अवास्तव अपेक्षा माणसाला जास्त लवकर थकवतात.

अवास्तव अपेक्षा माणसाला जास्त लवकर थकवतात.


सोनाली जे.


अवास्तव अपेक्षा म्हणजे काय ? ज्या आपल्या कुवती बाहेर असतात त्या अपेक्षा ..किंवा ज्या अपेक्षा , गोष्टी पूर्ण करण्याकरिता आपल्याला खूप प्रयत्न , कष्ट करावे लागतात त्या . कधी त्या पूर्ण करू शकतो तर कधी एवढ्या अवास्तव असतात की त्या कधीच पूर्ण करू शकत नाही. अवास्तव अपेक्षा वास्तवात येवूच शकत नाहीत अशा ही असतात. काही अवास्तव अपेक्षा या व्यक्ती सापेक्ष , परिस्थिती सापेक्ष , वेळ , काळ , स्थळ सापेक्ष असतात.आणि याच अवास्तव अपेक्षा माणसाला जास्त लवकर थकवतात.मानसिक दृष्ट्या आणि कधी शारीरिक दृष्ट्या ही.

लहान असताना आपल्याला अनुभव नसतात. आणि आपले पालक आपल्या गरजा पूर्ण करत असतात. आपल्या करिता कपडे असतील , खेळणी असतील , वह्या पुस्तके , खाणे पिणे या सगळ्या गोष्टींची ते काळजी घेत असतात. त्यामुळे आपल्याला काही चिंता नसते. किंवा त्या गोष्टी सहज मिळत जातात त्यामुळे त्याची जाणीव ही नसते.

पण मोठे होवू लागतो तसे अनेकदा बरोबरच्या मुलांकडे गोष्टी असतात त्या बघून आपल्याला ही त्या घेण्याची इच्छा होते . शक्य असतील तर त्या ही पालक पूर्ण करतात पण अशक्य , अवास्तव असेल तर त्या पूर्ण करणे शक्य नसते किंवा मग पालक त्या करिता रात्रंदिवस कष्ट करतात. आहे ते काम शिवाय अजून जास्त काम करून त्यातून शारीरिक थकवा , मानसिक थकवा ही येतो.

३ idiots मधल्या फरहान चे उदाहरण आपण सगळ्यांनी बघतीलेच आहे की त्याचे पालक त्याला फोटोग्राफी ची आवड असताना ही त्याची आवड लक्षात न घेता ही त्याला engineering च करायचे अशी अवास्तव अपेक्षा ठेवतात आणि मग ती पूर्ण करण्याकरिता फरहान त्याचे liking नसताना नाईलाजाने engineering करु लागतो.

पण मग त्याला पास होईल का याची खात्री नसते. अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्याकरिता आवडत्या गोष्टींचा त्याग करणे आणि अवघड अभ्यास त्याकरिता मेहनत घेवुन ही , अभ्यास करून ही पास होण्याची शक्यता वाटत नसते. तर कधी काठावर पास ..म्हणून नावडत्या गोष्टी करताना आवडत्या गोष्टीचा त्याग आणि अवास्तव अपेक्षा पूर्ण कराव्या लागत असतात म्हणून ही मानसिक थकवा येतो. आत्मविश्वास कमी होतो.

असेच आहे लता मंगेशकरांनी क्रिकेट खेळावे ही अवास्तव अपेक्षा ठेवली असती तर लता मंगेशकर एवढ्या सुप्रसिद्ध गायिका होवू शकल्या असत्या का ? नाही ना ! ही काही उदाहरण झाली.

असेच आपण ही अनेक वेळा स्वतः कडून , इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवत असतो. कधी मैत्री असेल , कधी नात्यात , तर कधी relationship मध्ये असेल तर कधी नवरा बायको यांच्या नात्यात , कधी पालक आणि मुले यांच्यात समोरच्याने कायम आपल्याच म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे. आपण सांगू तीच पूर्व दिशा.

या अवास्तव अपेक्षा च ना !! कसे शक्य आहे त्या कायमच पूर्ण करणे. कायमच समोरच्याला समजून घेणे , किंवा समजून सांगणे हे कसे शक्य आहे. कधी तरी त्याचे त्याला समजू देत असे वाटणारच ना.. किंवा त्याने कधी तरी आपल्याला समजून घेवून वागावे असे वाटणारच ना!!! हे त्या समोरच्या व्यक्तीला ही त्याची मते , विचार आहेत. मग आपण कोण त्याच्या वागण्यावर , बोलण्यावर, विचारांवर बंधने घालणार ? आणि जर असेच कायम करत राहिलो आपल्या या अवास्तव अपेक्षा पूर्ण करताना निश्चित च वैताग येणार, थकवा येणार.

आधीच लग्न झालेल्या मित्राकडून त्याच्या जवळच्या मैत्रिणीने तो आवडतो तिला म्हणून तिच्या बरोबर लग्न करावे ही अवास्तव अपेक्षा च ना ?? आणि ही अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्याकरिता त्या मैत्रिणी ने आपल्याच मित्राला त्रास देणे , अट्टाहास करणे किंवा आपल्याला काही करून घेणे ही अवास्तव अपेक्षा मित्र , त्याचे कुटुंबीय आणि स्वतः मैत्रिणी करिता त्रासदायक आणि helpless असल्याची मानसिक थकवा च देणारी ना ??

आता अशाही आपल्या काही अवास्तव अपेक्षा असतात. कॅन्सर ची लास्ट स्टेज आहे आणि अशी अवास्तव अपेक्षा की मला अजून जगायचे आहे , मरण कधीच नको चिरंजीवी राहायचे आहे. यात तुमची इच्छा , अपेक्षा असेल तरी डॉक्टर , मेडिकल सायन्स यांनाही मर्यादा आहेत ना ?? अमर राहण्याची ही अवास्तव अपेक्षा ही कधीच पूर्ण होवू शकणारी नाही ना!!

आणि हीच अवास्तव अपेक्षा ठेवून जे आहे तेही आनंद तुम्ही गमावून बसता ना ?? जे नाही तेच पाहिजे त्याचाच अट्टाहास तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि डॉक्टर यांनाही त्यांच्या मर्यादा सारख्या जाणवून देत असता त्यातून त्यांनाही त्रास. यापेक्षा जेवढे दिवस उरले आहेत ते आनंद सिनेमा मधल्या राजेश खन्ना सारखे आनंदानी , भरभरून जगण्याचा प्रयत्न करा.

स्वतः त्रास , दुःख करून घेण्यापेक्षा आणि इतरांना देण्यापेक्षा प्रत्येक क्षण फुलपाखरासारखे मुक्तपणे , हलके होवून भरभरून जगा. फुलपाखराचे आयुष्य अत्यंत कमी असते. पण त्याचे सुंदर रंगसंगती असलेले पंख फुलवून , कधी या फुलावर तर कधी त्या फुलावर बसून त्यातला गोड मकरंद त्याचा आस्वाद घेत असते ते फुलपाखरु आणि मग स्वच्छंदपणे , मुक्तपणे आकाशात उंच भरारी घेत असते. असे जे थोडे आयुष्य असेल तरी जगण्याचा प्रयत्न केला तर स्वतः ला ही आणि इतरांनाही आपल्या दीर्घ काल जगण्याच्या अवास्तव अपेक्षेमुळे मानसिक थकवा येणार नाही.

Rome was not built in a day.

आज धो धो पावूस पडायला सुरुवात झाली आणि आपण पावसापासून संरक्षण म्हणून आताच्या आता घर बांधायचे आणि तिथे राहायला जायचे आहे , किंवा पक्षांनी ही आता घरटे बांधायचे ठरविले ते आजच्या आज एका दिवसात पूर्ण होईल का ? ही अवास्तव अपेक्षा च झाली ना. त्या करिता आधी पासून प्रयत्न केले असते. घरबांधणी , घरटे बांधणी तर ते शक्य झाले असते. पण आजच्या आज बांधणे ही अवास्तव अपेक्षा झाली ना.!!

भले आजच्या आज बांधायचे म्हणून सुरुवात केली तर भर पावसात मटेरियल गोळा करण्यापासून काम करताना शारीरिक कष्ट हे सोसावे लागणार ते करताना मनाचा संयम , चिकाटी हे लागणारच , पण इतके करून ही ते एका आजच्या दिवसात शक्य नाही म्हणून निराशाच पदरी पडणार ना!! कष्ट करून , मानसिक ओढाताण घेवून , निराशा पदरी पडून शारीरिक आणि मानसिक थकवा च येणार ना !!

काही अवास्तव अपेक्षा ही असतात. ज्या कधीच पूर्ण होवू शकणार नाहीत. जसे अगदी मला आताच्या आता दोन तासात लंडन ला , चंद्रावर , अंतराळात पोहचायचे आहे.. शक्य आहे का ते ? वेळ आणि अंतर , पोहचण्याकरिता साधन उपलब्ध होणे याचा विचार करता ही अवास्तव गोष्ट आहे आणि तिचाच अट्टाहास धरला तर ती त्रासदायक ठरणार च आणि ती पूर्ण होणार ही नाही.

Bang Bang सिनेमा मध्ये हरलिन ..कैटरीना कैफ तिची इच्छा व्यक्त करते की travel .. तिची इच्छा असते. . एक दिन..जॉब कर करके एक around the world टिकिट लेके देखना चाहती हुं!

यात ती शिमला मधल्या छोट्या बँकेत एक अतिशय सामान्य अशी बँक receptionist असते. तिच्यावर आजीची जबाबदारी असते. आई वडील लहान असतानाच accident मध्ये गेलेले. कोणाचा support नाही , आर्थिक मदत नाही , पैसे नाहीत , मग तरी ही ती जग भ्रमण करण्याची अवास्तव अपेक्षा ठेवते. अर्थात तो सिनेमा आहे त्यात तिच्या या अपेक्षा जय ..हृतिक रोशन मुळे पूर्ण होतात पण त्यामध्ये ही किती स्ट्रगल , किती अडचणी , त्रास त्यांना सहन करावे लागतात.

पण अनेकदा अवास्तव अपेक्षा माणसाला त्याच्या ध्येय प्राप्ती मध्ये मदत च करतात, प्रोत्साहित करतात. जिद्दी बनवितात. अरूनिमा सिन्हा यांचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. त्यांना चालत्या ट्रेन मधून गुंडांनी त्यांना ढकलून दिल्यावर त्यांचा डावा पाय काढून टाकावा लागला होता आणि त्यामुळे कृत्रिम पाय बसवावा लागला .

तरीही त्यांची जिद्द म्हणा अवास्तव अपेक्षा म्हणा की एवरेस्ट शिखर चढाई करण्याची .. आणि ती पूर्ण करण्या करिता घेतले ले कष्ट त्या आधी छोटी छोटी शिखरे चढाई करून प्रॅक्टिस मग त्यातून त्या पायावर येणारा भार , त्रास हे सगळे सहन करून , ही त्यांनी अवास्तव अपेक्षा , ध्येय ठेवलेले पूर्ण करण्याकरिता जिद्दीने आणि शर्थीने प्रयत्न केले. Evrest शिखर सर करताना शेवटी त्यांच कृत्रिम पाय त्रास देवू लागला. रक्त येवू लागले तरी हे त्रास सहन करून त्यांनी यशस्वीरीत्या शिखर सर केले आणि कष्टातून , त्रासातून ही अवास्तव अपेक्षा पूर्ण केली. असाध्य ते साध्य करिता सायास !

चांगल्या गोष्टींना मिळविण्याकरिता , ध्येय पूर्ण करण्याकरिता आणि आपल्या मधल्या क्षमता वाढविण्याकरिता या अवास्तव अपेक्षा त्रासातून थकवा जरूर आणतात पण ध्येय प्राप्तीचे सुख , समाधान आणि आनंद ही मिळवून देतात.

आयुष्य सुंदर आहे . अवास्तव वाटणाऱ्या अपेक्षा पूर्ण करताना सहन करावे लागणारे त्रास यातून थकवा आला तरी प्रचंड जिद्द , ध्येय प्राप्ती करिता आपल्यातली शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवा. या अवास्तव अपेक्षा पूर्ण करताना माणसाला जरी थकवा देत असल्या तरी आनंदाच्या परमोच्च बिंदूवर ही घेवून जातात.

हिऱ्याला चमकायचे असेल तर पैलूंचे घाव सहन करावे लागतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.