Skip to content

आपण कुचकामी आहोत अशा सडक्या विचारांवर अशी मात करा.

आपण कुचकामी आहोत अशा सडक्या विचारांवर अशी मात करा.


हर्षदा पिंपळे


तनू आणि मीनू….अगदी चांगल्या जिवाभावाच्या मैत्रिणी…! पण एकदा अचानक तनू आणि मीनूमध्ये क्षुल्लक कारणावरून थोडेफार खटके उडाले.कालांतराने तनू आणि मीनूमध्ये कळत नकळतपणे अंतर निर्माण झालं.तनू तशी समजूतदार होती.पण मीनू मात्र थोडी अल्लड-चंचल होती.

एखादी गोष्ट समजून घ्यायला मीनूला जरा वेळच लागायचा. त्यादिवशीही तेच झालं.थोडेफार वादविवाद झाले तरी तनू समजून सांगत असूनही मीनूने काही ऐकलं नाही. ‘माझचं खरं’ असं म्हणत मीनू अक्षरशः हट्टाला पेटली. आणि रागाच्या भरात ती तनूला अगदी नकोनको ते बोलून गेली. तनूला थेट तिने बाहेरचा रस्ता दाखवला.

आणि यावेळी तनूलाही सहन झालं नाही. तनूही पुन्हा मागे वळून पहायला तयार नव्हती. ती मीनूची समजूत काढायला पुन्हा गेलीच नाही.पण काही दिवसांनी मीनूला मात्र खूप वाईट वाटलं. खूप चुकल्यासारखं वाटलं.नेहमी अवतीभवती प्रत्येक गोष्टीत सोबत असणारी तनू आता आपल्या सोबत नाही…

ही गोष्ट मीनूला आतल्या आत सलत होती.आपल्याच चुकीमुळे खरतरं तनू आत्ता आपल्या सोबत नाही याची जाणीवही मीनूला झाली होती.पण आता करायच काय…? What’s next…? असा प्रश्न मीनूला राहून राहून सतावत होता. इतकच नाही तर तिला जुन्या गोष्टी आठवायला लागल्या होत्या. याआधीही आपण तनूला खूप सहन करायला लावलं , तनूलाच नाही तर खूप जणांनी माझ्यामुळे सहन केलय , इतकच नाही तर आपण एकही गोष्ट व्यवस्थितपणे करु शकत नाही , मला काहीच जमत नाही , करिअर/अभ्यास/नाती… अगदी कशाचाही मेळ मला साधता येत नाही…वगैरे वगैरे गोष्टी तिला त्या दिवशी का कोणास ठाऊक पण प्रकर्षाने जाणवत होत्या.तिच्या मनात

“आपण म्हणजे शून्य… आपण काहीच करू शकत नाही… आपण केवळ कुचकामी आहोत ” अशी विचारांची अगदी भेळ तयार झाली होती.कित्येक दिवस गेले तरी मीनू याच विचारांमध्ये गुंतलेली होती.”कुचकामी असणं” तिला मनात कुठेतरी सलत होतं.मुळातच तिला सतत वाटत होतं की ती स्वतः खरच खूप कुचकामी आहे.

आणि आता पुढे काय…….हे काही तिला कळत नव्हतं. या विचारावर मात कशी करायची काहीच समजत नव्हतं. मीनू खरच त्या कुचकामी पणाच्या भावनेत अडकून पडली होती. आयुष्यातील कितीतरी दिवस तिचे विचार करण्यातच गेले.

त्या कुचकामीपणाच्या विचारावर ती काही सहजासहजी मात करू शकली नाही. (कदाचित तनू सोबत असती तर ती यातून बाहेर पडलीही असती.)

पहा, या मीनूसारखीच अवस्था कधीकधी आपलीही होत असते. होत असते नं…? आपल्याही मनात असे विचार येत असतात.एक वेळ अशी येते की तेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीच कामाचे नाहीत ,आपण केवळ शून्य आहोत. सारासार आयुष्य बाजूला ठेवून आपण सतत असा विचार आपण करत राहतो.तर अशा विचारांवर मात तर केलीच पाहिजे. चला तर मग पाहूयात या अशा विचारांवर मात कशी करायची…….

*सर्वप्रथम आपल्याला सातत्याने “आपण कुचकामी आहोत” असं का वाटतं…? याचा शोध घेणे.

*आपण खरच कुचकामी आहोत का..? हे व्यवस्थित निरीक्षण करून शोधून काढणे.

*मनातील नकारात्मक विचार काढून टाकणे.

*सकारात्मक विचारांच्या शक्तीची जाणीव करून घेणे.

*सकारात्मक विचारांची तीव्रता वाढवण्यावर भर देणे.

*निराशेला जवळ न करता आशावादी बनण्यासाठी प्रयत्न करा.

*आपणही काहीतरी करू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करा.

*आपण काय काय करू शकतो त्याची एक योग्य प्रकारे यादी बनवून घ्या.

*स्वतःतील सुप्त गुण ओळखून त्याला वाव द्यायचा प्रयत्न करा.

*आपण यापूर्वी कसे होतो..? आपण यापूर्वी काय काय केलं आणि काय काय केल नाही याचा आढावा घेणे.

*आपण कुठे कमी पडलो याची तपासणी करणे.

*जी गोष्ट आवडते ती गोष्ट करत रहा.चेहऱ्यावरचा आनंद-उत्साह सहजासहजी मावळू देऊ नका.

*शक्य होईल तितकं आनंदी-उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. कारण उत्साही मन नेहमी सकारात्मक विचारांना थारा देत असतं.आणि सकारात्मक विचार जगण्याला नवं बळ देतात.

*खरच काहीतरी करायला सुरुवात करा.करिअर असेल , नोकरी -धंदा , अभ्यास किंवा अगदी नात्यांची कोडी सुटत नसतील तरी सोडवण्याचा प्रयत्न करा . शून्यातून विश्व निर्माण करण्याची हीच संधी आहे असं समजून पावलांचा वेग वाढवायला सुरुवात करा.

*कुणी काही बोलेल , आपले पाय खेचेल याकडे लक्ष न देता न थकता प्रामाणिकपणे प्रगती करत रहा.

* सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन , छंद याकडे लक्ष केंद्रित करा. कारण या अशा गोष्टीच अनेकदा वाईट/नकारात्मक विचारातून बाहेर पडायला मदत करतात.

So…प्रयत्न करून पहा…मीनूसारखी अवस्था आपली नक्कीच होणार नाही. आणि आपल्याला दुसरी ‘मीनू’ व्हायचही नाहीये. त्यामुळे नक्की बाहेर पडा त्या विचारामधून. आपण कुचकामी नाही हे स्वतःच स्वतःला सिद्ध करून दाखवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!