Skip to content

निराश व्यक्तीला तुमच्याकडे पाहून जगण्याची उमेद मिळायला हवी.

निराश व्यक्तीला तुमच्याकडे पाहून जगण्याची उमेद मिळायला हवी.


गीतांजली जगदाळे


आयुष्य असं जगता आलं पाहिजे ना की भले आयुष्यात आपण कोणता सन्मान जिंकलेला नसावा , भले आपण कोणत्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेलो नसावे, भले आपल्याकडे अमाप पैसा-अडका असू नये आणि तरीही आपण लोकांच्या नेहमी स्मरणात राहावं. लोक आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवतील आणि त्यांच्यासाठी काहीही न करता देखील आपल्याला बघूनच त्यांना प्रसन्न वाटेल, आनंद वाटेल,

आणि ते म्हणजे आयुष्याची नशा असल्यासारखं जगणे. खूपदा आपण वपु काळे, पूल देशपांडे यांच्या पुस्तकांतून अशा अवलियांना भेटत आलोय. (वपु किंवा पुलंची पुस्तके न वाचलेली मंडळी तशी सापडणार नाहीत पण तरीही कोणी वाचलेली नसतील तर मी अवलियाच एक छोटंसं उदाहरण म्हणून 3 idiots मधला ‘Rancho’ ला आठवा असं सांगीन).

अशा माणसांची जगण्याची philosophy च काही और असते. ती आपल्या सर्वसामान्यांसारखी नसते आणि म्हणूनच ती कुठेतरी कुतूहल निर्माण करणारी आणि आशावादी असते. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच खूप वेगळा असतो. एका दृढ सकारात्मकतेने ते आयुष्याच्या प्रत्येक वळणाकडे पाहत असतात.

अशी माणसे, ज्यांचा संकट काळात सुद्धा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. त्यांचा दृष्टिकोन वाचून कधी कधी ही माणसे वेडी वाटतात तर कधी असं वाटत की यांना आयुष्याचा seriousness च नाही, किंवा काय अफलातून माणूस आहे हा, किंवा कुतूहल अशी किती तरी मते आपली त्यांच्या बद्दल बनून जातात पण आपली त्यांच्याबद्दलची मते काही का असेनात, तरीही असे अवलिया आपल्याला ही कधी भेटावेत असं प्रत्येकाला मनात वाटून जात.

पण तोच अवलिया आपण ही बनू शकतो असा विचार मात्र कोणी करत नाही. तस अवघड आहे पण अगदीच अशक्य नाही, त्यासाठी दृष्टिकोन बदलायचा तर विलंब आहे! आयुष्याला, त्यातल्या घडामोडींना , संकटांना बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन त्या माणसांजवळ असतो. आपल्याला वाटत ह्यांना परिस्थितीच गांभीर्य नसत, कसलाच seriousness नसतो, नुसता एन्जॉय हवा असतो.

ते तसे असण्याचं कारण काही का असेना पण मला अस वाटत की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला कधीतरी हा अवलिया नक्की भेटावा. आपल्यापेक्षा भयानक संकटे ज्याच्या आयुष्यात येऊन गेली असा माणूस सुद्धा इतक्या मनमोकळे पणाने आयुष्याचा आनंद घेताना बघून आपल्याही मनावरचा निराशेचा पडदा बाजूला जाऊन पडतो.

आजच्या दिवसाची वाईट घटना त्यांना फार फार तर आजच बैचेन करते, नंतर त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात काय असेल हे त्यांचं त्यांना माहित पण दुसऱ्या दिवसाच्या उगवत्या सूर्याबरोबर ते ही नव्याने जीवन जगायला तयार असतात कारण दुःख फार काळ कवटाळून बसणं आणि आनंदाचे दिवस मात्र त्या दिवसापुरतेच अनुभवणं या आपल्या तंत्राच्या पूर्ण उलट तंत्र त्यांचं असत. ते दुःख त्या दिवसापुरतं ठेवून आयुष्यात आनंद कवटाळून इतरांना ही आनंद देताना च दिसतात. याचा अर्थ त्यांना दुःख होत नाही किंवा आपल्या इतकं होत नाही असा नसतो, पण त्यांची ते हाताळायची पद्धत मात्र आपल्याहून वेगळी असते.

कोणी निराश मनाने आपल्या पर्यंत तर आलं तर आपण काय करतो? किंवा जेव्हा आपण निराश मनाने एखाद्याकडे जातो तेव्हा आपल्याला काय ऐकायला मिळत? की टेन्शन घेऊ नकोस सगळं ठीक होईल.. पण याने खरंच आपली निराशा कमी होते? किंवा समूळ जाते? सगळीच माणसे अशा प्रकारे समजावत नाहीत म्हणा काही मित्र त्याच्यावर उपाय सांगतात तर काही suggestions देतात. परफेक्ट suggestion किंवा उपाय मिळाल्यावर आपल्याला सुद्धा बरं वाटत. पण नेहमी असं होत नाही किंबहुना खूप कमी वेळा असं घडत.

आयुष्य किती सुंदर आहे आणि ते जगताना त्याच्या संकटांना सामोरं जाण्यात पण एक मजा आहे हे अशा लोकांकडे बघून आपल्याला जाणवत. त्यामुळे आपल्याला असा अवलिया बनायला जमेलच असं नाही पण त्यासाठी प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. नेहमी असं नाही, पण कधीतरी एका situation मध्ये जरी आपल्याला असा अवलिया बनता आलं तर कितीतरी निराश, दुःखी माणसांना आपल्याकडे बघून जगायची नवी उमेद मिळू शकेन.

निरीक्षण केला असता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल लहान बाळ असत त्याला आपण दिवसभरात भरपूर सूचना करत असतो, खूप काही चांगलं शिकवायचा प्रयत्न करत असतो, पण तरी ते बाळ बऱ्याच वेळा ऐकत नाही पण तीच गोष्ट एखाद्या मोठ्या माणसाला करताना बघतात तेव्हा मात्र ते पटकन शिकतात, म्हणूनच असं म्हणतात की लहान मुले ही अनुकरणशील असतात.

पण ही वृत्ती माणसाची फक्त लहान असतानाच असते असं नाहीए बरं का? बऱ्याच गोष्टी आपण मोठे झाल्यावर सुद्धा बघून, समजून भोवतालच्या परिसरातून आत्मसात करत असतो.आपण खचलेले असताना, कसलीच आशा नसताना देखील हसतमुख, आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याचा माणूस बघून आपल्याला नवी उमेद येते, आशावादी वाटत.

काही माणसांच्या नुसत्या सहवासाने देखील मनातली निराशा जाऊन एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्यात येतो. तसंच हसत मुख राहायचा आपण ही प्रयत्न करू म्हणजे अशाच एखाद्या निराशेत असलेल्या माणसाला देखील आपल्याकडे बघून जगण्याची नवी उमेद मिळेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!