Skip to content

कमजोर मनाची हि लक्षणे तुम्हाला माहितीयेत का?

कमजोर मनाची हि लक्षणे तुम्हाला माहितीयेत का?


गीतांजली जगदाळे

( मानसशास्त्र विद्यार्थिनी )


प्रत्येक माणसाची स्वभावाची जडणघडण, ताणतणावाला समोर जाण्याची आणि सहन करण्याची क्षमता ही वेगळी असते. तणावामुळे शरीरात, त्याचप्रमाणे मेंदूत देखील फार बदल होतात. तणावामुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम, मेंदूतील काही घटकांमध्ये असंतुलन निर्माण करतात. जेवणाच्या अनियमित वेळा, जागरण, ताणतणावाच जीवन या सगळ्याचा शरीर किंवा मन कमजोर होण्यात मोठा हात असतो.

जस शरीराच्या अवयवांमध्ये बिघाड झाला असता शरीर आजारी पडत, त्याचप्रमाणे मेंदूमध्ये काही बदल झाले किंवा बिघाड झाला तर मानसिक आजार होतो. त्याचप्रमाणे शारीरिक कमजोरी बद्दल तर आपल्याला माहीतच आहे. आजारपणात किंवा कधीतरी आयुष्यात आपण प्रत्येक जण शारीरिक कमजोरी अनुभवतो. तसेच काही वेळा मन ही कमजोर होत. ते बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही.

अनेक लोकांच्या लक्षात येऊन सुद्धा ते त्यांना मान्य नसत. मन कमजोर होणं म्हणजे आपण कमजोर आहोत अस नसत, तसेच शारीरिक कमजोरी जाणवल्यास आपण इतरांपेक्षा कमजोर आहोत असं मानण्याचं काहीच कारण नाहीए. शरीर किंवा मन ही एक प्रकारची यंत्र आहेत. आणि यंत्र हे कधी कधी त्याच्या क्षमतेपेक्षा कमी काम करत, तर कधी बिघडत.

पण याचा अर्थ ते कमजोर आहे अस होत नाही, पण ते काही वेळा कमजोर नक्कीच पडू शकत. शेवटी ते यंत्र बनवताना किती कष्टाने आणि योग्य गोष्टी वापरून बनवलंय हे जास्त महत्वाचं ठरत. शारीरिक कमजोरी जाणवल्यावर आपण जस डॉक्टर कडे जातो, तर कधी पौष्टिक खाऊन घरीच उपचार चालू करतो आणि परत पूर्ववत एकदम शरीर मजबूत बनवतो.

त्याच प्रमाणे थोडं लक्ष मनाच्या कमजोरीकडे दिले असता ते ही परत पूर्ववत होऊ शकते. एकदा कमजोर झालेले मन परत पूर्ववत मजबूत होईल का अशी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. कारण शरीरापेक्षा मन जरी जटिल असले तरी ते ही परत नीट नक्कीच होऊ शकते. पण त्यासाठी मन कमजोर झालय हे वेळीच ओळखणे खूप गरजेचे आहे. उशीर झाल्याने बऱ्याच वेळा कमजोरी आणि आपलं काम दोन्ही वाढलेलं दिसत. खरं तर मानसिक कमजोरी आज काल सामान्यपणे प्रत्येकामध्ये कधी ना कधी आढळते. ती ओळखू न आल्यामुळे त्यासाठी काय करावे हे कळत नाही.

मानसिक कमजोरीची काही लक्षण बघुयात जेणेकरून आपल्याला ती ओळखायला मदत होईल. शारीरिक कमजोरी असते तेव्हा ज्याप्रमाणे थकवा जाणवतो, तसेच मानसिक कमजोरीमध्ये मनाचा थकवा जाणवतो. काही करायची इच्छा होत नाही, कसलाच उत्साह वाटत नाही.

जास्त झोप येणे किंवा अजिबात झोप न येणे.
अनामिक भीती वाटणे.
भूक न लागणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाणे.

विचारांमध्ये गोंधळ असल्यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होणे.
जगण्यातला आनंद कमी होणे.
या सगळ्या मुले metabolism वर सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो.

या सगळ्या लक्षणांचा परिणाम कालांतराने गंभीर सुद्धा होऊ शकतो.
विनाकारण चिडचिड होणे हे ही एक मानसिक कमजोरीच लक्षण आहे.
मानसिक थकव्यामुळे झोप येतीये असं वाटणे पण शांत झोप घेता न येणे.

काम महत्वाची आहेत हे लक्षात येऊन ही काम करू न वाटणे आणि त्यामुळे अपराधीपणाची भावना मनात येणे.
मानसिक थकवा जाणवून ही डोक्यात सतत अतिविचारांचं प्रमाण वाढलेलं दिसून येत.
मानसिक कमजोरी चा आपल्या वयाशी फारसा संबंध नसतो हे लक्षात घेणे फार गरजेचं आहे.

सतत च्या मानसिक ताणतणावांमुळे सुद्धा कधी कधी मानसिक कमजोरी जाणवण्याची शक्यता असते.

एखाद काम आपण एरवी अगदी नीट पार पडतो पण तशाच प्रकारचं काम मनाची स्थिती कमजोर असताना आल्यास ते पूर्ण करू शकू ही शंका मनात यायला लागते आणि आपण प्रयत्न करायच्या आधीच अवघड आहे चा शेरा देऊन मोकळे होतो.

अशा वेळी वेळेवर झोपणे आणि पूर्ण झोप घेऊन वेळेवर उठणे या गोष्टी मनाची स्थिती पूर्ववत आणण्यात मदत करू शकतात.आपल्या अंतर्मनात डोकावून पाहिल्यास आपल्या शक्तीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. वेळेवर जेवण करणे आणि स्वतःच्या मानसिक स्थितीच निरीक्षण केल्याने ही मन स्थिर व्हायला मदत होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कमजोर मनाची हि लक्षणे तुम्हाला माहितीयेत का?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!