Skip to content

तुमचा मेंदू सतत वासनेकडे वळत असेल तर या सोप्या टिप्स वापरुन पहा.

तुमचा मेंदू सतत वासनेकडे वळत असेल तर या सोप्या टिप्स वापरुन पहा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश यांनी बनलेले आहे. त्याचप्रमाणे माणसाचे मन हे षडरिपू नी भरलेले आहे. हे षडरिपू कोणते? तर ते आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. यांना माणसाचे शत्रू म्हणजेच माणसाच्या मनाचे शत्रू म्हटल जात.

कारण या गुणांमुळे माणूस बंधनात राहतो व हे गुण त्याच्या दुःखाचे कारण बनतात. म्हणूनच चाणक्य नीती मध्ये ही सांगितले गेले आहे की, जर माणसाला सुखी व्हायचे असेल, मोक्ष मिळवायचा असेल अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मन निर्मळ करायचे असेल तर या शत्रुंपासून दूर राहिले पाहिजे.

हे कितीही खरं असलं, मनातील या वाईट गुणांमुळे माणूस जरी अधोगतीला जात असेल तरी हे गुण त्याला काही केल्या सोडता येत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने हे शत्रू मनामध्ये घर करुन राहतातच.

याच सहा शत्रू मधील एक आहे तो म्हणजे काम. शरीर सुख. शारीरिक संबंध हे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये जवळीकतेचे, प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. जेव्हा दोन व्यक्ती मनाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये प्रेम, आदर, विश्वास हे नाते निर्माण होते त्या वेळी शरीराने ती एकत्र येतात. तसेच याचा पुनर्निर्मिती मध्ये मोठा वाटा आहे.

परंतु यातील काहीही होत नाही. व्यक्ती फक्त याकडे शरीरसुख म्हणून पाहते. यात आदर, प्रेम, निती, मूल्ये यांचा विचार केला जात नाही. तेव्हा ती वासना होऊन बसते आणि या वासनेचा अतिरेक झाला तर विकृती निर्माण होते. म्हणून कोणत्याही गोष्टीची वासना ही वाईट असते. जेव्हा मन सारखं वासनेकडे वळते तेव्हा हळू हळू चांगला-वाईट यातला फरक कळेनासा होतो. यातूनच अनेक वाईट घटना घडतात. याला अनेक कारणं असतात.

आयुष्याचा जगण्याचा दर्जा, यासंदर्भात खूप कमी वयात पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी, स्वतःची अशी काही मूल्यं नसणे, नियम नसणे. वारंवार या संदर्भात पाहिलेल्या फिल्म, तसेच स्वतःच या गोष्टीमध्ये या ना त्या मार्गाने गुंतणे या सर्व गोष्टी माणसाला वासनेकडे वळवू शकतात. अनेकदा या सगळ्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही. परंतु खरंच यातून बाहेर पडायचे असेल मनामधील वासना काढायची असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील.

१. अपराधीपणा काढून टाका: अनेकदा जेव्हा आपल्याला लक्षात येते की आपण चुकीच काहीतरी करत आहोत किंवा असं काही करतोय जे करायला नको. त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. तेव्हा आपण स्वतःला त्या गोष्टीबद्दल दोष द्यायला लागतो, अपराधी समजतो. माझ्या डोक्यात जर सतत या गोष्टी येत आहेत, मी त्याकडे वळत आहे याचा अर्थ मी घाणेरडा आहे, मी नालायक आहे इत्यादी.

परंतु जेव्हा आपण स्वतःला दोष देतो तेव्हा आपण स्वतःच्या सुधारण्याचे मार्ग बंद करतो. म्हणून आधी स्वतःला आधी हे सांगा की जश्या माझ्याकडून काही गोष्टी बरोबर होतात त्याचा पद्धतीने चुकाही होऊ शकतात. माझे विचार हे चुकू शकतात. जर मला ते सुधारायचं आहे तर मी आधी स्वतःला दोष देणे बंद केल पाहिजे.

पण मग दोष द्यायचा नाही तर चूक सुधारायची कशी? तर त्या चुकीची जबाबदारी घेऊन. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेतो तेव्हा तो गोष्ट चांगल्या पद्धतीने करतो. म्हणून जर मन चुकीच्या गोष्टीकडे वळत आहे तर त्यासाठी स्वतःला दोष न देता त्याची जबाबदारी घ्या आणि मग ते कसं सुधारता येईल यावर विचार करा.

२. परिणामांचा विचार करा: कोणत्याही गोष्टीचे चांगले, वाईट, काही ना काही परिणाम ठरलेले असतात. म्हणून जर मेंदूत सतत वासनेकडे वळतोय आणि त्यातून काही गोष्टी आपल्याकडून होत असतील तर त्याचा पुढे जाऊन माझ्या वैयक्तिक,वैवाहिक तसेच एकंदरीत आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करा.

३. पॉर्नोग्राफी टाळा: सतत पॉर्नोग्राफी पाहणे, तसे वाचणे यांचा ही मनावर परिणाम होतो. यालाही कारण आहे. सतत पोर्न पाहिल्याने आपल्या मनात अवास्तव अपेक्षा निर्माण होतात, विचार तयार होतात त्यातून व्यक्ती तिच्या जवळच्या व्यक्ती पासून दूर होऊन वेगळ्या, चुकीच्या मार्गाने हा आनंद शोधू पाहते. जो त्या व्यक्तीसाठी चुकीचा ठरतो. म्हणून पॉर्नोग्राफी पाहणे टाळा.

४. आपल्या आयुष्याची मूल्ये/ आदर्श ठरवा: आपल्या आयुष्याची काहीतरी मूल्ये ठरवा. मूल्ये म्हणजे अशा गोष्टी त्यांच्या आधारे आपण आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगतो. मग ती असते स्वतःच्या जवळच्या व्यक्तीशी प्रामाणिक राहणे, आरोग्यदायी जीवन, समाजात चांगले स्थान असणे इत्यादी. आता ही मूल्ये जर मला मिळवायची असतील तर माझ्या या विचारांचा म्हणजेच माझ्या डोक्यात येणाऱ्या वासनेचा यावर काही परिणाम होणार ना नाही ना ? याचा विचार करा. यातून तुमच्या मूल्यांना धक्का लागू शकतो हे समजले तर या गोष्टीकडे तुम्ही सहसा वळणार नाही.

५. मेडिटेशन: विज्ञानानेही सिद्ध केले आहे की ध्यानधारणा म्हणजेच मेडीटेशन आपल्या आयुष्यासाठी खूप चांगले आहे. यातून आपले मन एकाग्र होण्यास, मनाची चंचलता कमी होण्यास मदत होते आणि स्वतःचे खरे गोष्टीकडे मन वळत आहे मग ती वासना असेल तर हे मनाच्या चंचलतेचे एक लक्षण आहे. म्हणून मेडिटेशन करणे, व्यायाम करणे यावर प्रभावी ठरू शकत.

६. वासनेला चांगल्या मार्गातून बाहेर काढा. Redirect करा: एखादी गोष्ट दाबून टाकली तर ती वेगळ्या आणि अधिक वाईट मार्गातून बाहेर पडते. स्प्रिंग जर जोरात दाबली तर ती अधिक जोराने वर येणार. म्हणून मनात येणारी वासना दाबून टाकायची नाही तर त्याला चांगल्या, वेगळ्या मार्गातून बाहेर काढायचे. जे स्वतःला, समाजाला मान्य असतील. मग हे मार्ग असतील एखादी कला जोपासणे. चित्रकला, अभिनय इत्यादी. स्पोर्ट्स जॉईन करणे ज्यातून शरीरातील एनर्जी रिलीज होईल. अशाप्रकारे तुम्ही डोक्यातील या वासनेला चांगल्या मार्गातून बाहेर काढू शकता.

लक्षात घ्या, समस्या नुसती आहे म्हणून चालत नाही. त्यासाठी फक्त दोष देऊन चालत नाही तर त्यावर मार्ग शोधावे लागतात जे प्रयत्न केले की नक्की मिळतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “तुमचा मेंदू सतत वासनेकडे वळत असेल तर या सोप्या टिप्स वापरुन पहा.”

  1. खूप छान आणि सुंदर शब्दात आपण विचार मांडलेत, खुप छान.

  2. Khup chan lekh aahet ya grp vr , pn fakt ani fakt ads khup jast aslyamule grp vr lekh baghve vatat nahit. Ani jast ads mule group chi lokpriyata nakkich kami honar….

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!