Skip to content

सतत उपदेश देण्यापेक्षा ती अपेक्षित कृती आधी तुमच्यात मुलांना दिसायला हवी.

सतत उपदेश देण्यापेक्षा ती अपेक्षित कृती आधी तुमच्यात मुलांना दिसायला हवी.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


स्वतः काहीही न करता सतत आपल्या पाल्याला उपदेशाचे डोस पाजणे ही काही पालकांची एक सवयच असते. पण त्यावेळी त्यांच्या हे मात्र लक्षात येत नाही की आपला पाल्य हा आपलच अनुकरण करत असतो.आपल्या अगदी बारीक हालचालींवरही त्याच लक्ष असतं.त्यामुळे आपले पालक आपल्याला उपदेश करतात पण स्वतः मात्र त्याप्रमाणे मुळीच वागत नाही हे मुलांना सहजासहजी समजून जातं.

मग आपले पालकच आपल्याला जसं सांगतायेत तसं वागत नाही तर आपणही तसं का वागायच…? ते उपदेशाचे डोस आपल्यालाच का ….? असे प्रश्न मुलांच्या मनात चुटकीसरशी येतात. आणि ते असे प्रश्न त्यांच्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे.

मान्य आहे की प्रत्येक पालकांना वाटतं की आपली मुलं संस्कारी हवी वगैरे वगैरे. पण केवळ मुलांवर संस्कार करण्यासाठी म्हणून संस्कार करायचेच का…? ज्या गोष्टींची तुम्ही मुलांकडून अपेक्षा करता ती गोष्ट सर्वप्रथम तुम्हाला स्वतःकडून अपेक्षित नाही का…? की केवळ आपण उपदेश करायचा आणि मुलांनी त्याप्रमाणे वागायच…?

पटतय का काही…? असे कितीतरी पालक आहेत जे सतत आपल्या मुलांना काही ना काही उपदेश करत असतात.असच कर-तसच कर…, हे करू नको-ते करू नको…, हे चांगलं नाही वगैरे असं बरच काही आपण आपल्या मुलांना सांगत असतो. मुलांवर संस्कार करणं चांगलीच गोष्ट आहे पण त्याचबरोबर तेच संस्कार स्वतःमध्ये असणही तितकच आवश्यक आहे.

नाहीतर…. “तुम्ही काहीच follow करत नाही, मग आम्ही का करायचं…? आम्हीच का असं वागायच…? ” असे फिरून प्रश्न मुलं तुम्हाला नक्कीच विचारतील यात शंकाच नाही. आणि तुम्ही कितीही काहीही सांगितल तरी ती मुलं तुमच ऐकणार नाही. कारण आपण जे करतो , जसं वागतो अगदी तसच पावलावर पाऊल ठेवून मुलं आपलं तंतोतंत अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मग उपदेशांचा काहीही परिणाम त्यांच्यावर दिसत नाही.

म्हणून सर्वात आधी ती अपेक्षित कृती स्वतःकडून येऊद्या. मुलांना सातत्याने उपदेश करण्याआधी आपण स्वतः त्याप्रमाणे वागतोय का हे एकदा तपासून पहा.सतत उपदेश देऊन मुलांवर योग्य संस्कार होणार आहेत का…? की कोणत्या वेगवेगळ्या गोष्टींद्वारे त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायची…? याचा विचार जरूर करा.

कारण सततच्या उपदेशाने मुलं कंटाळून जातात. सतत उपदेश नको असतात त्यांना. आणि त्यातूनच तुम्ही स्वतः काही अपेक्षित करत नसाल तर मुलही ते उपदेश सहजगत्या स्विकारत नाही. “तु नाही न आई……मग मीही नाही ” असं बोलून ही मुलं मोकळी होतात.म्हणजे त्यांच्या डोळ्यांना ते दिसत असतं.आपले पालक असं काही वागत नाही मग मी कशाला तसं वागू…? हे त्यांच्या मनाने पक्क हेरलेलं असतं.

इतरांना चांगलं कर असं सांगण्याआधी आपणही तेच करतो का …? ही शंका तपासून पाहणं केव्हाही हिताचच ठरेल.कारण आधी कृती आपण स्वतः करावी आणि नंतर इतरांना उपदेश करावेत.अन्यथा स्वतः एखादी अपेक्षित कृती करत नाही तर आपल्याला इतरांना उपदेश करण्याचा काहीही अधिकार नाही. आणि मुलांच्या नजरेला तर हे स्पष्टपणे जाणवतं.

माझे बाबा असे आहेत , माझी आई खूप हुशार आहे किंवा जे काही आहे ते मुलं स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवत असतात. आपली आई-बाबा आपल्याशी कसे वागतात , इतरांशी कसे वागतात ह्या सगळ्या गोष्टी मुलं बघत असतात.त्यामुळे जरा जरी आपण काही वेगळं वागलो तरी ते त्याचही अनेकदा अनुकरण करतात. आपण कितीही सांगितले की बाळा हे माझ्याकडून चुकून झालं पण हे असं करायचा नाही… तरी ती मुलं ऐकत नाही. तुम्ही असच केलं मीही असच करणार , मला नाही ऐकायच तुमच वगैरे अशा हट्टाला ही मुलं पेटतात.

त्यामुळे विचार करा…सतत मुलांना उपदेश करण्याआधी त्याच जाणीवांचा स्वतः अंगीकार करा.त्यामुळे मुलं तुमचा उपदेश हसतहसत स्वीकारतील आणि हे माझ्या आई-बाबांचे (पालकांचे) संस्कार आहेत असं आनंदाने सांगतील.त्यांच्याप्रती तुमची मानसिकता , तुमच वागणं हे कायमच निरोगी-निखळ आणि संस्कारी असेल.

नुसतच पेरून उपयोग नसतो हे लक्षात घ्या. त्यासाठी आधी बियाणही तितकच चांगल असावं लागतं.तरच पेरलेलं चांगल्या प्रकारे रूजत जातं.हळुहळू बहरत जातं…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “सतत उपदेश देण्यापेक्षा ती अपेक्षित कृती आधी तुमच्यात मुलांना दिसायला हवी.”

  1. Shrikant Mahajan

    बहुतांश पती पत्नी मधील विसंवादास असमाधानी सेक्स वा दोन आयांमधील झगडा कारणीभूत असतो. अनेक स्त्रिया सेक्स विषयी अनभिज्ञ असल्याने, पूर्वायुष्यात एखादा बाका प्रसंग निभावल्या मुळे किंवा त्या विषयीच्या चुकीच्या कल्पना बाळगल्याने आपल्या जोडीदाराला प्रतिसाद देत नाहीत व एका चांगल्या आनंदाला मुकतात व आपले वैवाहिक जीवन बिघडण्यास कारणीभूत ठरतात. याविषयी अनेक स्त्रिया तर सेक्सचा उपयोग लिव्हारेज प्रमाणे करतात. स्त्री सेक्सोलोजिस्ट फार कमी आहेत. शारीरिक रचाने नुसार स्त्रियांना बोलायला आवडते भले त्यांच्या समस्यांवर तोडगा नाही मिळाला तरी. या उलट पुरुषाचे विचार बहुतांशी सेक्स विषयी असतात व त्यांना इतरांनी सल्ला दिलेला बिलकुल आवडत नाही. ते समस्येचा उच्चार करण्यापेक्षा स्वतःच त्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत राहतात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!