपल्या आवडत्या कामा करिता देतात. स्वतः ला एकांतात शोधण्याचा प्रयत्न करतात. कधी शांत music ऐकतात , गाणी म्हणतात , चित्रकला , छंद जोपासत असतात.

याशिवाय आजकाल सोशल मीडिया , इंटरनेट , वेब साईट यावरून अनेक गोष्टी घरबसल्या शिकता ही येतात आणि पूर्ण concentration ने करता येतात. वेगळे उठून जाणे , travelling खर्च , जाण्या येण्याची energy ही खर्च होत नाही. आणि कधी आरामात , आपल्या सोयी सवडीने ही अनेक गोष्टी करता येतात.

अनेक e commerce site वरती अत्यावश्यक वस्तू , सेवा ही घरबसल्या मिळतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी बाहेर कुठे जावे आणि उगीच ओझी उचलून आणावी ही मानसिकता ही राहिली नाही. त्यामुळे घरात शांत एकांतात राहून easy गोष्टी करणारे लोक आणि मानसिकता वाढत आहे.

मुलांना ही सोशल मीडिया ने वेड लावले आहे. टीव्ही , वेगवेगळी ॲप्स , मोबाईल गेम यातून addiction निर्माण होवून बाहेर कोणाच्यात मिक्स होण्याऐवजी , physical त्रास सहन न करता , कष्ट न करता excitement अनुभव घेणारी एकांत आणि आपले आपले विश्व यात रमणारी आहेत.

कधी काम मग ऑफिस , घरकाम यांचा वाढता ताण असेल तरी त्यातून बदल म्हणून आपल्या असलेल्या स्वतंत्र गाड्या किंवा वाहन काढावी आणि आपल्या पुरतेच आपण भटकंती करून यावे असे विचार करणारे ही आहेत. तर काही इच्छा असून ही पैशाचा अभाव यातून आपल्या पुरते मर्यादित गोष्टी करणारे आहेत.

काही वेळेस आपल्या लोकांच्या कडून येणारे विक्षिप्त , कटू अनुभव यातून आपण भले आपले काम भले या म्हणीनुसर एकांतात राहण्याचा प्रेफरन्स देणारे लोक जास्त आहेत.

आजकालची मैत्री ही जेव्हा जे available असतिल तेव्हा त्यांच्या सोबत असणारे मित्र मैत्रिणी , किंवा खूप बिझी schedule मुळे जेव्हा वेळ , सवड मिळेल तेव्हा किंवा गरज असेल तेव्हा कॉन्टॅक्ट करणारे मित्र मैत्रिणी , नातेवाईक हे अनुभव लक्षात घेता , इन्स्टंट प्रेमात पडणारे प्रियकर – प्रेयसी , प्रत्येकाच्या अपेक्षापूर्ती न होणे , व्यवसायात आपल्याच पार्टनर कडून दगा फटका , कधी येणारे अपयश असेल तेव्हा त्रास एकट्याने सहन करणे आणि आपले मार्ग कायम आपणच शोधत चांगल्या वाईट अनुभवातून जीवन प्रवास पुढे करत राहणे यात नुसते सोबत आहे म्हणून काहीच मदत न करणाऱ्या लोकांपेक्षा किंवा असेही आहे की मला कोणाची गरज नाही माझे मी करण्यास समर्थ आहे गोष्टी अशी ही मानसिकता असते त्यातून सध्या अनेकांना एकांत जवळचा वाटू लागलाय.

एकत्र असताना एकमेकांच्या कडून अपेक्षा ठेवणे .त्यात अपेक्षाभंग , त्याचा स्वीकार करता न येणे यातून काहीच नको. कोणीच नको .मी आणि माझा एकांत असाही विचार करणारे आहेत.

तर एकांतात स्वतः चा आत्मशोध घेणारे, प्रगती करणारे , नवीन गोष्टी वर प्रयोग करणारे ही खूप आहेत. ध्यान धारणा , एकाग्रता , योगा , वाचन , अध्यात्म यातून स्वतः वर नियंत्रण ठेवणारे ही आहेत. त्यामुळे ही एकांत निवडणाऱ्या व्यक्ती आहेत.

माणूस समाजप्रिय आहे. त्याला survive होण्याकरिता आपल्या लोकांची , शेजारी , समाज , ऑफिस मधले सहकारी , शाळा कॉलेज मधले मित्र मैत्रिणी यांची गरज असतेच. पण बरेचवेळा असे काही अनुभव येत जातात. किंवा सोशल मीडिया वरून अगदी मनोरंजन ही स्वतः च स्वतः पुरते करून घेणारे , तर नवीन ॲप्स ची वाढता वापर जसे व्हॉटसॲप , fb याचा वापर आणि त्याचा अतिरेक झाला तरी त्यातून कंटाळवाणे जीवन वाटू लागते. तेच मेसेज इकडून तिकडे forward करणे ..परत ते आपल्याला कुठून तरी येणे. हे सुधा आता लोकांस कंटाळवाणे झाले आहे आणि त्यातून वाढणाऱ्या रिस्क हे काही ही नको, आणि waste of time असे वाटून एकांत बरा अशी मानसिकता वाढत चालली आहे. तर याउलट काही आपले कोणाशी काही personal संबंध येत नाहीत. सोशल मीडियावरून मिळणारी माहिती , काही गोष्टी यांचा एकांतात आनंद घेणारी ही आहेत. किंवा आनंद ही नाही दुःख ही नाही असे म्हणून तटस्थ वृत्तीची ही आहेत.

आयुष्य सुंदर आहे. आपल्याला एकटे आयुष्य जगणे कठीण आहे. त्यामुळे काही गोष्टींचे स्वीकार , मर्यादा सांभाळत , अपेक्षा न ठेवता ज्या गोष्टी जीवाचा आटापिटा न करता सहज करणे शक्य आहे. त्या नक्की कराव्यात. कधीकधी एकांतात ही राहावे. पण त्यातून सगळ्या गोष्टी मनातच ठेवून देणे चुकीचे , आपल्यात काही उणीवा आहेत असे समज असतात. त्यातून न्यूनगंड हो निर्माण होत असतो .आणि एकांत बरा असे म्हणून आपण एकलकोंडी होत असतो. काही वेळेस इतरांशी मोकळेपणे बोललात तर प्रोब्लेम वर सहज solution ही सापडते. कारण आपण बरेचदा एकांगी विचार करत असतो. पण आपल्या सोबत असणारे लोक त्यांचे ज्ञान , अनुभव , शहाणपण ,समस्या सोडविण्याचे प्रयत्न यातून मार्गदर्शन ही मिळत असते. परिस्थिती पुढे हतबल होण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्न करत पुढे जाणे गरजेचे .. प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवत असते. अपयश अनुभव देत असते जो अनुभव यश कसे मिळवावे याकरिता उपयोगी पडतो.

वयस्क लोक, रुग्ण खूप मोठे किंवा सततचे आवाज सहन होत नाहीत म्हणून ही एकांत स्वीकारतात.

एकांत हा सकारात्मक कारणासाठी असेल तर चांगली गोष्ट आहे. पण नकारात्मक असेल तर नक्की ती मानसिकता वेळी च बदलणे गरजेचे आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!