जेव्हा आपण आपल्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या नाजूक भावनांवर बोट ठेवतो..

जेव्हा आपण आपल्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या नाजूक भावनांवर बोट ठेवतो..


सोनाली जे.


काहीसे इमोशनल ब्लॅक मेलिंग च की.

इमोशनल / भावनिकन ब्लॅकमेल म्हणजे थोडक्यात मॅनिप्युलेशन च की. जेथे कोणीतरी आपल्या भावनांचा वापर आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा गोष्टी त्यांच्या पद्धतीने पाहण्यासाठी तुम्हाला पटवून देण्यासाठी वापरते.

काही वेळेस चुकीच्या भावना ही असतात . त्याला योग्य दिशा देण्याकरिता . तर काही वेळेस जरी तुमचे बरोबर असेल तरी त्यांच्या भावना किंवा त्यांना वाटते तसे वागावे याकरिता तुमच्या भावनांचा वापर करून तुम्हाला भावनिक दृष्ट्या पटवून , तुमचे मत परिवर्तन असेल किंवा भावना परिवर्तन केले जाते.

आता परवाच बघितलेला ” सूर्यवंशी सिनेमा ” मधला प्रसंग आठवला . कादर उस्मानी पकडला जातो. किती ही मारहाण केली तरी तोंड उघडतं नाही. काय नक्की सुरू आहे. त्यांचे आतंकवादी प्लॅन्स तो सांगत नाही. मोडेन पण वाकणार नाही. अशी अवस्था असताना. वीर सुर्यवंशी देशाच्या हिताचा विचार करून सिधी उंगली से घी नही निकलता तो उँगली तेढी करता हैं !

कादर उसमानी च्या घरच्या स्त्रियांना पोलिस स्टेशन मध्ये घेवून येवून आत नेवून उगीच त्यांना मारहाण करतो असे दाखवीत त्यांचे ओरडायचे खोटे आवाज ही . हे ऐकल्यावर किती ही कट्टर, आपल्या मतावर ठाम असलेला उस्मनी ही गयावया करतो आणि बायकांना सोडून द्या मी सांगतो काय सांगायचे ते असे म्हणून माहिती पुरवितो.

पण म्हणजे हे परिवर्तन केवळ त्याला भावनिक आव्हान केल्यावर , इमोशनल ब्लॅकमेल केल्यावरच झाले ना.

अशा जशा देशाकरिता चांगल्या गोष्टीं करिता असेल , अथवा लोकांच्या चांगल्या करिता असेल त्यांना अचूक मार्गदर्शन करण्याकरिता असेल . कधी मुलांनी चांगला अभ्यास करावा म्हणून कधी ओरडुन असेल किंवा कधी भावनिक होवून असेल की तू अभ्यास केला नाही तर मी बोलणार नाही. यात मुलाला आईचे , वडिलांचे संवाद जास्त महत्वाचे आणि जवळचे वाटतात ते जर बंद झाले तर या विचारानेच तो insecure feel करतो आणि चांगला अभ्यास करतो.

इथे punishment / शिक्षा technique वापरले. तर चांगला अभ्यास केला तर मी खावू देईन , खेळणी देईन. , बाहेर मुलांच्यात खेळण्यासाठी पाठवेन . हे बक्षीस किंवा reward technique म्हणजे परत दोन्ही कडे आपण आपल्या आणि मुलाच्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या नाजूक भावनांवर बोट ठेवले ना.

प्रेमात ही आपले प्रेम टिकावे. वाद असतील ते मिटावेत म्हणून ती किंवा तो ऐकत नसेल तेव्हा खूप पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. मग तरी ही ऐकत नाहीत तेव्हा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय जगुच शकत नाही याची खात्री पटवून देण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करतात .

मग तरीही ऐकत नसेल अगदी टोकाला जावून तुला पटत नसेल तर बघ मी जीव देईन अशी सुरुवातीला याचना करून ही फरक पडत नसतो तेव्हा खरेच जीव देण्याचा प्रयत्न ही केला जातो हे म्हणजे काय तर आपली व्यक्ती आपल्याला कायमची पाहिजे आहे. याकरिता आपण आपल्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या नाजूक भावनांवर बोट ठेवतो.. आणि तरी ही खूप प्रॅक्टिकल असणारी लोक व्यवहार च समजतात. अशा लोकांना भावनिक दृष्ट्या ही कुठे बदलू शकत नाही तेव्हा त्यांच्यापासून अलिप्त राहावे.

मनीष आणि मानसी शाळेत असल्यापासून एकमेकांवर नजरेतून प्रेम . कधी ही बोलली नाहीत. पण भावना खूप strong. दोघांचे लग्न झाल्यानंतर मुले झाल्यावर भेटली. पुढे प्रेमाचे रूपांतर शरीर आकर्षणात झाले. त्याचा संसार तो अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पाडत होता. मानसी तसे लग्न लवकर झाले पण सासरी तसे वातावरण विचित्र . शिक्षण पूर्ण केल्याशिवाय तिच्या आणि तिच्या नवऱ्या मध्ये कोणतेही संबंध नाहीत.

बरं आर्थिक गोष्टी ही स्वतः च करायच्या . जॉइंट family असून टूथ पेस्ट पासून. स्वतः चे स्वतः आणायचे. नवरा तेवढा financially stable नाही. व्यवसायात कधी तरी मिळकत नाही तर तोटाच जास्त . मानसी शिक्षण करून तिची नोकरी करून घरचे ही सर्व करायला लागायचे. नवऱ्याकडून तसे शारीरिक , मानसिक समाधान कोणतेच नाही. कधी तिच्या कोणत्याच गरजा कोणी पूर्ण करायचे नाही. लग्नानंतर माहेरी कसे सांगणार हे म्हणून तोंड उघडले नाही आणि जेव्हा सहन होईना तेव्हा वडिलांना सांगितल्यावर आधीच आजारी असणारे वडील heart attack ने गेले.

अजून ही मानसी स्वतः ला दोषी मानते की तिच्या रडगाणे संगण्यायमुळे तिचे वडील भावनिक दृष्ट्या तो धक्का सहन झाला नाही म्हणून गेले. नंतर खूप अंतर्मुख झालेली मानसी मनीष चे अचानक भेटणे , बोलणे यातून खूप मोकळी होत गेली. त्याच्या बद्दल आजपर्यंत दाबून ठेवलेल्या , आत मध्ये असणाऱ्या भावना बाहेर पडू लागल्या. आणि ती मनीष बरोबर संवाद , भेटणे त्याचा सहवास यातून अजून च जवळ येत गेली. लगानंतर मुले असून ही त्यांच्यात शारीरिक जवळीकता ही आली.

सुरुवातीला सगळे खूप छान गोडीत चालले होते. मनीष ही त्याचे प्रेम आहे हा विश्वास देत होता. दोघांनी लग्न ही केले अर्थात मंगळसूत्र घातले म्हणजे भारतीय स्त्री ही ते पवित्र बंधन मानते. अनेक गोष्टी करत होते दोघे मिळून. आवडते छंद जपणे. फिरायला जाणे . सिनेमा . हॉटेलिंग , शॉपिंग , भावनिक दृष्ट्या support , किरकोळ गोष्टींचे विचार. मनीष चे आई बाबा यांना मानसी जपत होती .मुलांकरिता खावू ..कधी भेट वस्तू. निदान वाढदिवसाला तरी नक्कीच देत होतें .

पण हळूहळू मनीष चे मेसेज कमी झाले , संवाद , फोन बंद झाले. कधी काळी आश्वासन देणारा मनीष की मी तुझ्या करिता काही तरी करेन हे कुठे तरी हवेतच गेले. आर्थिक. दृष्ट्या ही त्याने कधी मदत केली नाही . किंवा त्यांचे असे स्थैर्य येण्याकरीता ही नाही. काही काळ घर घेतले परंतु तो तिथे कधी ही मुक्कामाला नाही राहायचा.ऑफिस वेळेत ऑफिस अर्धे करून कधी सुट्टी काढून मग मानसी ही सुट्टी काढून येत असे. एकत्र वेळ म्हणजे तेव्हा शारीरिक जवळीकता च असे. तो राहायला कधी तयार नसे. रात्री मुक्काम आपल्या कुटुंबात ..

यावरून मानसी खूप वेळा चिडचिड करे. की घर असून ही मनीष थांबू शकत नाही त्याच्या मर्यादा. वाद वाढत गेले. वाद वाढले की मनीष यायचा मग सगळे सोडून दे ग आपण कशात आनंदी असतो बघ , चल बाहेर फिरायला जावू , शॉपिंग ला जावू असे अनेक ऑप्शन देवून मग परत शारीरिक जवळीक हा एकच उपाय.

वाद वाढतच गेले. कारण प्रत्येक वेळी नात्यातल्या मर्यादा मानसी ही सहन करू शकत नव्हती. वादातून घर सोडायचे ही ठरले. त्यावरून ही मानसी चिडली .. insecure feel झाले. घर गेले म्हणजे आपले ही त्याच्या आयुष्यातले स्थान असेच डळमळीत आहे ही भावना तिला त्रास देवू लागली . इकडे मनीष मात्र बायकोला महिन्याला खर्चाला रक्कम देणे , तिचे लाड अस्तील गरजा असतील त्या पुरविने. अगदी तिला लागू नये म्हणून स्वतः भाजी , फळे , सामान घेवून जाणे , नवीन वस्तू घेणे.मेन्टेन करणे . आज काय वॉशिंग मशीन खराब झाले तर नवीन घ्या . एव्हढे सगळे सुख सोई तिला देत होता . मानसी बाबत मात्र कायम हात आखडता. एखादी गोष्ट घ्यायची तरी बजेट असायचे. आणि कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी मेन्टेन करू शकला नाही.

दोघी मध्ये भेदभाव करणारा हा मनीष असे का वागतो हे मात्र मानसी समजू शकली नाही. वेळ प्रसंगी सगळे सोडून, मुलांकडे दुर्लक्ष करणारी मानसी , केवळ सगळी कडे मनीष आणि आपले आनंद, त्याचा सहवास , सुख यात च होती. अनेक गोष्टी नकळत करायचा मनीष
. मुले बायको यांच्या सोबत ही आनंद मिळवायचा. मानसी ची गरज असेल तेव्हा तिच्या सोबत .. हा ताण सहन होईना तेव्हा दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपले स्थान SECURE राहण्याकरिता प्रयत्न केले ..वाद घातले. मनीष अजून दुरावत गेला .. पण मग फक्त शारीरिक दृष्ट्या जवळ येताना मात्र मानसी ला खूप समजून संगुंन वाद मिटवून एकत्र येई. ..

किती ही टोकाचे वाद झाले . बोलणे बंद झाले .व्हॉटसॲप ब्लॉक झाला तरी तो तिला भावनिक दृष्टीने व्यवस्थित MANIPULATE करू शकत होता. आणि ते परत एकत्र येत. पण आता तो परदेशी जाणार हे ठरले तर बायको मुलांना आधी जपत असे त्यांच्या गरजा आधी पूर्ण आणि अगदी देवदर्शन ही जोडीने असेल ,FAMILY VISA ही तयार . पण तेव्हाही मानसी करिता काही प्लॅन्स नाहीत. विसा तुझा तू बघ मी तिकडे बघेन कसे MANAGE करायचे.

परत परत मानसी त्याच INSECURE लाईफ मधून जावू लागली. प्रत्येक वेळी मनीष तिला भावनिक दृष्ट्या पटवून देत असे. त्याचे आणि बायकोचे नाते चांगले नाही. तू महत्वाची मानसी . मग मानसी भावनिक दृष्ट्या विचार बदलत असे. आणि मनीष ला साथ देत असे.
पण जेव्हा मानसी ने बघितले की मनीष खोटे बोलतो आहे .त्याचे बायको समवेत देवदर्शन , जोडीने बसलेले फोटो बघितल्यावर मात्र ती खचली आणि स्पष्टपणे खोटे बोलणाऱ्या मनीष वर तोंड सुख घेतले. तरीही मनीष ला मानसी चूक वाटत होती. तो कुठेच चूक नाही. आणि तरी ही तो मानसी ला भावनिक दृष्टीने वळविण्याचा प्रयत्न करत होता.

मानसी चे त्याच्या आयुष्यात असणे किती महत्वाचे पटवत होता. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या गोष्टी बघ हे समजावत होता. मानसी त्याच्या आयुष्यातून जाणार हे पटत नसावे. अर्थात त्यानेही जेव्हा शक्य तेव्हा मानसी करिता अनेक गोष्टी केल्या ही होत्या पण तो तिला te secure life कधीचं कायमचे देवू शकला नाही .. आणि आता तो परदेशी जाताना त्याला मानसी इथे सोबत असावी . जे थोडे दिवस आहेत इथले ते आनंदात घालवावे . अर्थात तो तसेही कुटुंबासोबत जास्त आनंदी होताच.

पण शारीरिक दृष्टया जवळीक मानसी सोबतच होती ती टिकावी म्हणून दोघांच्या पुढच्या आयुष्यात काही चांगले होईल, एकत्र असतील तर काही पुढचे प्लॅन्स करता येतील हे सांगून परत परत एकत्र राहण्याकरिता सांगत होता. प्रयत्न करत होता. आणि मग भेटुयात . आपण शारीरिक दृष्ट्या एकत्र आसलो की सगळे विसरतो .तुझ्यासोबत वेळ हवा हे सांगून भावनिक आव्हान करत होता.

आपल्या अनेक लोकांच्या आयुष्यात ही असे होते . कधी ना कधी कोणी ना कोणी आपल्याला भावनिक दृष्ट्या आव्हान देत / करत असतो.
कधी तरी आपण ही असे करत असतो . आपल्या फायद्या करिता इतरांच्या नाजूक भावनांचा वापर करत असतो. जसे की अगदी छोटी गोष्ट आपल्याला बाहेर जायचे असते. फिरायला असेल किंवा मित्र मैत्रिणी एकत्र. तर घरी कसे सांगणार म्हणून मैत्रिणीला म्हणतो की मी तुझी चांगली मैत्रीण ना मग घरी अशी बाबांना सांग ना तू . तुझे ऐकतात ते. असे तर कधी एखादी गोष्ट आई बाबांकडून पाहिजे असते तेव्हा जास्त लाडात येवून .प्रेमाने जवळ जावून त्यांना गोड बोलून पटवून.

कधी आपली जवळची आजी , व्यक्ती सतत औषधे घेत असली की पुढे कंटाळा करतात घेण्याचा ..तेव्हा मग भावनिक पटवून की आजी तुझ्यावर आमचे किती प्रेम आहे तू आम्हाला कायम हवी आहेस . मग आधीच्या गमती जमती आठवून सांगून . तिला प्रेरणा देवून . भावनिक परिवर्तन घडवितात. आणि आजी औषध घेते.

डबा खाताना नावडतीचा डबा असेल आणि मैत्रिणीचा डबा छान असेल तर तुझी आई किती छान करते. तू माझी बेस्ट friend म्हणून मी खाते हुं . मला आवडले हे आजचा दिवस तू माझा डबा खा मी तुझा असे म्हणून exchange करणारी ही शाळेतली मुले मुली.

मुन्नाभाई मध्ये नाही का मुन्नाभाई नाही का रुस्तम चे पप्पा खात पित नसतात म्हणून त्यांची आवडती गोष्ट कॅरम त्यांच्यासमोर खेळत असतात. आणि राणी मिळाली तर कव्हर मिळणार नाही असे भावनिक चॅलेंज देतात. आणि रुस्तम चे पप्पा challenge स्वीकारून queen ani cover दोन्ही मिळवितात. आणि मग त्या आनंदात , उत्साहात असणाऱ्या पप्पांना मुन्नाभाई हळूच ज्यूस ऑफर करतो आणि ते पितात हि.

जेव्हा आपण आपल्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या नाजूक भावनांवर बोट ठेवतो..हेतू कधी चांगला असतो तर कधी वाईट असणारे ही असतात. वयस्क लोकांना भावनिक मदत करून फसविणारा ही असतात. तर तरुण मुलींना प्रेमाच्या भावनेत गुंतवून गैरफायदा घेणारी ही असतात.

जेव्हा आपण आपल्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या नाजूक भावनांवर बोट ठेवतो.. कोणी आपला गैर फायदा घेवू नये किंवा कोणी आपली मते आपल्यावर लादू नयेत याकरिता नक्कीच आपल्या भावनांवर आपले स्वतः चे नियंत्रण असणे गरजेचे असते.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.