Skip to content

पुष्कळ वेळेस स्वतःची योग्य दिशा शोधणंच ‘Better’ असतं…

पुष्कळ वेळेस स्वतःची योग्य दिशा शोधणं ‘Better’ असतं…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


दिशा….पूर्व-पश्चिम,दक्षिण-उत्तर अशी कोणती आपली ,आपल्या आयुष्याची विशिष्ट दिशा आहे का…? मुळातच आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा माहीत नसते. आपलं आयुष्य हे सरळमार्गी चाललेलं असतं.म्हणजे रोज जे चाललय तेच अगदी तसच घडत असतं.त्याला विशिष्ट अशी काही दिशा नसते.खरतर स्वतःला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा अट्टहास हा स्वतःलाच जमला पाहिजे.

अनेकदा आपण एकाच गोष्टीत गुंतून पडतो पण इतर गोष्टी आहेत हे मात्र विसरून जातो. स्वतःला काय करायच हे माहीत नसतं किंवा माहीत असून ते कसं करायच हे समजत नसतं.कितीदा तरी आपण एखाद्या विश्वात इतके भरकटतो की त्याची सीमा काही विचारायलाच नको.एकदा का माणूस भरकटला तर त्याला आहे पूर्वावस्थेत आणणं तसं कठीणच… पण तरीसुद्धा अशावेळी अनेकदा स्वतःची योग्य दिशा शोधणं ‘Better’ आणि तितकच ‘must’ असतं.

सध्या तरी कितीतरी अधिक प्रमाणात लोकं ही आर्थिक कोंडमाऱ्यात नी प्रेमाच्या विश्वात भरकटताना आढळतात.इतरही गोष्टी आहेत पण सद्यस्थिती पाहता या दोन गोष्टींमध्ये माणूस जास्त भरकटताना दिसतोय.इतकी भरकटतात ही लोकं की त्यांना आजुबाजूला काहीतरी आहे याचा अगदी सहजपणे विसर पडतो. मला वाटतं पुष्कळ वेळांमधली हीच ती एक वेळ असावी जिथे स्वतःची योग्य दिशा शोधणं गरजेचं आहे.

कारण या वेळेस जर दिशा शोधली नाही तर काही गोष्टी खरच खूप अवघड होऊन जातात. तरुण-तरूणी प्रेमात इतके गुरफटतात की त्याच प्रेमाचा भंग झाल्यावर ते अक्षरशः भरकटतात.एखाद्याला लावलेला जीव असतो तो हे मान्य परंतु जेव्हा पदरी निराशा येते तेव्हा अगदी वेळेवर स्वतःसाठीच योग्य दिशा शोधणं ‘better’ असतं.इथे प्रत्येकाला एकच सांगणं आहे की प्रेम म्हणजे सगळ काही नसतं…

प्रेमाव्यतिरिक्त इतरही विश्व असतं हे आपण विसरता कामा नये.प्रेमात असं नैराश्य आलं की आपण जगण्याच्या दिशा विसरून जातो. करिअर , स्वप्न या सगळ्या गोष्टी मागे पडत जातात.त्यामुळे वेळीच स्वतःला शोधणं खूप महत्त्वाच आहे.पैसे म्हणजेच सर्वकाही असही नसतं.जगायला ,पोटापाण्यासाठी पैसा लागतो अगदी मान्य…पण पैसाच सर्वकाही नाही. त्या पैशाच्या मागे धावताना जिथे पैसा दिसेल तिथे वेगाने आपण धावत सुटतो.

पण आपली आवड , छंद यांचा कल कुठे आहे हेही विसरतोच. केवळ प्रेम आणि आर्थिक कोंडमारा इतकच नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या की कधी कधी आपल्या दिशा भरकटण्याला आणि गवसण्याला जबाबदार असतात. कधी कधी वाटतं एखादी वाट चुकल्याशिवाय स्वतःची योग्य दिशा सापडत नाही. त्यामुळे वाटा चुकणही आवश्यक असतं.पण वाटा चुकल्यावर त्यांना योग्य ‘path’ वर आणणही तितकच ‘important’ असतं.त्यामुळे उठा , सज्ज व्हा स्वतःची योग्य दिशा शोधायला……..

बोलणारे नेहमीच काही ना काही बोलत असतात.लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची त्यांची घाणेरडी सवयच असते.त्यामुळे आपल्या आयुष्यात कितीही खळबळ माजूद्या पण लोकांना त्यासाठी बोलण्याची एकही संधी देऊ नका.त्यासाठी त्यावेळी स्वतःची दिशा शोधायला सुरुवात करा.आपण कुठे असायला हवं , काय करायला हवं..?याचा अगदी बारकाईने विचार करा.

कारण अशावेळी हे शोधणच ‘much better’ असतं.इतरांकडे लक्ष द्यायच की स्वतःवर लक्ष केंद्रित करायच हे आपलं आपण ठरवायच असतं.आपल्यातल्या कलागुणांना , सुप्तगुणांना वाव देऊन त्यांना दिशा दाखवणं हे आपलच काम आहे आणि ते आपणच पूर्णत्वाला नेलं पाहिजे. कारण त्यातूनच आपलं पुढील आयुष्य घडणार असतं.मित्रांनो , आयुष्य हे काही एक ‘comfort zone’ नाही. आपलं आयुष्य हे खूप मोठ्ठ आहे. तिथे असंख्य गोष्टींचा समावेश होतो.

त्यातील एक योग्य दिशा आपण निवडायची असते , शोधायची असते.कारण स्वतःसाठी दिशा शोधली तर आयुष्यातील कितीतरी समस्या दूर व्हायला मदत होते. ही दिशा शोधताना स्वतःची जडणघडणसुद्धा तितकीच मजबूत होते. आणि स्वतःची योग्य दिशा शोधणं किती आवश्यक आहे याचीही जाणीव स्वतःला होते. So…जगात काहीही होऊद्या…आपण आपली योग्य दिशा शोधायला विसरू नका…

कारण कधी कधी वेळ कळत नाही की कधी आणि कशी दिशा शोधायची…..?म्हणून जेव्हा संधी मिळेल , वेळ मिळेल तेव्हा स्वतःची योग्य दिशा शोधायला निघा…आणि इतकच नाही तर स्वतः संधी निर्माण करा आणि आयुष्याची दिशा शोधून काढा….आयुष्य सुखकर होईल….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!