Skip to content

गेले उडत …..जास्त पण साध बनून जगू नका!…..

गेले उडत …..जास्त पण साध बनून जगू नका!…..


दिपाली मुळे

(लाईफ कोच)


रेवती मध्यमवर्गीय कुटुंबातील सगळ्यात मोठी मुलगी… सरळ वागावे … कोणाशी वाईट वागू नये …नाकासमोर चालावे…. प्रामाणिक राहावे …असे तिच्यावर झालेले संस्कार .साधे राहावे हीच कायम मिळालेली शिकवण .लग्न करून सासरी आली .सासरची सर्व मंडळी तिच्या साधेपणाचा फायदा घेत होते. सुरुवातीला रेवतीला कळालेच नाही की हे सगळेजण फक्त गोड गोड बोलून तिच्या कडून सगळी काम करून घेतात. पण तिचे एखादे काम करायला कोणी तयार होत नसे… अगदी तिचा नवरा देखील …बरं साधेपणाने वागायची सवय असल्यामुळे तिला कसे वागावे हे समजत नव्हते आणि वाईट वागणे मनाला पटत नव्हते जशास तसे वागणे जमत नव्हते. शिकवणारे कोणी नव्हते ….कायम घालमेल आणि घुसमट सहन करत ती कशीबशी जगत होती ………..

राहुल एका कंपनीत सेल्स डिपार्टमेंटला कामाला होता. राहूल खूप हुशार होता पण खूपच साधा आणि भोळा होता .इतर लोक त्याचा वापर करून घेतात हेही त्याला कळत नव्हते .त्याचे सहकारी त्याच्याकडून कल्पना काढून घेत आणि स्वतःच्या नावाने सांगून यशाचे श्रेय घेतअसत. नंतर हळूहळू ही गोष्ट लक्षात आली. पण आपल्या वागण्यात काय बदल केला म्हणजे हे सगळे थांबेल ते त्याला कळत नव्हते ………

वाचकहो अशा कितीतरी रेवती आणि कितीतरी राहुल आपल्या आजूबाजूला असतील. ते स्वभावाने, वागण्याने खूपच साधे आहेत .दुनियादारी ,छक्के-पंजे, कटकारस्थाने ,राजकारण ,द्वेष, मत्सर या पासून कोसो दूर आहेत. पण आजच्या गतिमान जगात इतकही साध राहून चालणार नाही .हे जग स्वार्थी लोकांनी भरलेले आहे. मी असे म्हणणार नाही की आपण वाईट वागावे पण आपल्याशी कोणी वाईट वागतय त्याचा आपण त्रास करून न घेता समोरचा आपला गैरफायदा कसा घेणार नाही याकडे मात्र जरूर लक्ष दिले पाहिजे .जगातील बहुतांश लोक साध्या लोकांचा गैरफायदा घेताना जराही मागे पुढे पाहत नाही. ज्याप्रमाणे अन्याय करणे हा गुन्हा आहे त्याचप्रमाणे अन्याय सहन करणे हा देखील दोषच आहे व इतरांवर होणारा अन्याय फक्त बघत राहणे हा देखील दोषच आहे .

आपलेपणाने वागणे म्हणजे आत्मसन्मान बाजूला ठेवून वागणे नव्हे हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे.

प्रेम ,आदर व विश्वास या बाबतीत कोणत्याही नात्यात तडजोड नको. प्रेम, आदर व विश्वास या तिन्ही गोष्टी नात्यातील दोन्ही बाजूंकडे असायला हव्यात.

आपली बाजू मांडताना आपले म्हणणे शांतपणे , योग्यपणे, योग्य शब्दात मांडता यायला हवे.कारण स्वतःच्या बाजूने दुसरे कोणी लढत नसते आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते. हिम्मत ए मर्दा, तो मदद दे खुदा…..

तर माणसं जोडावी. आपण त्यांच्या उपयोगी पडावे आणि आपल्याला त्याचा उपयोग व्हावा असे वागता आले पाहीजे.

दुसऱ्यांचे वाईट चिंतू नये वाईट वागू नये ,वाईट करू नये पण दुसरा कोणी आपल्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात तसेच जरुर सांगावे. असे करूनही जर फरक पडत नसेल तर मग मात्र समोरच्याला धडा शिकवावा .

आपल्या कामाचे फळ किंवा श्रेय इतरांनी घेऊ नये यासाठी जागरूक असले पाहिजे .

लोक काय म्हणतील? घरचे काय म्हणतील? असा आदर्शवाद उगाच बाळगू नये .सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग ….

आपण ज्यांना आपले मानतो तेच लोक आपला जास्त गैरफायदा घेतात .त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास निश्‍चित फायदा होईल.

आपल्याला ईश्वराने आनंदाने व समाधानाने जगण्यासाठी जन्माला घातले आहे. आपण स्वतःला आनंदी व समाधानी ठेवणे हे आपले परम कर्तव्य आहे. इतरांचा विचार करून उगाचच आदर्श वागण्यात काहीही तथ्य नाही .

बाकीच्यांचा गरजेपेक्षा जास्त विचार करण्यापेक्षा स्वतःबद्दल जागरुक राहणे आवश्यक आहे. नवीन काही तरी सतत शिकत राहावे ,जशास तसे वागायचे शिकावे, मनात कुढत बसण्यापेक्षा बोलून वागून मोकळे व्हावे .

आपण पिण्यासाठी जसे स्वच्छ पाणी वापरतो…. घाण साचलेले पाणी वापरत नाही. तसेच मनावर बुद्धीवर कोणताच मळ किंवा घाण साचू देऊ नये मग तो अगदी अतिसाधेपणाचा, अतिप्रामाणिकपणा चा ही नको. कारण अति तेथे माती …कुठलीच गोष्ट प्रमाणाच्या बाहेर चांगली नसते .

बाकीचे गेले उडत…. मी माझ आयुष्य योग्य मार्गाने, आनंदी व समाधानी जगणार, माझा गैरफायदा कोणाला घेउ देणार नाही, कोणाशी वाईट वागणार नाही.. हेच मनात पक्क करा व तसेच वागा ….म्हणजे जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकाल….

धन्यवाद !!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “गेले उडत …..जास्त पण साध बनून जगू नका!…..”

  1. Rajlaxmi sanjay kulkarni

    खुप छान लेख ,ह्या लेखात मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, धन्यवाद दिपाली ताई व पूढिल कार्यासाठी शुभेच्छा

  2. खरचं आजच्या paristhithila वास्तविक आहे. खूपच सुंदर .मल आपला मो नो मिळेल का मॅडम मी पण psychology student aahe.

  3. वृंदा आशय

    साध्या सोप्या शब्दात सुरेख मांडणी.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!