स्वप्नांची जेव्हा राख होते, तेव्हा खरा संघर्ष सुरू होतो.

स्वप्नांची जेव्हा राख होते, तेव्हा खरा संघर्ष सुरू होतो.


सोनाली जे


स्वप्ने .. खरेच मनुष्य प्राणी हा तसा नशीबवान च नाही का !! प्रत्येक माणूस त्याच्या अगदी लहान पणी पासून ते अगदी कोणत्याही वयात काही स्वप्ने बघत असतात. बघा ना आपण लहान असताना समुद्र किनारी जातो तेव्हा वाळूचा मोठा बंगला बांधतो किंवा एखादी कलाकृती . आणि ती बांधत असताना आपल्याला सारखे वाटत असते की हा बंगला बांधला म्हणजे कायमस्वरुपी राहणार.

आपण त्या स्वप्नात असतो आणि अचानक एक मोठी लाट येते आणि तुमचे स्वप्न , तुमचा तो वाळूचा बंगला , तुमची मेहनत त्या लाटे सोबत समुद्रात ओढून घेते आणि तुमच्या कायमस्वरूपी बघितलेल्या स्वप्ना चे तिथे नामोनिशाण ही राहत नाही. आणि मग आपण तेव्हापासून ठरवून टाकतो की आपले स्वप्न हे सत्यात उतरवायचे. आणि तेव्हा आपला खरा संघर्ष सुरू होतो.

कारण स्वप्ने बघणे सोपे असते पण ती पूर्ण करणे अवघड आहे. पण अशक्य नाहीत. ती शक्य करण्याकरिता मग आपला संघर्ष सुरू होतो. आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं आहे . ही प्रेरणा आपल्यात निर्माण होते. आणि त्या करिता जिद्दीने प्रयत्न सुरू होतात. योग्य शिक्षण , नोकरी , व्यवसाय यात यश मिळविण्याकरिता पदोपदी करावी लागणारी धडपड , ठेवावे लागणारे सातत्य , शिकाव्या लागणाऱ्या नवनवीन गोष्टी. करावे लागणारे रात्रंदिवस चे कष्ट, काडी काडी , पै पै गोळा करून , सांभाळून ठेवताना अनेक आवडत्या आणि गरजेच्या गोष्टींवर सोडलेले पाणी.

कधी नाईलाजाने मारलेले मन . अजून प्रगती होवून अजून आर्थिक स्थैर्य यावे याकरिता सतत नवनवीन skill शिकून develop करणे आणि त्याचा वापर करून growth घडवून आर्थिक फायदा ..कधी व्यवसाय असेल तर कधी नोकरी मध्ये असेल. तर प्रगती करिता प्रयत्न वाढतच जातात. आणि मग योग्यता आणि आर्थिक पात्रता आली की आपले स्वप्न पूर्ण करण्याकरिता धावपळ सुरू होते. मग आवडते लोकेशन , बजेट ,शेजारी सगळी चौकशी करून पुढे पावूल टाकताना .

घर घेण्याचे निश्चित करताना ही पैशाची जमवाजमव , तारखांची जुळवाजुळव , पाहिजे तशा सोयी सुविधा करण्याकरिता खेपा, बिल्डर आणि बँका यांच्या सोबत meetings. Loan असेल हप्ते असतील त्याची तजवीज ..छोट्या छोट्या गोष्टीत रोजचे संघर्ष दिसतात. कधी अचानक निघणारे जास्तीचे खर्च manage करता करता नाकी नऊ येते.

आणि जेव्हा प्राथमिक पूर्तता होते त्यानंतर दर महिन्याला होणारी EMI ची कसरत. पण हा स्वप्न पूर्तीचा संघर्ष कायम हवा हवासा वाटतो. आपल्यात ती जिद्द कायम ठेवतो. आणि आपल्याला सकारात्मक राहून वाटचाल करण्यास मोलाचा ठरतो. कोणतेच संघर्ष न करता आयती गोष्ट मिळाली तरी त्याची कदर राहत नाही.

आणि म्हणून कोणतीही वस्तू असेल किंवा वास्तू मिळविताना प्रचंड प्रयत्न , संघर्ष सहन करत असतो पण जेव्हा वस्तू आणि वास्तू असेल किंवा व्यक्ती ही मिळाली की त्याची कदर राहत नाही. कारण हे गृहीत असते की ती आता मिळाली आहे आणि कायमस्वरूपी आपली आहे . त्यामुळे मिळविण्या करिता जो संघर्ष असतो तो जास्त मोलाचा , challenging असतो. एकदा आपल आहे हे मनात खात्रीशीर रित्या घुसले की तो संघर्ष संपतो. नावीन्य ही संपते.

त्यामुळे संघर्ष हा नकारात्मक दृष्टीने बघू नका त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन यांचे उदाहरण मी यापूर्वी ही दिले आहे. त्यांचं दहा building असलेले ऑफिस , आणि त्यांची laboratory आगीत जळून त्यांचे सगळे research , petatnt अर्थात त्यांची स्वप्ने ही जळून खाक होत असताना मुलाला ते सांगतात की बायकोला बोलावं बघायला अशी आग तिने कधी बघितली नसणार.

सगळे जळून जाते तरी परत नव्याने उभे राहण्या करिता , शून्यातून सुरुवात करण्याकरिता जोमाने कराव्या लागणाऱ्या संघर्षा करिता एडिसन परत उत्साहाने तयार झाले. शब्दशः स्वप्नांची जेव्हा राख झाली तेव्हा , आणि कोणतेही भांडवल जवळ नाही. सगळे शोध त्यांच्या रेकॉर्ड ही नष्ट झालेले असताना परत सगळे स्वप्न उभे करून परत नवीन laboratory उभी करण्याचे स्वप्न त्याकरिता भांडवलाची जुळवणी , जागा हे संघर्ष करताना मित्राकडून घेतलेले कर्ज आणि काही कालावधी मध्ये आधी होते त्याही पेक्षा चौपट फायदा करून दिला कंपनीला तेव्हा एडिसन यांनी किती संयम आणि संघर्ष केला असेल याची नक्कीच जाणीव होते.

पण इथेही हा संघर्ष त्यांनी नकारात्मक नाही घेतला.सकारात्मक घेतला. आयुष्य खूप सुंदर आहे.

स्वप्नांची जेव्हा राख होते, तेव्हा खरा संघर्ष सुरू होतो.आणि हा संघर्ष तुम्हाला तुमची स्वप्ने परत जिद्दीने पूर्ण करण्यास motivate / प्रेरित करतो. सकारात्मक बनवितो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.