Skip to content

आपला होणारा अपमान आपणच टाळू शकतो, वाचा कसे..!!

आपला होणारा अपमान आपणच टाळू शकतो, वाचा कसे..!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


अपमान…….बापरे बाप…! अपमान हा शब्द जरी उच्चारला तरी डोकं सूर्यासारखं तप्त व्हायला सुरुवात होते. मन , मेंदू नी बुद्धीला हा शब्दच नकोसा वाटतो.जन्मोजन्मीच त्यांच वैर असावं असच वाटतं.मनाला हा अपमान सहन होत नाही , बुद्धीला तो पटत नाही नी मेंदूला तो खूप त्रासदायक वाटतो.मेंदूतल्या नसा क्षणात इकडच्या तिकडे होतात.पहा , किती विचीत्र असतो हा अपमान…!

आयुष्यात विविध प्रकारच्या व्यक्ती असतात. अपमानाच्या बाबतीतही तसच आहे. कुणी इतरांचा अपमान करतं तर कुणी स्लतःचाच अपमान करून घेतं…इतकच नाही तर कुणी अपमान सहन करत बसतो तर कुणी त्याच अपमानाला सडेतोड उत्तर देतो.आणि याहीपेक्षा वेगळं म्हणजे कुणी या अपमानाला एखाद्या विशिष्ट कृतीद्वारे अगदी समर्पक असं उत्तर देत असतं. कदाचित तो एखादा असामान्य माणूसच असावा…!

खरतर आयुष्यात इतके प्रसंग सगळ्यांनीच पाहिले असतील , अनुभवले असतील की अपमान कसा होतो…? अपमान करायला आणि व्हायला कितीसा वेळ लागतो..? अपमान करण्याच्या पद्धती , हेतू हे सगळं आपण जाणत असालच. इतका दांडगा अनुभव कदाचित सगळ्यांना असेलही. इतकच नाही तर अपमान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही वाक्य तुम्ही जरूर ऐकली असतील.

जसे की , “तुझा असा अपमान करीन नं…, की आयुष्यभर लक्षात ठेवशील…” , “नाही तुझा भर चौकात अपमान केला तर…..” , “मला संधी मिळेल तेव्हा , आणि संधी निर्माण करून उठता-बसता , येता-जाता तिचा/त्याचा अपमान करेन “…..पहा , वगैरे वगैरे अशी वाक्य आपण सहजच ऐकली असणार यात शंका नाही. अपमान करायला कदाचित कुणाला आवडत असेलही पण अपमान करून घ्यायला मात्र इथे कुणालाच आवडत नाही.

अपमान कितीही छोटा नाहीतर मोठा असुद्य..तो सहन होत नाही. कणभर अपमान झाला तरी आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. काहींच्या मनात राग , चिड अक्षरशः संताप उठतो तर काही जणं अपमान गिळून गप्प बसलेले असतात.काहीजणं समोरासमोर अगदी त्या अपमानाला सडेतोड उत्तर देतात.पण अपमानाचा असा बदला घेण्यापेक्षा किंवा शांत बसण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपण काही दाखवलं तर तोच अपमान कदाचित होणार नाही. किंवा त्याची शक्यतासुद्धा मिटलेली असेल.

मित्रांनो , अपमान तर हल्ली कोणत्याही कारणावरून होतो.पण मग असा किती दिवस स्वतःचा अपमान करून घ्यायचा… स्वतःला काही मानमर्यादा आहेत की नाही…? स्वतःचं काही अस्तित्व आहे की नाही…? नक्कीच आहे आणि असायला हवं…. आपल्याला अपमान टाळता येत नाही म्हणून समोरचा आपला अपमान करतच राहणार… पण मग अशा वेळी असा पावलोपावली होणारा अपमान टाळणं हे आपल्याच हातात असतं हे कित्येकांना समजत नाही.आपण आपला होणारा अपमान हा टाळू शकतो.आणि तो टाळणसुद्धा आपल्याच हातात असतं.आता कसं ते आपण पाहूयात——

(अनेकजण असही म्हणतात , “मला अपमान करायची अजिबात हाउस नाही पण तुझ्या अशा वागण्यामुळे मला तुझा अपमान करणं भाग पडलं…” )त्यासाठीच…..

१) शब्दांची ताकद खूप असते. शब्द म्हणजे एक प्रकारे धारदार शस्त्रच आहे. त्यामुळे एखाद्याशी बोलताना , संवाद साधताना शब्द जपून वापरा.जेणेकरुन इतरांचा त्रास होणार नाही आणि इतर लोक तुम्हालाही त्रास देणार नाहीत.

२) अनेकदा आपला अपमान हा आपल्या वागण्यावरून केला जातो त्यामुळे आपलं वागणं अर्थात ‘Behaviour’ हे मुळातच असं ठेवा की समोरच्याला अपमान करायला एकही संधी मिळणार नाही.

३) जिथे अपमानास्पद वागणूक दिली जाते त्या लोकांच्या सानिध्यात , सहवासात आपला वावर शक्य तितका होईल तितका कमी करावा.

४) हल्ली लोकं कशावरूनही अपमान करतात.अगदी कपड्यापासून ते चपलेपर्यंत अपमान करणारी अनेक लोकं आपल्या भोवताली असतात.त्यामुळे आपण आपल्यानुसार आपलं राहणीमान स्वच्छ ठेवावं. अगदी “Simple living , High thinking” यानुसार वागलं तर अपमानाला जागाच मिळणार नाही.

५)स्वतःची ability इतकी strong बनवा की कुणी आपला अपमान करताना शंभर वेळा विचार करेन.

६)प्रत्येकवेळी सहन करायला शिकू नका..एखाद्याला समर्पक उत्तर द्यायला शिका.म्हणजे समोरच्याला लगाम बसेल.

थोडक्यात , आचार-विचार , नीतीमत्ता , वागणं-बोलणं या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आपला होणारा अपमान टाळायला शिका.या गोष्टी आपल्याच हातात असतात. त्यामुळे सहजासहजी कुणाला आपला अपमान करू देऊ नका आणि इतरांचाही अपमान तुम्ही करू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपला होणारा अपमान आपणच टाळू शकतो, वाचा कसे..!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!