Skip to content

मृत्यू हे वास्तव स्वीकारणारी व्यक्तीचं जगायला लागते…!

मृत्यू हे वास्तव स्वीकारणारी व्यक्तीचं जगायला लागते…!


सौ.मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणीचौक)


एक दिन बित जायेगा माती के मोल,
जग में रेह जायेंगे प्यारे तेरे बोल””

या गाण्याच्या ओळीं चा अर्थ शोधण्याचा जितका प्रयत्न कराल तितके जगण्याची आणि जगत असलेल्या गोष्टींची जाणीव व्हायला लागेल ,
जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात कधीच नसतात ,परंतु हे सुद्धा तितकंच खरं आहे जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती (जीव) कधी ना कधी संपणारच आहे ,जरी आपल्याला ते स्वीकारायला जड जात असले तरी त्या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही.

माहिती आहे प्रत्येकाला आपला जीव खूप प्रिय आहे ,कुणालाही मृत्यू नकोच आहे, पण तेच अंतिम सत्य आहे माणूस म्हणून जगत असताना या जीवन वाटेवर कितीतरी चढ उतार पार करत मनुष्य जगत असतो, जशी सुरुवात आहे, तसाचं शेवट सुद्धा आहेचं.

बघा म्हणजे जर का समजा एखाद्या आजारी असलेल्या व्यक्तीला जेव्हा डॉक्टरांना नाईलाजाने असे सांगावे लागते की तुमच्या या आजारातून बरे होण्याच्या काही खाणाखुणा दिसत नाही, त्यामुळे तुम्ही आता या पृथ्वीवरचे काही दिवसांचे पाहुणे आहात, फक्त विचार करा या वेळेला त्या व्यक्तीला काय वाटत असेल, त्यांनी आतापर्यंत केलेल्या चांगल्या-वाईट सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागतील.

आणि आता डॉक्टरांनी सांगितले म्हटल्यावर आपल्याला जगण्यासाठी काहीच अवधी राहिलेला आहे, या गोष्टीने त्याला दुःख होणारच आहे, त्यात शंकाच नाही पण जेवास्तव त्याच्या समोर उभा ठाकलेलं आहे ते त्याला स्वीकारावाच लागणार, गंमत अशी आहे की ती व्यक्ती हा सुद्धा विचार करू शकते की डॉक्टरांनी जे काही सांगितले ते खरे असू शकते.

परंतु आता माझ्याकडे जितका पण वेळ आहे त्याला मी मन भरून जगू शकतो ना …!आता मात्र मी खऱ्या अर्थाने जगणार मला खरच परमेश्वराने जे काही आयुष्य दिले त्याची मला कधी जाणीव झाली नाही, पण आता मी माझ्या राहिलेल्या आयुष्याचा एक क्षण सुद्धा वाया घालवणार नाही, जेपण क्षण माझ्या वाट्याला येतील त्यात मी पूर्णपणे माझे योगदान देणार आहे.

आणि हो जर का हीच गोष्ट डॉक्टरांनी माझ्यापासून लपवून ठेवली असती ,फक्त माझ्या नातेवाईकांना सांगितले असते, तर मला माझ्या मृत्यूची कल्पना झालेलीचं नसती, म्हणजे मला माझा मृत्यू माहिती झाला त्यामुळे जर का मी खचत असेल ,तर मी मुनाने आजच मरेलं, ज्या दिवशी माझा मृत्यू होईल त्या दिवशी फक्त माझे शरीर मरेलं, त्यामुळे मला माहिती की माझा मृत्यू निश्चित आहे ,परंतु तोपर्यंत माझ्या समोर असलेलं माझं सुंदर जीवन भरभरून जगून घेण्याचा मी प्रयत्न तर करू शकतो ,

“मरने के लिए एक दिन काफी है थोडा जी तो ले जिंदगी को सामने तेरी जिंदगी खडी है…””

मित्रहो कोरोना सारख्या काळात आपण सर्वांनाच मृत्यूची अनामिक भीती होतीच ,पण कोरोना फक्त निमित्तमात्र खरे प्रयोजन तर आपल्याला आपल्या मृत्यूची आठवण करून देणे हेच होते, कारण मनुष्य जगताना असा जगतो जसे कधी मरणारच नाही ,आणि मरताना असं मरतो जसे कधी जगलाच नाही ,मित्र आयुष्य फार क्षणभंगुर आहे, आयुष्यातले क्षण हातातून निसटून चाललेत जसे हातात धरलेले मोती ..””
“”
जिंदगी एक किराये का घर है एक ना एक दिन तो बदलना पडेगा…””

मनुष्य हा कितीही अभिमानाने जगत असला तरी अंतिम सत्य मातीतील उगवून मातीतच मिसळायचे आहे ,मित्रहो या जगात करोडो लोक होऊन गेलीत, ज्यांना असे वाटत होते की हे जग माझ्याविना कसे चालणार अशी करोडो लोक आली आणि गेली, जिंदगी कभी किसी के लिये नही रुकती…..!

हे जग आपल्याविना पण चालत होतं, आपल्या बरोबर पण चालत आहे, आणि आपल्या शिवाय सुद्धा चालणारचं आहे, राजा असो वा रंक कोणीच यातून सुटलेले नाही काही जणांना रोजचे जगणे कंटाळवाणे रोज काय तेच तेचं असे वाटत असेल पण समजा आपल्याकडे आजचाचं दिवस असेल तर आपण तो किती छान पद्धतीने जगणारं….

त्यासाठी मृत्यू सगळ्यांनाच आहे कोणी अमर होण्यासाठी जन्माला आलेले नाही, परंतु प्रत्येकाचे आयुष्य किती असणार हे ज्याचे त्याचे वेगळे असणार त्यामुळे मृत्यू हे वास्तव आहे ,…आणि हे वास्तव तुम्ही जितक्या लवकर स्वीकाराल, तितक्याच लवकर तुम्ही उत्तम पद्धतीने जगायला शिकणार…..! बघा शाहरुख खानच्या कल हो ना हो मुव्ही मध्ये जसे त्याला माहिती असते आपला अंत निश्चित आहे, तरीसुद्धा तो किती छान पद्धतीने जगत राहतो ”

“हरपल यहाँ जी भर जियो जो हे समा कल हो ना हो ……!
त्यामुळे प्रत्येक क्षणामध्ये आपले अनमोल असे जीवन भरभरून जगायला शिका….!
“” अपना हर दिन ऐसे जियो जैसे की आखरी हो …..!”””

जन्माला येतानाच आपण आपल्या मृत्यूची गाठ बांधूनच आलेलो असतो मित्रांनो हे जीवन आपली खूप परीक्षा घेत असतं खचायचं नाही, धीर सोडायचा नाही ,शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं ,परंतु स्वतःहून कधी मरण ओढून घ्यायचं नाही मृत्यु आज नाही पण येणार्‍या उद्या मध्ये नक्की असणार आहे हे वास्तव आहे ,

हे स्वीकारले की मन भरून जगण्याची वाट सापडलीचं समजा….! खर्‍या अर्थाने व्यक्ती तेव्हाचं जगू लागते ,जेव्हा त्याला आपल्या अंतिम गोष्टीची जाणीव असते, जन्म आणि मृत्यू या दोघांमध्ये आपले अनमोल आयुष्य आपण तेव्हाचं जगू लागतो जेव्हा आपल्याला आपल्या शेवटच्या ठिकाणाची जाणीव असेल, मृत्युच्या भीतीने जगण्यापेक्षा मृत्यू हे अंतिम सत्य आहे ,हे वास्तव स्वीकारून जगा बघा जगायला किती मजा येईल आणि आयुष्य अजूनचं सुंदर होईल……!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मृत्यू हे वास्तव स्वीकारणारी व्यक्तीचं जगायला लागते…!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!