Skip to content

त्रास होत असेल, वाईट वाटत असेल तर या ६ गोष्टी कराच!!

त्रास होत असेल, वाईट वाटत असेल तर या ६ गोष्टी कराच!!


मयुरी महेंद्र महाजन


त्रास नको असला तरी त्रास हा कधी ना कधी होतच असतो, खूपदा दुखावलेले मन आणि भरून आलेल्या भावना मोकळ्या होणे फार गरजेचे असते, बऱ्याच गोष्टींचे वाईट वाटत असेल ,

तर आपला हा त्रास आणि वाईट वाटत असण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात जेणेकरुन त्रास न होता,अधिकाधिक छान वाटेल, सर्वात अगोदर आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की त्रास नेमका कशासाठी होतेय, त्यामध्ये शारीरिक त्रास होत असेल तर आपण लगेच त्या दुखण्यावर डॉक्टरांकडून उपचार घेतो आणि तो त्रास कायमचा दूर व्हावा यासाठी प्रयत्न करतो परंतु आजही काही ठिकाणी मानसिक त्रास होतो हे मान्यचं होत नाही…

त्याला एक तर देवाचं असतं, किंवा तो सायको आहे, अशी पदवी देऊन त्या व्यक्तीकडे कुठल्याही परिस्थितीत त्याची परिस्थिती बदलू शकत नाही असा विश्वास दिला जातो ,हे सर्व त्या व्यक्तीच्या आजुबाजुच्या लोकांमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये बोलल्या जातात त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासातून ती व्यक्ती स्वतः त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असली तरी इतरांनी त्याबद्दल दाखवलेला अविश्वास त्या व्यक्तीला कुठेतरी मागे खेचत जातो….

जसे आपल्या शरीराचे त्रास असतात तसेच मनाचे सुद्धा त्रास असतात, ते कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतात ,आणि विशेष म्हणजे त्रास कसलाही असला तरी त्यावर उपाय सुद्धा आहेत, शारीरिक त्रास आसला जर आपण त्याकडे नाही बघितलं तर ते वाढत जाऊन हाताबाहेर जाण्याची शक्यता असते ,

परंतु मानसिक त्रासाच्या बाबतीत सुद्धा व्यक्ती दमन करत करत तो त्रास हाताबाहेर निघून जातो तेव्हा कुठे त्या त्रासासाठी वाच्यता करतो, किंबहुना बरेच जण त्रास होताय या गोष्टीला मान्यचं करत नाही स्वतःचा होणारा त्रास स्वीकारता न आल्यामुळे होणाऱ्या त्रासाशी पूर्णतः त्या व्यक्तीला लढा द्यावा लागतो आणि जेव्हा या लढ्यात व्यक्तीला मार्ग दिसत नाही तेव्हा व्यक्ती इतरांकडून मदत घेण्यासाठी तयार असतो,

पण आपण माणूस आहोत ,मन भावना आपल्याला आपल्या माणसांशी जोडून ठेवतात आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे मानसिक आधाराची गरज भासतेचं,… त्यात आपण कुणीच कमीपणा मानू नये ….येथे पक्षी आणि प्राणी सुद्धा एकमेकांना आधार देत असतात आपण तर साधी माणस आहोत ,भगवंताने आपली रचना करत असतानाच आपल्याला एकमेकांचा आधार बनता येईल ,अशा पद्धतीने केलेली आहे… त्रास होत असेल वाईट वाटत असेल तर आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात…

1 -ज्या गोष्टीचा आपण स्वतःला त्रास करून घेतलेला आहे त्यासाठी त्या गोष्टीची आपण काही वेळ ठरवलेली आहे का???? कारण कुठल्या गोष्टीचा किती वेळ त्रास करून घ्यायचा याचा काही अंदाजच नसतो गोष्ट होवून सहा महिने एक वर्ष उलटून जाते तरी त्या त्रासातून आपण स्वतःची सुटका करत नाही जे की आपण स्वतः करू शकतो ….

2 -मान्य आहेत काही त्रास खूप जिव्हारी लागलेले असतात आपल्या प्रिय व्यक्तचे आपल्याला सोडून जाणे परंतु एक लक्षात घ्या आपल्याला आपली प्रिय व्यक्ती फक्त शरीराने सोडून गेलेली असते ज्यांचे प्रेम मिळाले त्यांचे विचार आणि ती माणसे कायम आपल्यासोबत असतात विचारांचा वारसा हक्क आपण पुढे घेऊन जातो त्यांचा त्या रुपाने…

3 – बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींचे खूप वाईट वाटते आपण काही चुकीचे नसलो तरी चुकीचे ठरवले जातो त्यासाठी वाईट वाटते बऱ्याच गोष्टींची मनात खंत असते होणाऱ्या त्रासाला वाईट वाटत असलेल्या गोष्टीला आपण कधी आपली स्वतःची भूमिका देतच नाही जर आपल्याला वाईट वाटत असेल तर याचा अर्थ आपण माणूस आहोत आपल्या मनाला ते पटलेले नसते तात्पुरते वाईट वाटणे स्वाभाविक आहे परंतु त्यातच अडकून राहणे तुमच्या नवीन त्रासाला आमंत्रण देण्यासारखे आहे….

4 – ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टींचा परत परत विचार करू नका आणि परत परत बोलून त्यांचा तोंडी पाढा करू नका अन्यथा ज्या गोष्टी विसरायच्या असतात त्या गोष्टी लक्षात राहतात आणि प्रयत्न करून सुद्धा आपण त्या विसरू शकत नाही कारण मला ही गोष्ट विसरायची आहे …याचा तुम्ही जितका प्रयत्न करणार ती गोष्ट तितकीच जास्त आठवणीत राहणारं असते …

5 – त्रास होत आहे ही गोष्ट आपण सर्वांत आधी स्वीकारायला हवी अन्यथा, मला कसला त्रास मला कुठला त्रास नाही असे बजावून आपण दुसऱ्यांना सांगतो पण आपल्याला माहिती असते आपल्याला काय त्रास होतोय ते त्यासाठी आधी त्याचा स्वीकार करा…

6 – होणाऱ्या त्रासाची भरपाई आपण स्वीकारल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढण्यासाठी आपण आपसूकच प्रयत्न करू शकतो त्यामध्येच अन्य कुठल्या कामांमध्ये मन रमवा आपले छंद जोपासा यांनी आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होता , याचा विसर पडतो आपण नेहमी आपल्या भविष्य पेक्षा वर्तमानात जगायला हवं झालेला भूतकाळ आठवू नका उद्याचं भविष्य काय असेल याची चिंता करू नका परंतु आजचा वर्तमान कसा छान करता येईल यावर लक्ष असू द्या बघा जगण्यात त्रासापेक्षा आनंदाचीच भर पडेल यात शंका नाही काळजी घ्या आपला त्रास आपणच वाढवायचा नसतो कधीच…..!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!