Skip to content

काल्पनिक भीती आणि वास्तव भीती या दोघांमधला हा फरक तुम्हांला माहितीये का?

काल्पनिक भीती आणि वास्तव भीती या दोघांमधला हा फरक तुम्हांला माहितीये का?


सोनाली जे


भीती ही एक मनाची संवेदना आहे. भावना आहे. आपण अनेक गोष्टींना घाबरतो ती भावना म्हणजे ही भीतीच. कधी ही भीती व्यक्ती सापेक्ष , परिस्थिती सापेक्ष , आरोग्य सापेक्ष अशी विविध प्रकारची असते.

काल्पनिक भीती :

मन चिंती ते वैरी न चिंती..

जी अस्तित्वात नाही पण आपण केवळ त्याची कल्पना करूनच आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते. मनात असुरक्षिततेच्या भावना निर्माण होतात. . आता रोज करोना चे वाढते रुग्ण त्या विषयी माहिती बघितली की मनात एक काल्पनिक भीती निर्माण होते आणि बाहेर पडलो तर आपल्याला corona होईल का ही अस्तित्वात नसलेली मनातली भीती निर्माण होते.

काल्पनिक भीती मुळे आपल्याला झोप , तहान , भूक , अस्वस्थता , कधी आत्मविश्वास कमी होणे , असुरक्षितता , चिंता याचा सामना करावा लागतो. चिंता ही भीतीची बहीण च आहे. मी अभ्यास केला आहे , मला paper मध्ये लिहिता येईल का ? मी विसरणार तर नाही ना ? Paper झाल्यावर ही यश मिळेल का ? पास होईन का ? ही काल्पनिक भीतीच तर आहे.

एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो. त्या व्यक्तीचे ही आपल्यावर जीवपाड प्रेम असते. परंतु कधी तरी असे प्रसंग घडून जातात. कधी काही वाद , कधी विश्वास कमी होतो. एखादी व्यक्ती त्या व्यक्तीच्या ही अजून तेवढीच जवळची असते. यात आपण जवळचे आहोत हा possessiveness असतो परंतु दुसरी व्यक्ती ही तितकी जवळची असेल आणि अनेकदा आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असले आपल्या व्यक्तीकडून तर आपली व्यक्ती आपल्यापासून दूर जाते आहे.. तिच्यापासून दूर आपण राहूनच शकत नाही .. या सगळ्या कल्पनाच तर आहेत. ही भीतीच तर आहे ना!!

लहान पणी आपल्या मोठ्यांनी रात्रीचे , अंधारातून जावू नये असे सांगितले असते ..पण आपण त्याचे कारण कधी समजून घेतले नसते किंवा त्यांनी आपल्याला ते सांगितले नसते. त्यामुळे अंधाराची भीती निर्माण होते. आपल्याला काही वेळेस एका खोलीतून दुसऱ्या खोलीत अंधारात जाताना ही भीती वाटते. ही काल्पनिक असते. अंधारात , रात्रीचे जावू नये याचे कारण काय असते तर फारसा उजेड नसतो, दिसत नाही पटकन , काही किडा, मुंगी असेल ते दिसत नाहीत आणि चावण्याची शक्यता असतें .

म्हणून खरे तर काळजी पोटी अंधारात जावू नये असे वडीलधारी सांगत असतात. पण त्याची काल्पनिक भीती आपल्याला एवढी बसते की आपण कायमच अंधारात जायला घाबरतो. रात्री घरात एकट असलो तरी लाईट लावून झोपणार. याकरिता कारण समजून घेतले तर ही अंधाराची काल्पनिक भीती ही दूर होईल. आणि काळजी घेवून चांदण्या रात्रीची, शीतल चंद्र प्रकाश याची मजा ही घेता येईल.

युद्धात सैन्य लढत असताना त्यांचा सेनापती मारला गेला तर बाकीचे सगळे सैन्य सैरावैरा होवून पळ काढण्याचा प्रयत्न करते कारण आता सेनापती च नाही तर आपण युद्ध हरणार , आपण मारले जाणार ही काल्पनिक भीती. या उलट सैन्य जर एकजूट होवून शर्थीने लढले तर ते जिंकण्याची शक्यता ही असते. परंतु आपला म्होरक्या मारला गेला यातून मनात असुरक्षितता निर्माण होते आणि आपण ही मारले जावू किंवा आपण आता हरणार ही काल्पनिक भीती निर्माण होते.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी relationship मध्ये कोणत्या गोष्टीने वाद झाले तर , अभ्यास करून ही अपयश मिळेल का याची चिंता , असुरक्षितता, कधी काही छोटे आजार असतील तरी आपल्याला खूप काही झाले आहे आणि आता आपण जगणारच नाही . ही काल्पनिक भीतीच झाली. भविष्यात आपले काय होईल ,इंटरव्ह्यू ला जाताना काय विचारतील आणि आपण select नाही झालो तर ही काल्पनिक भीतीच तर असते.

काल्पनिक भीती कमी करायची असेल तर चुकीच्या कल्पना नष्ट करायला पाहिजेत. असुरक्षिततेची भावना दूर केली गेली पाहिजे मग ती कधी आपण मनावर नियंत्रण ठेवून तर कधी समोरच्याने आपल्याला त्याच्या कायम साथ असण्याविष्यी विश्वास देवून , पटवून देवून , तशी कृती करून , किंवा आपल्या व्यक्तीची आपल्याला ही किती गरज आहे , आपले ही किती प्रेम आहे याची जाणीव करून देवून ही असुरक्षिततेची काल्पनिक भीती , भावना दूर करता येवू शकते.

वास्तव भीती : जे प्रत्यक्षात असते. वास्तव अनुभवत असतो. त्याला वर्तमानात कसे तोंड द्यायचे , पुढे जावून भविष्यात काय होईल ही भीती निर्माण होते.

घरात चोर शिरला आहे. आपण बघितले आहे तर वास्तवात असलेल्या चोराची भीती वाटणे साहजिक आहे आणि ही वास्तविक भीती असली तरी या भीतीने खचून न जाता त्यात त्याही बिकट परिस्थिती मध्ये लगेच मार्ग शोधून काढणे गरजेचे असते. जसे चोराला बघून आपल्या घरच्यांना हळूच जागे करणे, पोलिसांना गुपचूप फोन करने , शेजारी कळविणे, अगदी काही झाले नाही तर आरडा ओरडा केला तरी चोर घाबरून पळून जातो.

प्रत्यक्षात समोर जे संकट उभे आहे त्याची भीती आणि त्यात मार्ग कोणता आणि कसा काढणार याची भीती म्हणजे वास्तविक भीती.
जसे की corona झालेला खूप serious असलेला पेशंट आपण जगू का नाही , यातून वाचू शकू का याची वास्तव भीती असते.

गाडीचा मोठा अपघात झाला आहे आणि जबरदस्त ,मार लागला आहे. , हाताला गंभीर दुखापत , डॉक्टरनी ऑपरेशन सांगितले आहे आणि आपल्याला कदाचित हात गमवावा लागणार या वास्तवाची जाणीव त्यांनी करून दिली आहे. आणि हात गमवावा लागला तर आपल्या मनात आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार , दैनंदिन काम करताना आपल्या वर मर्यादा येणार , आपण पूर्वी जी गोष्ट सहज करत होतो ती आता तेवढ्या सहज करू शकणार नाही किंवा करूच शकणार नाही ही वास्तव भीती झाली. वास्तवाचा स्वीकार करून त्यातून पुढे आपल्याला काय काय अडचणी येतात , येतील या वास्तव गोष्टी आपल्याला भीती निर्माण करतात.

आर्थिक घडी , कौटुंबिक घडी बसलेली असताना ,चुकीने जर व्यवसायात आर्थिक तोटा झाला तर आपल्याला नुकसान होण्याची भीती परंतु ती भीती बाळगून तो व्यवसाय लगेच बंद करणे असे नाही ना तर परत आपण तो व्यवसाय करताना वास्तवात काय झाले याचा विचार करून चुका सुधारल्या तर ती व्यवसायाची भीती ही दूर होते. वास्तवात जोडीदाराशी पटत नाही म्हणून घटस्फोट घेतला तर मुलांची आणि आपली जबाबदारी पार पाडताना येणाऱ्या अडथळ्यांची भीती ही वास्तव भीती.

भीती चेच रूपांतर , चिंता , काळजी यात होते, मग कधी झोप उडते, कधी heart beats वाढतात. Palpitation, हृदयाची धडधड वाढते. अस्वस्थता वाढते. काही वेळेस आत्मविश्वास कमी होतो. असुरक्षितता ही भावना वाढीस लागते. आणि कधी काम करताना बरोबर करतो आहे का ही भीती.. जर तसे झाले तर येणारे काम ही बिघडण्याची शक्यता असते. आपले concentration ही चलबिचल होते. कामावर परिणाम होतो.

भीतीवर कंट्रोल , नियंत्रण मिळवायचे असेल तर नक्की कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे लक्षात घ्या. आणि ठरविले तर , जिद्दीने केले तर अशक्य गोष्ट कोणतीच नसते. हे जमेल का , कसे करणार ही भीती असेल , पास होणार का अशी भीती असेल तर त्या भीती वर प्रयत्नपूर्वक मात करणे गरजेचे असते.

पास होणारच या करिता भरपूर अभ्यास करून कधी ही परीक्षा दिली , घेतली तर सर्व येते हा अभ्यास तुम्हाला परीक्षेची आणि पास होण्याची भीती दूर करण्यास मदत करते.

तसेच अपयश त्याची भीती असेल तर आपले knowledge वाढविणे, अनुभव घेणे तो वाढविणे , नवीन स्किल शिकणे , develop करणे यातून तुमचा आत्मविश्वास ही वाढेल आणि तुमच्या ज्ञान , अनुभवाच्या जोरावर भीती पळून जाईल. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे..
कायम लक्षात ठेवा आयुष्य सुंदर आहे . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा , मग बघा भीती वर मात करून परिपूर्ण आणि सुंदर आयुष्य जगता येते.

साप साप म्हणून रस्सिला ही भिवू नका. तर प्रत्यक्ष साप समोर असला तरी भीती वर मात , नियंत्रण ठेवून त्यातून मार्ग शोधा. कधी तरी त्या सापाला काही ही न करता , आपण नुसते शांत , स्थिर , स्तब्ध राहून ही तो त्याच्या वाटेने आपल्या काही न करता जावू शकतो. तुम्ही त्रास दिला नाही तरी मग तो ही देणार नाही.

कधी फणा उगारून डसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापावर आपल्या भीतीवर मात करून , परिस्थिती नुसार निर्णय घेवून काठीचा प्रहार करून मारून आपल्या भीतीवर नियंत्रण मिळविता येते. तर कधी सर्पमित्र त्यांना बोलावून ते पकडुन घेवून जंगलात सोडून देवून साप त्याचा
जीव ही वाचवितात.

आपण भीती कशाची घेतली तर साप नाही पण सापाच्या चावण्याची , त्याच्या विषारीपणांची , थोडक्यात व्यक्ती त्या गोष्टीला भित नसतो तर त्याच्या परिणामांना भित असतो. म्हणून परिस्थिती , मन , भावना आणि भीती कशाची जाणून त्यातून मार्ग काढा.

आयुष्य सुंदर आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपली भीती दूर करून निर्धास्त आणि आनंदाने जगा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “काल्पनिक भीती आणि वास्तव भीती या दोघांमधला हा फरक तुम्हांला माहितीये का?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!