Skip to content

एखाद्याला तुम्ही फसवलात म्हणजे तो माणूस मूर्ख नाही, तर तुम्ही त्याच्या विश्वासलायक नाही.

एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात, म्हणजे तो माणूस मूर्ख नाही, तर तुम्ही त्याच्या विश्वास लायक नाही.


सोनाली जे.


आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल की लहान असताना छोट्या म्हणी , सुविचार आपल्या तोंडपाठ असायचे .कधी गाण्याच्या भेंड्या, तर कधी नावांच्या , कधी गावांच्या तर कधी म्हणी आणि सुविचार.

एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात, याचा अर्थ तो माणूस मूर्ख नाही, तर तुम्ही त्याच्या विश्वास लायक नाही.

हे ही पूर्वी अनुभवातून आलेलं शहाणपण – तत्वज्ञान म्हणावे लागेल. जे तत्ववेत्यांनी मांडले आहे.

हा हा हा आजकाल तुम्हाला कोणत्या डेस्टिनेशन वर पोहचायचे आहे त्याकरिता गूगल मॅप जसे मार्गदर्शक ठरते तसेच अनुभवातून मिळणारे ज्ञान हे व्यक्तीच्या प्रगतिकरिता अतिशय मार्गदर्शक ठरते.

जसे Google मॅप वर रस्ता चुकलो तरी ते rerouting करीत असते. तसेच आपल्याला मिळणारे हे अनुभव ही आपल्याला rerouting करून योग्य दिशा किंवा प्रगतीकरिता , कसे वागू नये याकरिता किंवा अनुभवातून परत त्या दिशेला न जाता दिशा बदलण्याचे योग्य मार्गदर्शन करीत असतात.

एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात, याचा अर्थ तो माणूस मूर्ख नाही,त्याने तुमच्यावर अगदी डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवलेला असतो. आणि त्यांनी चांगल्या अनुभवांमुळे तुमच्यावर विश्वास ठेवलेला असतो. तुम्ही त्याचे हितचिंतक आहात अशीच त्याच्या मनाची धारणा असते. नाती , लिखा पढी , काही agreement न करता ही केवळ एकमेकांवर असणारा दृढ विश्वास असतो म्हणून एखाद्या गोष्टीचे आयोजन किंवा तशी आखणी करण्याचे मनसुबे रचले जातात.

फसवणूक ही कोणत्या प्रकारची होवू शकते ?

१. आर्थिक २. मानसिक ३. शारीरिक . या तिन्ही ही फसवणुकी एकमेकांवर आधारित आहेत. आर्थिक फसवणूक झाली की मानसिक त्रास होतो. आणि त्याचे परिणाम शरीरावर ही होत असतात.

क्रिमिनल लॉ मध्ये कुठल्याही गुन्ह्याची सुरुवात ही माणसाच्या मनात ज्या क्षणी तसा वाईट विचार येतो त्याक्षणी झाली असे समजले जाते. त्यालाच आपण म्हणतो ४२० केली.

एक तर जे नाही ते भासविले जाते. जसे मार्केटिंग person त्याच्या प्रॉडक्ट विषयीं सगळी माहिती असते त्याला. त्यातले दोष , मर्यादा हे सगळे माहिती असते त्याला , तरी ही त्याचे प्रॉडक्ट किती चांगले हे सतत त्यावर बोलून , त्याची माहिती देवून , त्याचे फायदे काय हे सतत सतत मनावर बिंबवत असतो.

माझ्यावर विश्वास ठेवून हे प्रॉडक्ट घ्या . काही झाले तरी मी आहें की असे आपल्याला आश्वासन देत असतो आणि मग आपण फक्त चांगले आहे प्रॉडक्ट , एव्हढे फायदेशीर आहे असे म्हणून ते विकत घेतो आणि जेव्हा आपण ते वापरायला लागतो तेव्हा समजते की त्यात काय दोष आहेत. त्याच्या limitations काय आहेत.

आणि तेव्हा आपण त्या मार्केटिंग person ला product चे दोष सांगितले तरी त्याला ते माहिती नाही असेच दाखवीत असतो. बिघाड झाला तर त्याला वारंवार फोन करून ही तो येत नाही. फोन घेत नाही. मग आपण इतरांना सांगतो की हे प्रॉडक्ट चांगले नाही .घेवू नका.

परंतु मार्केटिंग person तुम्हाला फसवण्यात यशस्वी झाला कारण त्याने तुम्हाला गोड बोलून विश्वासात घेवून त्याचे प्रॉडक्ट खपविले. याचा अर्थ तुम्ही मूर्ख नाही, तर तो तुमच्या विश्वास लायक नाही. कारण त्याच्या भरवशावर तुम्ही व्यवहार केले होते. परंतु नंतर त्याने रीतसर हात वर केले.

परंतु त्याच्या हे लक्षात येत नाही एक प्रॉडक्ट खपविण्याकरिता त्याने प्रयत्न केले आणि ते प्रॉडक्ट तेवढे चांगले नसेल तर तो पुढच्या दहा customer ना कायमचे घालवून बसतो कारण प्रॉडक्ट घेणारा ज्याला वाईट अनुभव आला आहे तो प्रत्येकाला त्या व्यक्ती आणि प्रॉडक्ट घेण्यात फसू नका असे mouth to mouth publicity करत असतो.

तसे मध्यंतरी एका बँक director , builder यांच्या बाबत घडलेली सत्य घटना. त्यांनी जास्त rate of interest चे आमिष दाखवून लोकांना गोड बोलून , अतिशय विश्वासात घेवून, लोकांना त्यांचे फायदे पटवून देवून , लोकांकडून पैसे ठराविक मुदती करिता ठेवी स्वरूपात घेतले. आणि ते पैसे त्यांनी त्यांच्या इतरत्र कामा करिता वापरले . त्यात त्यांना लॉस झाला. आणि लोकांचे पैसे चक्क बुडाले.

अनेक लोकांना फसवण्यात हे बिल्डर , बँक director यशस्वी झाले , याचा अर्थ त्यात गुंतवणूक करणारे मूर्ख होते असे नाही, तर हे director , builder त्याच्या विश्वास लायक नाही. कारण त्यांनी दिलेला विश्वास , आश्वासन आणि आधार आणि लोकांमध्ये निर्माण केलेली इतर गुंतवणूक , बँक या पेक्षा जास्त इंटरेस्ट आणि जास्त पैसे मिळतील याचा विश्वास आणि खात्री दिली होती.

पण तसें न करून अनेक लोकांनी पै पै करून साठविलेला पैसा बुडाला. नुकसान झाले. निदान दुसरीकडे कुठे तरी कमी व्याजाने का होईना पण मुद्दल सुरक्षित राहिले असते. इथे मात्र मुद्दल ही गेले आणि व्याज ही गेले. आणि तुमच्या वरचा लोकांचा कायमचा विश्वास ही उडाला.
आणि पुढे ही काही मदत करण्याकरिता लोकांच्या विश्वास लायक ही हे लोक राहिले नाहीत आणि त्यामुळे आयुष्यात परत ते उभारू शकले नाहीत.

असेच असते काही आपली मानलेली नाती , प्रेम यात एक विश्वास ठेवलेला असतो की कोणत्याही प्रसंगात ती व्यक्ती आपल्या सोबत असणारच , साथ देणारच , मग कधी कोणाची आजारपणे असतील , तर कधी कुठे urgent जायचे असेल तेव्हा सोबत म्हणून , कधी महत्वाचे निर्णय घेताना डळमळीत होत असते तेव्हा आधार आणि खंबीर पाठिंबा , तर कधी नोकरी गेली , व्यवसायात नुकसान तर मी सोबत आहे असे म्हणून काही योग्य मार्गदर्शन करणे . तर कधी समजून आर्थिक मदत करणे असते. विचारले की त्याला अर्थ नसतो आपलेपणा गरजेचा असतो.

आपणहून परिस्थिती समजून आर्थिक मदत केली ती ही वेळेला तर कायमस्वरूपी लक्षात राहणारी असते. आणि परत मिळतील याची अपेक्षा ठेवली नाही तरी जिला मदत केली ती आयुष्यभर हे विसरू शकत नाही आणि पैसे स्वरूपात शक्य असेल त्या , नाही तर इतर स्वरूपात ते ही जाणीव ठेवून मदत करत असतात.
परंतु हा विश्वास असतो.

सागर स्नेहाला सतत पटवून देत असतो की तो तिच्या प्रेमात आहे. पटवून देत असतो की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे . मला गरज आहे तुझी. तुझ्या सोबत मी कायम आनंदी असतो असे म्हणून स्नेहाला भावनिक दृष्ट्या व्यवस्थित manipulate करून स्नेहा ही सागर वर विश्वास ठेवून प्रेमात आकंठ बुडते. मग मात्र गरज असेल तेव्हा सागर तिच्या जवळ येत असे .इतर तिच्या गरजा समजून घेत नसे. तिला मदत करत नसे.

पण सागर आपल्या लोकांना मदत करत असे. त्याची अजून एक मैत्रीण तिला पटवायचे प्रयत्न करत होता . आपल्या आवडी , सवडीने स्नेहाला वेळ देत होता. .इतर वेळी आपल्या लोकांच्या मध्ये , मित्रांच्या मध्ये नातेवाईक यांच्यात आनंदी राहत असे. . इतरांच्या आणि स्वतः करिता सगळ्या गोष्टी करिता वेळ देत . मात्र स्नेहाला एकदा पटविली मग आता कुठे आपल्याला सोडून ती जाणार , भले चिडली , वाद घातले तरी आपण आहोतच की पटवायला असे वर्तन वाढू लागले.

मात्र सतत हेच घडत गेले आणि स्नेहाचा सागर वर आणि त्याच्या प्रेमावर ठेवलेल्या विश्वासाला तडा गेला. ती मूर्ख म्हणून त्याच्या प्रेमात पडलेली नसते तर सागर चे प्रेम बघून , त्याने काही आशा दाखविल्या असतात ते बघून त्याच्यावर विश्वास ठेवून ती प्रेमात पडते. पण तिच्या कठीण प्रसंगी., आजारपणात , नोकरी गेली , आर्थिक अस्थिरता , घरातले आजारपणं या प्रसंगी सागर ने तिला कोणतीच मदत केली नाही तर साधा आधार दिला नाही तेव्हा प्रेमात झालेली फसवणूक स्नेहाच्या लक्षात आली.

भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या ही तिने विश्वासाने सागर ला सर्वस्व दिले परंतु त्याच्या अशा तुटक वागण्याने , गरजे पुरते वागण्याने , इतर गोष्टींना स्नेहा पेक्षा जास्त प्रायोरिटी आणि दुटप्पी वागण्याने स्नेहा ला चांगलेच लक्षात आले की सागर ने तिची फसवणूक केली आहे आणि ती त्याच्यापासून अलिप्त राहू लागली .

खरे तर हे असे अलिप्त वागणे काय दर्शविते की सागर विश्वास लायक नाही कारण स्नेहाने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला होता, भावना व्यक्त केल्या त्या खऱ्या आहेत असे समजून त्यावर विश्वास ठेवला होता. . मी आहे सोबत या शब्दांवर विश्वास ठेवला होता आणि केवळ आनंदी प्रसंगी ते ही गरजेनुसार सागर ची साथ बघून त्याने केलेली प्रेमातली फसवणूक लक्षात आली स्नेहाच्या.

त्यानंतर ती त्याच्या पासून दूर राहू लागली. सागर परत परत किती ही गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ती मात्र अंतर ठेवून वागू लागली. सुरुवातीला ती सागरच्या प्रेमाच्या भूल थापाना भुलली. सागर ने दाखविलेली भविष्याची सुंदर स्वप्ने , असे करू तसे करू असे सांगितलेली आश्वासने . ती स्वप्ने पूर्ण करण्याचा दिलेला विश्वास यावर तिने भरोसा ठेवला आणि त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. पण याचा अर्थ ती मूर्ख नाही, तर स्नेहा ने सगरवर पूर्णपणे विश्वास ठेवला पण तो मात्र तिच्या विश्वास लायक नाही.

लोकांना फसवून , त्यांच्या भावना दुखवू नका. भावनिक लोकांना या फसवणुकीचा खूप त्रास होतो. तुमच्यावर विश्वास ठेवून बिनधास्तपणे ते पुढे वाटचाल करत असतात. त्यांच्या विश्वासाला तडे जावू देवू नका. कोणालाही फसवू नका .खोटी आश्वासने देवू नका.

काहींना सर्व काळ फसविता येते. सर्वांना काही काळ फसविता येते. पण सर्वांना सर्वकाळ फसाविता येत नाही.

आयुष्य सुंदर आहे. एकमेकांवरील विश्वास दृढ करून आनंदी जीवनाची वाटचाल करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!